नवी दिल्ली Jay Shah ICC Salary : बीसीसीआयचे सचिव जय शाह यांची मंगळवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) अध्यक्षपदी एकमतानं निवड करण्यात आली. यामुळं जय शाह क्रिकेटच्या सर्वोच्च मंडळाच्या अध्यक्षपदी निवड होणारे पाचवे भारतीय ठरले. यासोबतच सोशल मीडियावर त्यांच्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला आहे. ICC चेअरमन जय शाह यांना किती पगार मिळणार? इतकी वर्षे बीसीसीआय सचिव असलेल्या शाह यांना भारतीय क्रिकेट बोर्डानं किती पगार दिला? याचा शोध नेटिझन्स घेत आहेत.
Jay Shah has been elected unopposed as the next Independent Chair of the ICC.https://t.co/Len6DO9xlE
— ICC (@ICC) August 27, 2024
बीसीसीआयनं शाह यांना किती पगार दिला : जय शाह 2019 मध्ये बीसीसीआयचे सचिव झाले. बीसीसीआयमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष आणि सचिव ही पदं अत्यंत प्रतिष्ठेची आहेत. ही पदं भूषवणारे लोक मंडळातील सर्वोच्च अधिकारी आहेत. परंतु बीसीसीआयमध्ये अशा वरिष्ठ पदांसाठी निश्चित वेतन नाही. त्यांना कोणतंही मासिक किंवा वार्षिक वेतन मिळत नाही. परंतु बीसीसीआय त्यांना भत्ते, भरपाई आणि प्रतिपूर्तीच्या स्वरुपात काही रक्कम देते. जय शाहला भारतीय संघाशी संबंधित आंतरराष्ट्रीय मीटिंग्ज आणि परदेश दौऱ्यांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रतिदिन 1000 डॉलर (सुमारे 82 हजार रुपये) आणि देशांतर्गत मीटिंगमध्ये भाग घेण्यासाठी 40 हजार रुपये प्रतिदिन मिळतात. मीटिंग नसतानाही भारतीय संघासोबत भारतात प्रवास केल्यास, त्यांना प्रतिदिन 30 हजार रुपये मिळतात. याव्यतिरिक्त, बोर्ड भारतात आणि परदेशात प्रवास करताना लक्झरी हॉटेलमध्ये राहण्याची आणि बिझनेस क्लास तिकिटांची व्यवस्था करते.
Congratulations to BCCI Honorary Secretary Mr. Jay Shah for being elected unopposed as the next Independent Chair of the International Cricket Council.@JayShah pic.twitter.com/sKZw4mdRvi
— BCCI (@BCCI) August 27, 2024
ICC किती पगार देईल : आयसीसीमध्ये उच्च पदावर असलेल्या लोकांसाठी विशेष वेतन नाही. परंतु, मंडळ त्यांच्या कर्तव्यानुसार विशेष भत्ते आणि सुविधा प्रदान करते. ICC संबंधित मीटिंग्ज आणि दौऱ्यामध्ये हजेरी लावताना दैनिक भत्ता, प्रवास आणि हॉटेलमध्ये राहण्याची सोय केली जाते. मात्र, आयसीसीनं अद्याप ही रक्कम जाहीर केलेली नाही. पण, असं दिसतं की आयसीसीचे फायदे बीसीसीआयसारखेच आहेत.
हेही वाचा :