ॲडलेड AUS vs IND Pink Ball Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर भारतीय संघ 180 धावांवर ऑलआऊट झाला. ॲडलेडमध्ये खेळल्या जात असलेल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीनंतर भारताच्या गोलंदाजांवर मोठी जबाबदारी येऊन पडली. यानंतर जसप्रीत बुमराहनं ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजाला बाद करुन भारताला पहिलं यश मिळवून दिलं. या विकेटसह बुमराहनं एक मोठी कामगिरी केली आहे.
He Does It 🙌@Jaspritbumrah93 gets the first wicket for #TeamIndia
— BCCI (@BCCI) December 6, 2024
Live ▶️ https://t.co/upjirQCmiV#AUSvIND pic.twitter.com/gF3sJgHHwV
2024 मध्ये बुमराहचा आणखी एक विक्रम : जसप्रीत बुमराह यंदा अप्रतिम फॉर्ममध्ये दिसत आहे. त्यानं 2024 मध्ये भारतीय संघाला अनेक सामने जिंकून दिले आहेत. दरम्यान, त्यानं यावर्षी कसोटी क्रिकेटमध्ये 50 बळी पूर्ण केले आहेत. यावर्षी कसोटी क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला आहे. आतापर्यंत 2024 मध्ये 50 विकेट्सचा आकडा इतर कोणत्याही गोलंदाजानं गाठलेला नाही. उस्मान ख्वाजाला बाद करत बुमराहनं ही कामगिरी केली. भारताविरुद्धच्या या सामन्यात उस्माननं केवळ 13 धावांची खेळी केली आहे.
Jasprit Bumrah becomes the first to complete 50 Test wickets in 2024.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 6, 2024
- ICC Award loading for Boom...!!! 🇮🇳 pic.twitter.com/ZodVoFXU9K
22 वर्षांनंतर घडलं असं : भारतासाठी फार कमी वेगवान गोलंदाजांनी एका कॅलेंडर वर्षात 50 बळी घेतले आहेत. अशी कामगिरी करणारा बुमराह तिसरा गोलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी फक्त कपिल देव आणि झहीर खान यांनीच हे काम केलं आहे. कसोटी क्रिकेटमध्ये झहीर खाननं शेवटची वेळ 2002 मध्ये 51 विकेट्स घेतल्या होत्या. म्हणजेच 22 वर्षांनंतर भारतीय वेगवान गोलंदाजानं ही कामगिरी केली आहे. कपिल देव यांनी 1979 साली पहिल्यांदा असं केलं होतं. त्यांनी त्यावर्षी कसोटी क्रिकेटमध्ये 74 बळी घेतले. बुमराह यावर्षी आणखी दोन कसोटी सामने खेळणार आहे. या यादीत तो वरच्या क्रमांकावरही जाऊ शकतो.
THE MOMENT JASPRIT BUMRAH MADE HISTORY. 🐐
— Tanuj Singh (@ImTanujSingh) December 6, 2024
- Bumrah is Only 3rd Indian pacer to complete 50 Test Wickets in a calander Year. pic.twitter.com/zKkXwcF1Ql
- 11 Test Matches in 2024.
— Tanuj Singh (@ImTanujSingh) December 6, 2024
- 50* Wickets.
- 15.14 Average.
- 3.0 Economy.
- 30.20 strike rate.
- JASPRIT BUMRAH, THE GREATEST OF THIS ERA. 🐐 pic.twitter.com/Fj7HAsjejy
एका कॅलेंडर वर्षात भारतासाठी सर्वाधिक कसोटी बळी घेणारे वेगवान गोलंदाज :
- कपिल देव - 75 विकेट (वर्ष 1983)
- कपिल देव - 74 विकेट (वर्ष 1979)
- झहीर खान - 51 विकेट (वर्ष 2002)
- जसप्रीत बुमराह - 50 विकेट (वर्ष 2024)*
- जसप्रीत बुमराह - 48 विकेट (वर्ष 2018)
JASPRIT BUMRAH BECOMES FIRST BOWLER TO COMPLETED 50 TEST WICKETS IN 2024...!!!!
— Tanuj Singh (@ImTanujSingh) December 6, 2024
- Bumrah, The GOAT. 🐐 pic.twitter.com/SJGeA5AiaT
हेही वाचा :