ETV Bharat / sports

जसप्रीत बुमराहनं कसोटी क्रमवारीत मिळवलं अव्वल स्थान; 'अशी' कामगिरी करणारा क्रिकेटच्या इतिहासातील पहिलाच गोलंदाज - नंबर वन

Jasprit Bumrah ICC Ranking : जसप्रीत बुमराह कसोटी क्रिकेटमधील 'नंबर वन' गोलंदाज बनलाय. जसप्रीत बुमराह हा क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात 'नंबर वन' बनणारा जगातील पहिला गोलंदाज बनालाय.

जसप्रीत बुमराह
जसप्रीत बुमराह
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 7, 2024, 3:39 PM IST

नवी दिल्ली Jasprit Bumrah ICC Ranking : भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह कसोटी क्रिकेट क्रमवारीत 'नंबर वन' गोलंदाज बनलाय. जसप्रीत बुमराह हा एकदिवसीय, टी20 आणि कसोटी क्रिकेटमध्ये 'नंबर वन' गोलंदाज बनणारा पहिला गोलंदाज ठरलाय. आज जाहीर केलेल्या नवीन आयसीसी कसोटी क्रमवारीत जसप्रीत बुमराहनं हे स्थान गाठलंय. जसप्रीत बुमराहनं नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात 9 बळी घेत सामनावीराचा पुरस्कारही जिंकला होता. अवघे 34 सामने खेळल्यानंतर जसप्रीत बुमराहनं कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थान गाठलंय. बुमराहशिवाय अश्विन आणि जडेजा यांचाही पहिल्या 10 गोलंदाजांमध्ये समावेश आहे.

जसप्रीत बुमराहनं रचला इतिहास : जसप्रीत बुमराह कसोटीत 'नंबर वन' बनणं ही एक मोठी गोष्ट आहे. क्रिकेटच्या इतिहासातील तो एकमेव असा गोलंदाज आहे, ज्यानं प्रत्येक प्रकारात 'नंबर वन' स्थान पटकावलंय. बुमराह एकदिवसीय आणि टी-20 मध्ये 'नंबर वन' बनला होता. आता त्यानं कसोटीतही हे स्थान गाठलंय. पहिल्या क्रमांकावर कसोटी क्रमवारीत पोहोचणारा जसप्रीत बुमराह पहिला भारतीय गोलंदाज बनलाय.

बुमराह अव्वल, अश्विनला फटका : जसप्रीत बुमराह भारताचा स्टार फिरकीपटू आर अश्विनला मागे सारत कसोटी क्रिकेटमधील 'नंबर वन' गोलंदाज बनलाय. ताज्या क्रमवारीत अश्विनचे ​​दोन स्थान कमी झाले असून तो तिसऱ्या स्थानावर घसरलाय. जसप्रीत बुमराहनं तीन स्थानांची झेप घेतलीय. बुमराहनं 881 गुणांसह अव्वल स्थान पटकावलंय. दक्षिण आफ्रिकेचा स्टार वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा हा क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे. रबाडाचे 851 गुण आहेत. तर आर अश्विन 841 गुणांसह आयसीसी कसोटी क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारताचा स्टार फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजा 746 गुणांसह गोलंदाजांच्या क्रमवारीत 9व्या स्थानावर घसरलाय.

बुमराहनं केलं दमदार पुनरागमन : जसप्रीत बुमराहचं पुनरागमन हे कसोटी क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी पुनरागमन म्हणूनही पाहिलं जाऊ शकतं. 2022 मध्ये जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळं जवळपास एक वर्ष क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता. गेल्या वर्षी बुमराह मर्यादित षटकांत क्रिकेटच्या मैदानात परतला. या वर्षाच्या सुरुवातीला केवळ 4 कसोटी खेळल्यानंतर जसप्रीत बुमराहनं गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान गाठलंय. बुमराहचं हे यश विशेष आहे, कारण त्यानं फिरकीपटूंसाठी उपयुक्त खेळपट्टीवर 9 विकेट्स घेऊन आश्चर्यकारक कामगिरी करत इतिहास रचला.

जसप्रीत बुमराहची क्रिकेट कारकिर्द :

  • कसोटी : सामने 34, विकेट 155, सर्वोत्तम गोलंदाजी 6/47 (एका डावात)
  • एकदिवसीय : सामने 89, विकेट्स 149, सर्वोत्तम गोलंदाजी 6/19
  • T20I : सामने 62, विकेट्स 74, सर्वोत्तम गोलंदाजी 3/11

हेही वाचा :

  1. चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, 'हा' स्टार फलंदाज स्वस्थ होऊन टीममध्ये परतला
  2. भारताची अंडर 19 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक, दक्षिण आफ्रिकेचा दोन गडी राखून पराभव
  3. अंडर 19 क्रिकेट वर्ल्ड कप; उपांत्य फेरीत भारताचा सामना द. आफ्रिकेशी, टीम इंडियाची मदार 'या' 5 प्रमुख खेळाडूंवर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.