मँचेस्टर ENG vs SL Test Jamie Smith : मँचेस्टरच्या खेळपट्टीच्या 22 यार्डच्या पट्टीवर 24 वर्षीय तरुण फलंदाजानं विक्रमी कामगिरी केली. जिथं इंग्लंडच्या दिग्गज फलंदाजांना खेळपट्टीवर राहण्यात अडचण येत होती. या खेळाडूनं मँचेस्टर कसोटीच्या तिसऱ्या दिवशी शानदार शतक झळकावलं. जेमी स्मिथ असं या खेळाडूचं नाव आहे. जेमी स्मिथचं हे पहिलंच कसोटी शतक आहे आणि मोठी गोष्ट म्हणजे त्यानं ते केवळ 136 चेंडूत पूर्ण केलं. जेमी स्मिथचं हे शतकही खास आहे, कारण यासह त्यानं 94 वर्षे जुना विक्रम मोडला आहे.
MAIDEN TEST 💯!
— England Cricket (@englandcricket) August 23, 2024
A dream come true 👏
Live clips: https://t.co/WlpxJWmDmV
🏴 #ENGvSL 🇱🇰 | #EnglandCricket pic.twitter.com/JuC6WRV3Dj
जेमी स्मिथचा विक्रम : जेमी स्मिथ हा इंग्लंडसाठी कसोटी शतक झळकावणारा सर्वात तरुण यष्टीरक्षक ठरला आहे. वयाच्या अवघ्या 24 वर्षे 42 दिवसांत त्यानं हे शतक झळकावलं. याआधी हा विक्रम लेस एम्सच्या नावावर होता. ज्यांनी वयाच्या 24 वर्षे 63 दिवसात वेस्ट इंडिजविरुद्ध शतक झळकावलं होतं. हा कसोटी सामना 1930 मध्ये पोर्ट ऑफ स्पेन इथं खेळला गेला होता. विशेष म्हणजे गेल्या कसोटी सामन्यात जेमी स्मिथला शतक झळकावता आलं नाही. हा खेळाडू वेस्ट इंडिजविरुद्ध 95 धावांवर बाद झाला होता. पण श्रीलंकेविरुद्ध शतक झळकावण्यात यश आलं. जेमी स्मिथचा डाव 111 धावांवर संपला, ज्यात त्यानं एक षटकार आणि 8 चौकार मारले. त्याचा स्ट्राईक रेट 75 होता.
कोण आहे जेमी स्मिथ : जेमी स्मिथनं त्याच्या वयक्तिक चौथ्या कसोटीत पहिलं शतक झळकावलं असून हा खेळाडू इंग्लंडचा पुढचा मोठा खेळाडू मानला जात आहे. जेमी स्मिथबद्दल असं म्हटलं जातं की जो रुटनंतर तो इंग्लंडचा पुढचा मोठा फलंदाज बनणार आहे. जेमी स्मिथनं वयाच्या अवघ्या 6-7 व्या वर्षी क्लब क्रिकेट खेळायला सुरुवात केली. 2005 ची ऍशेस मालिका पाहिल्यानंतर त्याच्यात क्रिकेटर होण्याचं स्वप्न जन्माला आलं. जेव्हा तो 12 वर्षांचा झाला तेव्हा त्याला क्रिकेट शिष्यवृत्ती मिळाली आणि तो विटगिफ्ट स्कूलकडून खेळला, जिथं त्यानं शतकं झळकावली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे वयाच्या 15 व्या वर्षापर्यंत जेमी स्मिथनं फुटबॉलही खेळला होता आणि तो एएफसी विम्बल्डन क्लबचा सदस्य होता.
जेमी स्मिथनं आतापर्यंत इंग्लंडच्या स्थानिक क्रिकेटमध्ये 62 कसोटी सामने खेळले असून त्यात 10 शतकांच्या मदतीनं त्याच्या नावावर 3641 धावा आहेत. याशिवाय त्यानं 17 लिस्ट ए आणि 84 टी-20 सामनेही खेळले आहेत. या खेळाडूला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे आणि टी 20 मालिकेतही संधी मिळू शकते, असं बोललं जात आहे.
हेही वाचा :