ETV Bharat / sports

आयर्लंड विरुद्ध इंग्लंड पहिला T20 सामना भारतात कुठं दिसणार लाईव्ह; वाचा सर्व अपडेट एका क्लिकवर - IREW vs ENGW 1st t20i Live in India

author img

By ETV Bharat Sports Team

Published : Sep 14, 2024, 2:38 PM IST

IREW vs ENGW 1st T20I Live Streaming : आयर्लंड महिला क्रिकेट संघ विरुद्ध इंग्लंड महिला संघ यांच्यातील टी-20 मालिका 14 सप्टेंबरपासून सुरु होत आहे. या मालिकेत एकूण दोन सामने खेळवले जाणार आहेत.

IREW vs ENGW 1st T20I
IREW vs ENGW 1st T20I (Getty Images)

डब्लिन IREW vs ENGW 1st T20I Live Streaming : आयर्लंड महिला क्रिकेट संघ विरुद्ध इंग्लंड महिला संघात दोन T20 सामन्यांची मालिका 2024 आज शनिवार, 14 सप्टेंबर रोजी डब्लिनमध्ये सुरु होत आहे. ही मालिका डब्लिनमधील कॅसल अव्हेन्यू इथं खेळली जाईल.

एकदिवसीय मालिकेत इंग्लंडचा विजय : आगामी T20 विश्वचषक 2024 लक्षात घेऊन इंग्लंडनं या मालिकेसाठी मजबूत T20 संघाची घोषणा केली आहे. इंग्लंड महिला क्रिकेट संघानं यापूर्वी आयर्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिका 2-1 नं जिंकली आणि त्यांच्या आयरिश प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध ही मालिका जिकण्याचा प्रयत्न असेल.

कौशल्य दाखवण्याची संधी : दुसरीकडे आयर्लंडसाठी ही T20 मालिका श्रीलंका महिलांविरुद्ध घरच्या मैदानावरील यशस्वी मालिकेनंतर त्यांचे कौशल्य प्रदर्शित करण्याची एक संधी असेल. आयर्लंडच्या महिला आयसीसी महिला T20 विश्वचषक 2024 साठी पात्र ठरला नाही, कारण स्कॉटलंडनं क्वालिफायरच्या उपांत्य फेरीत त्यांचा पराभव केला.

आयर्लंड महिला विरुद्ध इंग्लंड महिला T20 मध्ये हेड-टू-हेड रेकॉर्ड :

दोन्ही संघांमधील हा तिसरा T20 सामना असेल. मागील दोन्ही सामन्यात इंग्लंडनं दोन्ही सामन्यात विजय मिळवला.

या T20 मालिकेसाठी दोन्ही संघ :

आयर्लंड महिला संघ : गॅबी लुईस (कर्णधार), अवा कॅनिंग, क्रिस्टीना कुल्टर रेली, सारा फोर्ब्स, एमी हंटर, आर्लेन केली, एमी मॅग्वायर, जेन मॅग्वायर, लेआ पॉल, ओरला प्रेंडरगास्ट, उना रेमंड-होई, फ्रेया सार्जेंट, रेबेका स्टोक टेक्टर

इंग्लंड महिला संघ : केट क्रॉस (कर्णधार), जॉर्जिया ॲडम्स, हॉली आर्मिटेज, हन्ना बेकर, टॅमी ब्युमॉन्ट, महिका गौर, रायना मॅकडोनाल्ड-गे, चॅरिस पावली, पायगे स्कॉलफिल्ड, सेरेन स्माले, ब्रायनी स्मिथ, मॅडी व्हिलियर्स, इस्सी वोंग

  • आयर्लंड महिला विरुद्ध इंग्लंड महिला संघातील पहिला T20 सामना कधी आहे?

आयर्लंड महिला विरुद्ध इंग्लंड महिला संघातील पहिला T20 सामना आज शनिवार, 14 सप्टेंबर रोजी डब्लिनमधील कॅसल एव्हेन्यू इथं खेळला जाणार आहे.

  • आयर्लंड महिला विरुद्ध इंग्लंड महिला संघातील पहिला T20 किती वाजता सुरु होईल?

आयर्लंड महिला विरुद्ध इंग्लंड महिला पहिला T20I सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:30 वाजता सुरु होईल.

  • आयर्लंड महिला विरुद्ध इंग्लंड महिला संघातील पहिला T20I लाइव्ह कुठं पाहायचा?

आयर्लंड महिला विरुद्ध इंग्लंड महिला संघातील पहिला T20I सामन्याचं थेट प्रसारण फॅनकोड ॲप आणि वेबसाइटवर भारतात उपलब्ध असेल.

हेही वाचा :

  1. भारतीय क्रिकेटमध्ये 17 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी झाली होती 'धोनी युगा'ची सुरुवात; 'बॉल आउट'मध्ये पाकिस्तानला चारली होती धूळ - IND vs PAK Bowl Out
  2. इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा T20 सामना भारतात 'इथं' दिसणार लाईव्ह, वाचा सर्व अपडेट एका क्लिकवर - ENG vs AUS 2nd T20I Live In India

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.