मुंबई : MI vs RR IPL 2024 : मुंबई इंडियन्सचा दारूण पराभव झाला असून, राजस्थान रॉयल्सनं 6 गडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे. आज (दि. 1 एप्रिल रोजी आयपीएल 2024 चा 14 वा सामना हा मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात मुंबईत रंगला होता. यामध्ये पहिल्या दोन ओव्हरमध्येचं मुंबईच्या 3 विकेट गेल्या. त्यानंतही विकेट सलग गेल्याने मुंबई टीमचा मोठा पराभव झाला.
२ धावा आणि बटलर १२ धावा : राजस्थान रॉयल्सने पॉवरप्लेमध्ये २ बाद ४६ धावा केल्या आहेत. सामन्याच्या पहिल्याच षटकात पहिली विकेट गमावल्यानंतर सॅमसनने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण मधवालने त्याला क्लीन बोल्ड केले. शेवटी मैदानावर रियान पराह आणि बटलर होते.
संजूने बाद होण्यापूर्वी १० चेंडूत ३ चौकार : आकाश मधवालच्या गोलंदाजीवर संजू सॅमसन क्लीन बोल्ड झाला. आकाश मधवालच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये संघात संधी मिळाली नाही. पण या सामन्यात संधी मिळताच त्याने त्याच्या पहिल्याच षटकात संघाला महत्त्वाची विकेट मिळवून दिली आहे. संजूने बाद होण्यापूर्वी १० चेंडूत ३ चौकार मारत १२ धावा केल्या.
पंड्याचा चांगला प्रयत्न पण झेल सुटला : बुमराहच्या चौथ्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर बटलरने शॉट खेळला. झेल टिपण्यासाठी हार्दिकने डाइव्ह मारली खरी पण चेंडू थोडक्यासाठी चुकला आणि झेल सुटला. ४ षटकांनंतर राजस्थानची धावसंख्या १ बाद ४१ धावा आहे. सॅमसन १२ धावा तर बटलर १० धावा करत मैदानात कायम आहेत
मुंबई इंडियन्स संघ : हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, टीम डेव्हिड, इशान किशन, विष्णू विनोद, नेहल वढेरा, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, पियुष चावला, श्रेयस गोपाल, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शम्स मुलानी, रोमॅरियो शेफर्ड, टिळक वर्मा, जसप्रीत बुमराह, जेराल्ड कोएत्झी, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा, नमन धीर, शिवालिक शर्मा, ल्यूक वुड आणि क्वेना माफाका.
राजस्थान रॉयल्स संघ : संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, शुभम दुबे, शिमरॉन हेटमायर, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, टॉम कोहलर-कॅडमोर, रायन पराग, रोवमन पॉवेल, क्रुणाल सिंग राठोड, आर अश्विन, डोनोवन फरेरा, आवेश खान, टी. बोल्ट, नांद्रे बर्जर, युझवेंद्र चहल, नवदीप सैनी, केशव महाराज, संदीप शर्मा, कुलदीप सेन, आबिद मुश्ताक आणि तनुष कोटियन.