ETV Bharat / sports

कुलदीपनं रचलेल्या पायावर फ्रेझर-मॅकगर्कनं चढवला विजयी कळस; दिल्ली राजधानी एक्सप्रेस 'विजयी' रुळावर - LSG vs DC - LSG VS DC

IPL 2024 LSG vs DC : आयपीएल 2024 च्या 26व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं लखनऊ सुपर जायंट्सचा सहा विकेट्सनं पराभव केलाय. यासह आयपीएलच्या इतिहासात लखनऊ सुपर जायंट्सवर दिल्ली कॅपिटल्सचा हा पहिलाच विजय आहे. यापूर्वी झालेल्या तीन सामन्यात दिल्लीला पराभवाचा सामना करावा लागला होता.

IPL 2024 LSG vs DC
कुलदीपनं रचलेल्या पायावर फ्रेझर-मॅकगर्कनं चढवला विजयी कळस; दिल्ली राजधानी एक्सप्रेस 'विजयी' रुळावर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 12, 2024, 8:14 PM IST

Updated : Apr 13, 2024, 6:41 AM IST

लखनौ IPL 2024 LSG vs DC : इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 17 व्या हंगामातील 26व्या सामन्यात, दिल्ली कॅपिटल्सनं लखनऊ सुपर जायंट्सचा सहा विकेट्सनं पराभव केलाय. लखनऊ येथील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियमवर शुक्रवारी झालेल्या या सामन्यात दिल्लीला विजयासाठी 168 धावांचं लक्ष्य होतं. हे लक्ष्य दिल्लीनं 18.1 षटकात 4 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. आयपीएलच्या इतिहासात लखनऊ सुपर जायंट्सवर दिल्ली कॅपिटल्सचा हा पहिलाच विजय आहे. यापूर्वी दिल्लीनं लखनऊविरुद्ध सलग तीन सामने हरले होते. तसंच, लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध 160 किंवा त्याहून अधिक धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करणारा दिल्ली हा पहिलाच संघ ठरलाय.

फ्रेझर-मॅकगर्कचं पहिल्याच सामन्यात अर्धशतक : दिल्ली कॅपिटल्सच्या विजयात ऑस्ट्रेलियन खेळाडू जेक फ्रेझर-मॅकगर्क यानं महत्त्वाची भूमिका बजावली. जेकनं आपला पहिला आयपीएल सामना खेळताना 35 चेंडूत 55 धावांची वादळी खेळी केली. ज्यात पाच षटकार आणि दोन चौकारांचा समावेश होता. जेक आणि कर्णधार ऋषभ पंत यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी 77 धावांची भागीदारी झाली. पंतनंही 24 चेंडूत 4 चौकार आणि दोन षटकारांसह 41 धावा केल्या. तर सलामीवीर पृथ्वी शॉनंही 32 धावांची खेळी केली. तर लखनऊकडून रवी बिश्नोईनं 2 बळी घेतले, तर यश ठाकूर आणि नवीन-उल-हक यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

आयुष आणि अर्शद खान यांची उपयुक्त भागीदारी : तत्पूर्वी नाणेफेक जिंकल्यानंतर लखनऊच्या संघानं प्रथम फलंदाजी करताना 7 विकेट गमावत 167 धावा केल्या. लखनऊकडून आयुष बडोनीनं सर्वाधिक 55 धावांची नाबाद खेळी केली. आयुषनं 35 चेंडूंच्या खेळीत पाच चौकार आणि एक षटकार ठोकला. आयुष आणि अर्शद खान (20*) यांनी आठव्या विकेटसाठी 73 धावांची नाबाद भागीदारी केली. ज्यामुळं लखनऊला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. एकवेळ लखनऊची अवस्था 94 धावांत सात विकेट होती. मात्र त्यानंतर आयुष आणि अर्शद खान यांच्या भागीदारीमुळं संघाला समाधानकारक धावसंख्या करता आली. कर्णधार केएल राहुलनंही 39 धावांचे तर क्विंटन डी कॉकने 19 धावांचं उपयुक्त योगदान दिलं. दिल्लीकडून कुलदीप यादवनं सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तर खलील अहमदनंही दोन बळी मिळविले.

लखनऊविरुद्ध दिल्लीचा पहिलाच विजय : आयपीएल 2024 मध्ये दिल्ली कॅपिटल्सनं आतापर्यंत 6 सामने खेळले आहेत. त्यापैकी दोन जिंकले आहेत. तर दुसरीकडं लखनऊनं पाचपैकी तीन सामने जिंकले आहेत. आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आतापर्यंत चार सामने खेळले गेले आहेत. यात लखनऊ सुपर जायंट्स संघानं तीन सामने जिंकले आहेत. तर दिल्लीनं हा सामना जिंकलाय.

हेही वाचा :

  1. Exclusive! आगामी टी-20 विश्वचषकासाठी विराट कोहलीचं भारतीय संघात स्थान निश्चित, पंतचंही होणार पुनरागमन? - virat kohli
  2. किशनच्या 'शान'दार खेळीनंतर 'सूर्य' तळपळला; तीन फलंदाजांनी अर्धशतकं झळकावूनही आरसीबीचा 'विराट' पराभव - MI vs RCB

Last Updated : Apr 13, 2024, 6:41 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.