ETV Bharat / sports

नव्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली गतविजेत्या चेन्नईची विजयी सुरुवात - IPL 2024 OPENING MATCH - IPL 2024 OPENING MATCH

IPL Opening Match यंदाच्या आयपीएल क्रिकेट हंगामातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलूरु यांच्यात चेन्नई येथील एम ए चिदंबरम स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात चेन्नईनं सहा गडी राखून विजय मिळवलाय. यासह त्यांनी या हंगामाची विजयी सुरुवात केली. या मैदानात आतापर्यंत अपराजित राहण्याचा विक्रम चेन्नई सुपर किंग्जने अबाधित राखला.

IPL Opening Ceremony Live
IPL Opening Ceremony Live
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 22, 2024, 7:14 PM IST

Updated : Mar 23, 2024, 12:13 AM IST

चेन्नई IPL Opening Match : यंदाच्या आयपीएल मधील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरु यांच्यात चेन्नईच्या एम चिदंबरम स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात बेंगलुरुनं प्रथम फलंदाजी करताना 173 धावांची मजल मारली प्रत्युत्तरादाखल चेन्नईच्या संघानं 18.4 षटकात 176 धावा करत 6 गडी राखून विजय मिळवला. यासह त्यांनी या हंगामाची विजयी सुरुवात केली.

सीएसकेची आक्रमक सुरुवात : धावांचा पाठलाग करताना चेन्नईनं आक्रमक सुरुवात केली. अष्टपैलू रचिन रवींद्र (37) आणि कर्णधार ऋतुराज गायकवाड (15) दोघांनी आकर्षक फटके खेळत पॉवरप्लेमध्ये 62 धावा काढल्या. मात्र यश दयालनं ऋतुराज गायकवाडला आउट करत ही जोडी फोडली. यानंतर कॅमेरुन ग्रीननं अजिंक्य रहाणे आणि डेरिल मिचेल यांना आउट केलं. तर फिरकीपटू कर्ण शर्मा यांना रचिन रवींद्रला बाद करत चेन्नईला बॅक फूटवर नेलं. मात्र यानंतर अष्टपैलू रवींद्र जडेजा (24) आणि शिवम दुबे (38) यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

कर्णधारपदाच्या पहिल्याच परीक्षेत गायकवाड पास : पहिल्या सामन्याच्या आधीच महेंद्रसिंह धोनी यानं चेन्नई सुपर किंग्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी ऋतुराज गायकवाडकडे सोपवली होती. यानंतर सर्वांचे लक्ष आजच्या सामन्याकडे लागलं होतं. मात्र ऋतुराज गायकवाड कर्णधारपदाच्या पहिल्याच परीक्षेत पास झालाय. त्याच्या नेतृत्वात संघानं पहिल्याच सामन्यात दणदणीत विजय मिळवत यंदाच्या हंगामाची जोरदार सुरुवात केलीय.

मुस्तफिजुरचे चार बळी : दरम्यान यंदाच्या हंगामातील पहिल्याच सामन्यात फाफ डुप्लेसेसच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगलुरुनं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर कर्णधार हाफ डुप्लेसीसनं आठ चौकारांची आतषबाजी करत संघाला आक्रमक सुरुवात करून दिली. मात्र सहाव्या षटकात मुस्तफाजूर रहमाननं दोन बळी घेत आरसीबीला अडचणीत आणलं. यानंतर ग्लेन मॅक्सवेल भोपळाही न फोडताच तंबूत परतला. तर विराट कोहलीही 21 धावा करुन बाद झाला. मात्र शेवटच्या पाच षटकांमध्ये अनुभवी दिनेश कार्तिक (38) आणि युवा अनुज रावत (48) यांनी आक्रमक फटकेबाजी केल्यानं आरसीबीला 173 धावांची मजल मारता आली. यादरम्यान चेन्नई कडून मुस्तफाजूर रहमाननं चार बळी घेत आरसीबीच्या फलंदाजीला खिंडार पाडलं.

CSK विरुद्ध RCB पहिला सामना : इंडियन प्रीमियर लीगचा (IPL) 17वा हंगाम 22 मार्चपासून सुरू झाला. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) यांच्यातील सामन्याने स्पर्धेची सुरुवात झाली. लोकसभा निवडणुकीमुळं पहिल्या 21 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. IPL 2024 च्या पहिल्या 17 दिवसांमध्ये, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB), दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि गुजरात टायटन्स (GT) चे संघ प्रत्येकी जास्तीत जास्त 5 सामने खेळतील. तर चेन्नई सुपर किंग्स (CSK), सनरायझर्स हैदराबाद (SRH), मुंबई इंडियन्स (MI), राजस्थान रॉयल्स (RR), लखनौ सुपर जायंट्स (LSG) आणि पंजाब किंग्स (PBKS) यांना प्रत्येकी चार सामने खेळायला मिळतील. तर कोलकाता नाईट रायडर्स (KKR) फक्त तीन सामन्यांमध्ये सहभागी होणार आहे. आयपीएल 2024 सुरू होण्यापूर्वी संघांमध्ये फेरबदल करण्यात आले आहेत. काही खेळाडू दुखापतीमुळं स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. तर काहींनी कौटुंबीक कारणांमुळं IPL च्या हंगामातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. काही संघांनी आपले कर्णधारही बदलले आहेत.

सर्व 10 संघांचे खेळाडू :

चेन्नई सुपर किंग्ज (CSK) : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), महेंद्रसिंह धोनी, मोईन अली, दीपक चहर, तुषार देशपांडे, शिवम दुबे, राजवर्धन हंगरकर, रवींद्र जडेजा, अजय मंडल, मुकेश चौधरी, अजिंक्य रहाणे, शेख रशीद, मिचेल सँटनर, सिमरजीत सिंग, निशांत सिंधू, प्रशांत सोलंकी, महिश तिक्षिना, रचिन रवींद्र, शार्दुल ठाकूर, डॅरिल मिशेल, समीर रिझवी, मुस्तफिजुर रहमान, अवनीश राव अरावली.

मुंबई इंडियन्स (MI) : हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव (सुरुवातीच्या सामन्यांपैकी), इशान किशन, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, विष्णू विनोद, अर्जुन तेंडुलकर, शम्स मुलानी, नेहल वढेरा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, पियुष चावला, आकाश मधवाल, ल्यूक वुड, रोमॅरियो शेफर्ड, जेराल्ड कोएत्झी, श्रेयस गोपाल, नुवान तुषारा, नमन धीर, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शिवालिक शर्मा, क्वेना माफाका.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, विराट कोहली, रजत पाटीदार, अनुज रावत, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, विल जॅक, महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, मनोज भंडगे, मयंक डागर, विजय कुमार वराज, आकाश दीप, मोहम्मद सिराज, रीस टोपले, हिमांशू शर्मा, राजन कुमार, कॅमेरॉन ग्रीन, अल्झारी जोसेफ, यश दयाल, टॉम कुरन, लॉकी फर्ग्युसन, स्वप्नील सिंग, सौरव चौहान.

कोलकाता नाइट रायडर्स (KKR) : श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, रिंकू सिंग, रहमानउल्ला गुरबाज, फिल सॉल्ट, सुनील नरेन, सुयश शर्मा, अनुकुल रॉय, आंद्रे रसेल, व्यंकटेश अय्यर, हर्षित राणा, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती, के.एस. भरत, चेतन साकारिया, मिचेल स्टार्क, अंगक्रिश रघुवंशी, रमणदीप सिंग, शेरफेन रदरफोर्ड, मनीष पांडे, मुजीब उर रहमान, दुष्मंथा चमीरा, साकिब हुसैन.

गुजरात टायटन्स (GT) : शुभमन गिल (कर्णधार), डेव्हिड मिलर, मॅथ्यू वेड, वृद्धिमान साहा, केन विल्यमसन, अभिनव मनोहर, साई सुदर्शन, दर्शन नळकांडे, विजय शंकर, जयंत यादव, राहुल तेवतिया, नूर अहमद, साई किशोर, राशिद खान , जोशुआ लिटल, मोहित शर्मा, अजमतुल्ला ओमरझाई, उमेश यादव, शाहरुख खान, सुशांत मिश्रा, कार्तिक त्यागी, मानव सुथार, स्पेन्सर जॉन्सन, संदीप वॉरियर, बी.आर. शरथ.

लखनौ सुपर जायंट्स (LSG) : केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक, निकोलस पूरन, आयुष बडोनी, काइल मेयर्स, मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, देवदत्त पडिककल, रवी बिश्नोई, नवीन उल हक, क्रुणाल पंड्या, युधवीर सिंग, प्रेरक मंकड , यश ठाकूर, अमित मिश्रा, शेमर जोसेफ, मयंक यादव, मोहसीन खान, कृष्णप्पा गौतम, शिवम मावी, अर्शीन कुलकर्णी, एम. सिद्धार्थ, ॲश्टन टर्नर, डेव्हिड विली, मोहम्मद अर्शद खान.

राजस्थान रॉयल्स (RR) : संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, शिमरॉन हेटमायर, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, रायन पराग, डोनोवन फरेरा, क्रुणाल राठौर, रविचंद्रन अश्विन, कुलदीप सेन, नवदीप सैनी, संदीप शर्मा, ट्रेंट बोल्ट, युजवेंद्र चहल , आवेश खान, रोवमन पॉवेल, शुभम दुबे, टॉम कोहलर-कॅडमोर, अबिद मुश्ताक, नांद्रे बर्जर, तनुष कोटियन.

दिल्ली कॅपिटल्स (DC) : ऋषभ पंत (कर्णधार), प्रवीण दुबे, डेव्हिड वॉर्नर, विकी ओस्तवाल, पृथ्वी शॉ, एनरिक नॉर्सिया, अभिषेक पोरेल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, जेक फ्रेझर-मॅकगर्क, ललित यादव, खलील अहमद, मिचेल मार्श, इशांत शर्मा, यश धुल, मुकेश कुमार, ट्रिस्टन स्टब्स, रिकी भुई, कुमार कुशाग्रा, रसिक सलाम दार, जे रिचर्डसन, सुमित कुमार, शाई होप, स्वस्तिक चिकारा.

पंजाब किंग्ज (PBKS) : शिखर धवन (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा, सिकंदर रझा, ऋषी धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, अथर्व तायडे, अर्शदीप सिंग, नॅथन एलिस, सॅम कुरान, कागिसो रबाडा, हरप्रीत ब्रार, राहुल चहर, हरप्रीत भाटिया, विद्वथ कवेरप्पा, शिवम सिंग, हर्षल पटेल, ख्रिस वोक्स, आशुतोष शर्मा, विश्वनाथ प्रताप सिंग, शशांक सिंग, तनय थियागराजन, प्रिन्स चौधरी, रिले रॉसो.

सनरायझर्स हैदराबाद (SRH) : पॅट कमिन्स (कर्णधार), अब्दुल समद, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, मार्को जॅन्सन, राहुल त्रिपाठी, वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स, सनवीर सिंग, हेनरिक क्लासेन, भुवनेश्वर कुमार, मयंक अग्रवाल, टी. नटराजन, अनमोलप्रीत सिंग, मयंक मार्कंडेय, उपेंद्र सिंग यादव, उमरान मलिक, नितीश कुमार रेड्डी, फजलहक फारुकी, शाहबाज अहमद, ट्रॅव्हिस हेड, वानिंदू हसरंगा, जयदेव उनाडकट, आकाश सिंग, जाटवेद सुब्रमण्यम.

IPL 2024 च्या पहिल्या 21 सामन्यांचे वेळापत्रक :

1. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, 22 मार्च, चेन्नई, रात्री 8.00

2. पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, 23 मार्च, मोहाली, दुपारी 3.30 वा.

3. कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, 23 मार्च, कोलकाता, संध्याकाळी 7.30

4. राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, 24 मार्च, जयपूर, दुपारी 3.30 वाजता

5. गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, 24 मार्च, अहमदाबाद, संध्याकाळी 7.30 वा

6. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध पंजाब किंग्ज, 25 मार्च, बेंगळुरू, संध्याकाळी 7.30 वा.

7. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स, 26 मार्च, चेन्नई, संध्याकाळी 7.30 वा.

8. सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स, 27 मार्च, हैदराबाद, संध्याकाळी 7.30 वा

9. राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, 28 मार्च, जयपूर, संध्याकाळी 7.30 वा.

10. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, 29 मार्च, बेंगळुरू, संध्याकाळी 7.30

11. लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स, 30 मार्च, लखनौ, संध्याकाळी 7.30 वा.

12. गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, 31 मार्च, अहमदाबाद, 3.30 PM

13. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, 31 मार्च, विझाग, संध्याकाळी 7.30 वाजता

14. मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, 1 एप्रिल, मुंबई, संध्याकाळी 7.30 वा.

15. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, 2 एप्रिल, बेंगळुरू, संध्याकाळी 7.30

16. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, 3 एप्रिल, विझाग, संध्याकाळी 7.30

17. गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्ज, 4 एप्रिल, अहमदाबाद, संध्याकाळी 7.30

18. सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, 5 एप्रिल, हैदराबाद, संध्याकाळी 7.30

19. राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, 6 एप्रिल, जयपूर, संध्याकाळी 7.30

20. मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, 7 एप्रिल, मुंबई, दुपारी 3.30 वाजता

21. लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स, 7 एप्रिल, लखनौ, संध्याकाळी 7.30

Last Updated : Mar 23, 2024, 12:13 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.