हैदराबाद IPL 2024 SRH vs GT : इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये आज सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात 66वा सामना आहे. हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. मात्र हैदराबादेत पाऊस सुरु असल्यानं नाणेफेकीला उशीर होत आहे. हा सामना पावसामुळं रद्द झाल्यानं हैदराबादचा संघानं अधिकृतरित्या प्लेऑफमध्ये प्रवेश केलाय. मात्र यामुळं दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि लखनऊ सुपर जायंट्स (LSG) प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत.
दोन्ही संघ दुसऱ्यांदा आमनेसामने : या हंगामात गुजरात आणि हैदराबाद संघांमधील हा दुसरा सामना आहे. यापूर्वी 31 मार्च रोजी अहमदाबादमध्ये या दोन्ही संघात सामना झाला होता. ज्यात गुजरात संघानं 7 विकेट्सनं विजय मिळवला होता. आजच्या सामन्यात हैदराबादचा संघ त्या पराभवाचा बदला घेत प्लेऑफमध्ये जागा निश्चित करण्याचा प्रयत्न करेल. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील हैदराबाद संघानं आतापर्यंत 12 पैकी 7 सामने जिंकले आहेत. हा संघ 14 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. हैदराबादचा संघ हा सामना जिंकताच प्लेऑफमध्ये प्रवेश करेल.
गुजरात प्लेऑफमधून बाहेर : दुसरीकडे, गुजरातचा संघ आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलाय. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात संघानं आतापर्यंत 13 पैकी केवळ 5 सामने जिंकले असून 7 हरले आहेत तर 1 सामना पावसामुळं रद्द झाला. अशाप्रकारे हा संघ 11 गुणांसह गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे. या हंगामात गुजरातचा हा शेवटचा सामना आहे. हा सामना जिंकत स्पर्धेचा विजयी समारोप करण्याचा प्रयत्न करणार आहे.
हेड-टू-हेड रेकॉर्ड : आयपीएलमध्ये गुजरात संघाचा हा केवळ तिसरा हंगाम आहे. त्यांनी 2022 च्या हंगामात आयपीएलमध्ये प्रवेश केला होता. तेव्हापासून सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएलमध्ये 4 सामने खेळले गेले आहेत. यात गुजरातनं 3 तर सनरायझर्स हैदराबादनं 1 सामना जिंकलाय.
हैदराबाद विरुद्ध गुजरात हेड-टू-हेड :
- एकूण सामने : 4
- गुजरात जिंकले : 3
- हैदराबाद जिंकले : 1
हेही वाचा :