ETV Bharat / sports

पंजाबच 'किंग'; सॅम करनच्या फटकेबाजीनं राजस्थान संघाला चारली धूळ, पराभवानंतरही राजस्थाननं साकारलं प्लेऑफचं स्वप्न - RR vs PBKS - RR VS PBKS

IPL 2024 RR vs PBKS : आयपीएलच्या 17 व्या हंगामात बुधवारी पंजाब किंग्ज (PBKS) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यात गुवाहाटीत खेळवण्यात आलेल्या सामन्यात पंजाब संघानं विजय मिळवला. या सामन्यात पंजाबचा कर्णधार सॅम करन यानं जोरदार फलंदाजी केली.

IPL 2024 RR vs PBKS
IPL 2024 RR vs PBKS (Desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 15, 2024, 7:28 PM IST

Updated : May 16, 2024, 6:53 AM IST

गुवाहाटी IPL 2024 RR vs PBKS : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 मध्ये बुधवारी राजस्थान रॉयल्स (RR) आणि पंजाब किंग्ज (PBKS) यांच्यात 65वा सामना खेळवण्यात आला. गुवाहाटी इथल्या बारसापारा क्रिकेट मैदानावर झालेल्या या सामन्यात पंजाब संघानं राजस्थान संघावर विजय मिळवला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत पंजाब संघाला पंजाबसमोर 145 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात पंजाब संघानं 5 गड्यांच्या मोबदल्यात सहज पार केलं. सुरुवातीला 50 धावात त्यांचे 4 गडी बाद झाले होते, मात्र त्यानंतर कर्णधार सॅम करननं जितेश शर्माच्या साथीनं डाव सावरला.

राजस्थानचा 145 धावात गुंडाळण्यात यश : या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना राजस्थान संघानं 42 धावांवर 3 विकेट गमावल्या. त्यानंतर 92 ते 102 धावांमध्ये आणखी 3 गडी गमावले. मात्र, आपल्या घरच्या मैदानावर रियान परागनं एक बाजू लावून धरत शानदार खेळी केली. त्यामुळे राजस्थान संघानं 9 गडी गमावून 144 धावा केल्या. रियान परागचं अर्धशतक मात्र हुकलं. त्यानं 34 चेंडूत 48 धावांची खेळी केली. तर रविचंद्रन अश्विननंही 28 धावा केल्या. त्यांच्याशिवाय अन्य कोणत्याही फलंदाजाला 20 धावांचा आकडा गाठता आला नाही. पंजाबकडून सॅम कुरन, हर्षल पटेल आणि राहुल चहर यांनी 2-2 बळी घेतले. तर अर्शदीप सिंग आणि नॅथन एलिसनं 1-1 बळी घेतला.

राजस्थान संघावर पंजाबचा विजय : राजस्थान संघानं दिलेल्या 145 धावांचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात खराब झाली. धडाकेबाज गोलंदाज ट्रेंट बोल्ट यानं पहिल्याच षटकात पंजाबला जोरदार धक्का दिला. ट्रेंट बोल्टनं प्रभसिमरन सिंहला 6 धावांवर तंबूत पाठवलं. त्यानंतर राइले रुसो 22 धावा काढून चालता झाला. तर जॉनी बेअरस्टो सपशेल अपयशी ठरला. त्यानं 22 चेंडूत 14 धावा करुन तंबूची वाट धरली. शशांक सिंह यानंही भोपळा न फोडता तंबूची वाट धरली. त्यामुळे पंजाबनं केवळ 48 धावात 4 गडी गमावले. त्यानंतर मात्र पंजाबचा कर्णधार सॅम करननं डावाची सूत्रं आपल्या हाती घेतली. सॅम करन 41 चेंडूत 63 धावा करुन नाबाद राहिला. त्याला जितेश शर्मा यानं मोलाची साथ देत 20 चेंडूत 22 धावा करुन नाबाद राहिला. राजस्थान संघाकडून आवेश खान आणि युझवेंद्र चहलनं प्रत्येकी 2-2 बळी घेतले. सॅम करन यानं गोलंदाजी आणि फलंदाजीत शानदार कामगिरी केल्यानं त्याला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. राजस्थान संघ पराभवानंतरही प्लेऑफमध्ये पोहोचला आहे.

हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : आयपीएलच्या इतिहासात पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आतापर्यंत 27 सामने खेळले गेले आहेत. यात राजस्थान रॉयल्सनं 16 सामने जिंकले तर पंजाब किंग्जनं 11 सामने जिंकले. गेल्या वेळी जेव्हा दोन्ही संघांमध्ये सामना झाला तेव्हा राजस्थान रॉयल्सनं तीन गडी राखून विजय मिळवला होता.

  • एकूण सामने: 27
  • पंजाब विजयी: 11
  • राजस्थान जिंकले: 16

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन :

  • पंजाब किंग्ज : जॉनी बेअरस्टॉ, प्रभसिमरन सिंग, राइली रुसो, शशांक सिंग, सॅम कुरन (कर्णधार), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हरप्रीत बरार, हर्षल पटेल, राहुल चहर, नॅथन इलिस आणि अर्शदीप सिंग
  • इम्पॅक्ट खेळाडू : आशुतोष शर्मा, तनय थियागराजन, ऋषी धवन, विद्वथ कावेरप्पा आणि हरप्रीत सिंग भाटिया
  • राजस्थान रॉयल्स : यशस्वी जैस्वाल, टॉम कोहलर-कॅडमोर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक/कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा आणि युझवेंद्र चहल
  • इम्पॅक्ट खेळाडू : नांद्रे बर्गर, तनुष कोटियन, केशव महाराज, कुलदीप सेन, डोनोवन फरेरा

हेही वाचा :

  1. दिल्लीनं लखनौचा घालविला नवाबी थाट, 19 धावांनी पराभूत झाल्यानं प्लेऑफमध्ये खेळणं होणार कठीण - DC vs LSG Live score
  2. रॉयल चॅलेजर्स बंगळुरुने नोंदवला सलग पाचवा विजय, ४७ धावांनी उडवला दिल्ली कॅपिटल्सचा धुव्वा - RCB vs DC

Last Updated : May 16, 2024, 6:53 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.