बंगळुरू RCB VS Punjab Kings : यंदाच्या आयपीएलमधील सहावा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स यांच्यात बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी मैदानावर सोमवारी खेळण्यात आला. या सामन्यातील बंगळुरुनं घरच्या मैदानावर पंजाबचा चार गडी राखून पराभव केला. यंदाच्या हंगामात पहिला विजय मिळवत आरसीबीनं आयपीएलच्या गुणतालिकेत खातं उघडलं. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या पंजाब किंग्सनं निर्धारित 20 षटकात 6 बाद 176 धावा केल्या. धावांचं लक्ष्य गाठताना बंगळूरूनं 19.2 षटकांत त 6 गड्यांच्या मोबदल्यात 178 धावा करून विजय मिळवला.
मोठी खेळी करण्यात पंजाबचे फलंदाज अपयशी : या सामन्यात बंगळुरूचा कर्णधार फफ डु प्लेसीसनं नाणेफेक जिंकून पंजाबला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण दिलं. मात्र पंजाबला पहिल्यांदा खेळण्याची संधी मिळूनही त्याचा पुरेपूर फायदा घेता आला नाही. डावाच्या तिसऱ्यात षटकात सलामीवीर जॉनी बेयरस्टॉ आठ धावा करून मोहम्मद सिराजचा बळी ठरला. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या प्रभसिमरन सिंग यान 25 धावा करत कर्णधार शिखर धवनला साथ दिली. मात्र त्यानंतर तोही बाद झाला. यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या लियम लिविंगस्टोन (17), सॅम करन (23), जिथे शर्मा (27) आणि शशांक सिंग (21) यांनी आक्रमक फटके मारत धावांची गती वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र, यापैकी एकालाही मोठी खेळी करता आली नाही. परिणामी पंजाबचा डाव निर्धारित 20 षटकांत 176 धावांवर मर्यादित राहिला. पंजाबकडून कर्णधार शिखर धवननं सर्वाधिक 45 धावा केल्या. तर बंगळुरूकडून फिरकीपटू ग्लेन मॅक्सवेल व मोहम्मद सिराजनं प्रत्येकी दोन बळी घेतले. तर यश दयाल आणि अल्जारी जोसेफ यांनाही 1-1 विकेट मिळाली.
कोहलीची अर्धशतकी खेळी : पंजाबनं दिलेल्या 177 धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या बंगळुरू संघाची सुरुवात आक्रमक झाली. विराट कोहलीनं डावाच्या पहिल्याच षटकात चार चौकार मारत 16 धावा करत तडाखेबंद फलंदाजी केली. विशेष म्हणजे दुसऱ्याच चेंडूवर विराट कोहलीला जीवदान मिळालं. तेव्हा विराट कोहलीच्या शून्य धावा होत्या. मात्र याचा फटका पंजाबला बसून त्यांना सामना हातातून गमवावा लागला. एकीकडे विराट कोहली आक्रमक फटके मारत असताना कर्णधार फाफ डु प्लेसीस मात्र स्वस्तात परतला. डावाच्या तिसऱ्या षटकात कगीसो रबाडानं त्याला 3 धावांवर बाद केलं. यानंतर ठराविक अंतरानं फलंदाज बाद होत राहिले. तर एका बाजूला विराट कोहली खेळपट्टीवर उभा होता. बंगळुरु सामना सहज जिंकेल असं वाटत असतानाच डावाच्या सोळाव्या षटकात वेगवान गोलंदाज हर्षल पटेलनं विराट कोहलीला 77 धावांवर बाद केलं. त्यामुळे सामन्यात रंगत निर्माण झाली. यानंतर पुढच्या षटकात अनुज रावतदेखील बाद झाला. यामुळं बंगळुरूचा संघ काहीसा अडचणीत सापडला. मात्र बदली खेळाडू म्हणून आलेला महिपाल लोमरोर (17) आण दिनेश कार्तिक (28) यांनी 18 चेंडूत 48 धावांची भागीदारी करत बंगळूरु संघाला विजय मिळवून दिला. 77 धावा काढत अर्धशतक केलेल्या विराट कोहलीला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला.
दोन्ही संघातील प्लेअर्स
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, विराट कोहली, रजत पाटीदार, अनुज रावत, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, विल जॅक्स, महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, मनोज भंडागे, मयंक डागर, विजय दीपकुमार, दीपकुमार, व्ही. मोहम्मद सिराज, रीस टोपले, हिमांशू शर्मा, राजन कुमार, कॅमेरॉन ग्रीन, अल्झारी जोसेफ, यश दयाल, टॉम कुरन, लॉकी फर्ग्युसन, स्वप्नील सिंग, सौरव चौहान.
पंजाब किंग्ज : शिखर धवन (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा, सिकंदर रझा, ऋषी धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, अथर्व तायडे, अर्शदीप सिंग, नॅथन एलिस, सॅम कुरान, कागिसो रबाडा, हरप्रीत ब्रार, राहुल चहर, हरप्रीत भाटिया , विद्वत कावेरप्पा, शिवम सिंग, हर्षल पटेल, ख्रिस वोक्स, आशुतोष शर्मा, विश्वनाथ प्रताप सिंग, शशांक सिंग, तनय त्यागराजन, प्रिन्स चौधरी, रिली रोसोव.
हेही वाचा
- 'बुटका डोंगराच्या माथ्यावर उभा राहिला तरी बुटका असतो, मात्र...'; मुंबईच्या कर्णधारपदाबाबत काय म्हणाले नवज्योत सिंग सिद्धू? - Navjot Sidhu on Rohit Sharma
- मुंबईची परंपरा कायम! कर्णधार बदलूनही सलग 12व्यांदा हंगामातील पहिल्या सामन्यात पराभव - IPL 2024 GT vs MI
- IPL 2024 : राजस्थान रॉयल्सनं लखनौ सुपर जायंट्सला चारली धूळ, कर्णधार संजू सॅमसनची नाबाद 82 धावांची खेळी - RR vs LSG Live Score