धर्मशाळा IPL 2024 PBKS vs RCB : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 च्या हंगामात पंजाब किंग्ज (PBKS) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) यांच्यात 58वा सामना खेळला जात आहे. धर्मशाळा येथील हिमाचल प्रदेश क्रकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना होत आहे. ज्यात पंजाबचा कर्णधार सॅम कुरननं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या आरसीबीनं पंजाबला 242 धावांचं लक्ष्य दिलंय. प्रत्युत्तरात पंजाबनं 3 गड्यांच्या मोबदल्यात 100 हून अधिक धावा काढल्या आहेत.
सामन्यात पावसाचा व्यत्यय : या सामन्यात नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आरसीबीनं 7 गडी बाद 241 धावा केल्या. 10 षटकांनंतर जोरदार पाऊस झाला आणि मैदानावर गाराही पडल्या. मात्र काही वेळानं पुन्हा सामना सुरु झाला. यानंतर विराट कोहलीनं आक्रमक खेळी केली. त्यानं 47 चेंडूत 92 धावांची खेळी स्फोटक पद्धतीनं खेळली. विशेष म्हणजे विराट कोहलीला शुन्यावर त्याचा झेल सुटला होता. त्यानंतर आणखी एक जिवदान मिळालं. त्यानं आपल्या खेळीत 6 षटकार आणि 7 चौकार मारले. त्याच्याशिवाय रजत पाटीदारनं 23 चेंडूत 55 धावा केल्या. शेवटी कॅमेरुन ग्रीननं 27 चेंडूत 46 धावा केल्या. कोहली आणि ग्रीनमध्ये 46 चेंडूत 92 धावांची भागीदारी झाली. पंजाबकडून हर्षल पटेलनं सर्वाधिक 3 आणि विद्वथ कवेरप्पानं 2 बळी घेतले. तर सॅम कुरन आणि अर्शदीप सिंग यांना 1-1 बळी मिळाला.
दोन्ही संघांसाठी करो या मरो सामना : या हंगामात पंजाब आणि बेंगळुरु यांच्यातील हा दुसरा सामना आहे. यापूर्वी 25 मार्च रोजी या दोन्ही संघात सामना झाला होता. ज्यात आरसीबीनं 4 विकेट्सनं विजय मिळवला होता. या सामन्यात जो संघ हरेल तो प्लेऑफच्या शर्यतीतून पूर्णपणे बाहेर होणार आहे. तर सामना जिंकणाऱ्या संघाला 10 गुण मिळतील आणि ते प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहतील. सध्या आरसीबी आणि पंजाब यांचे प्रत्येकी 11 सामने झाले असून त्यापैकी फक्त 4 सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांचे समान 8 गुण आहेत. आरसीबी सध्या सातव्या क्रमांकावर आहे. तर पंजाब आठव्या स्थानावर आहे.
पंजाबचा आरसीबीवर वरचष्मा : आयपीएलमधील दोन संघांमधील स्पर्धेबद्दल बोलायचं झालं तर, गेल्या 5 सामन्यांमध्ये बंगळुरुचा वरचष्मा दिसतोय. या दोन संघांमधील मागील 5 सामन्यांमध्ये आरसीबीनं 3 वेळा विजय मिळवला आहे. तर पंजाबनं 2 सामने जिंकले आहेत. एकूण रेकॉर्ड पाहिल्यास पंजाबचा वरचष्मा दिसून येतो. आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये एकूण 32 सामने झाले आहेत. यात पंजाबनं 17 सामने जिंकले आहेत, तर आरसीबीनं 15 सामने जिंकले आहेत.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन :
- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु : विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विल जॅक, रजत पाटीदार, महिपाल लोमरोर, कॅमरून ग्रीन, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), स्वप्नील सिंग, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज आणि लॉकी फर्ग्युसन
- इम्पॅक्ट खेळाडू : अनुज रावत, सुयश प्रभुदेसाई, विजयकुमार वैशाक, यश दयाल, मयंक डागर
- पंजाब किंग्ज : जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), प्रभसिमरन सिंग, रिले रॉसो, शशांक सिंग, सॅम कुरन (कर्णधार), आशुतोष शर्मा, हर्षल पटेल, राहुल चहर, विद्वथ कवेरप्पा आणि अर्शदीप सिंग
- इम्पॅक्ट खेळाडू : हरप्रीत बरार, तनय थियागराजन, ऋषी धवन, जितेश शर्मा आणि नॅथन एलिस
हेही वाचा :