ETV Bharat / sports

मुंबई इंडियन्सचा 'उन्हाळा' संपला! IPL 2024 चा पहिला दणदणीत विजय; दिल्लीला 29 धावांनी दिला पराभवाचा धक्का - MI VS DC IPL 2024

MI VS DC IPL 2024 : आयपीएल 2024 मधील 20 वा सामना हा मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात मुंबई समोर दिल्ली कॅपिटल्सचा मोठा पराभव झाला. मुंबई इंडियन्सनं 17 व्या सीझनमधील पहिला विजय नावावर केला आहे. मुंबई इंडियन्सनं तब्बल 29 धावांनी सामना जिंकला.

IPL 2024 चा पहिला दणदणीत विजय
IPL 2024 चा पहिला दणदणीत विजय
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 7, 2024, 2:23 PM IST

Updated : Apr 7, 2024, 7:52 PM IST

नवी दिल्ली MI VS DC IPL 2024 : आयपीएल 2024 मधील 20 वा सामना हा मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झाला. सामन्यापूर्वी झालेला टॉस दिल्ली कॅपिटल्सनं जिंकला आणि त्यांनी प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. मुंबई इंडियन्सकडून प्रथम फलंदाजी करताना रोहित शर्मानं 49, टीम डेव्हिडनं 45, ईशान किशननं 42, तिलक वर्मानं 6, हार्दिक पंड्यानं 39 तर रोमॅरियो शेफर्डनं अवघ्या 10 बॉलमध्ये 39 धावा केल्या. रोमॅरियो शेफर्डनं शेवटच्या ओव्हरमध्ये तब्बल 32 धावांची खेळी केली. दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांना मुंबईच्या 5 विकेट्स घेण्यात यश आलं. अक्षर पटेल आणि अन्रीचं नॉर्टेजने प्रत्येकी 2 तर खलील अहमदने एक विकेट घेतली. मुंबई इंडियन्सने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 234 धावा केल्या आणि दिल्ली कॅपिटल्सला विजयासाठी 235 धावांचं आव्हान दिलं होतं.

जेराल्ड कोएत्झीकडून 3 विकेट्स : दिल्ली कॅपिटल्सकडून विजयाचे आव्हान पूर्ण करताना डेव्हिड वॉर्नरनं 10, पृथ्वी शॉनं 66 , रिषभ पंतनं 1, अभिषेक पोरलने 41, ट्रिस्टन स्टब्सनं 71 आणि अक्षर पटेलनं 8 धावांची कामगिरी केली. परंतु मुंबई इंडियन्सनं विजयासाठी दिलेले आव्हान दिल्ली कॅपिटल्स पूर्ण करू शकली नाही आणि त्यांचा पराभव झाला. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना दिल्ली कॅपिटल्सच्या 8 विकेट्स घेण्यात यश आलं होतं. दिल्ली कॅपिटल्सला विजयासाठी 20 व्या षटकात 34 धावांची गरज होती. डीसीचे फलंदाज 6 चेंडूत 34 धावा करू शकले नाहीत आणि केवळ 7 धावा करू शकले आणि सामना 28 धावांनी गमावला. या षटकात डीसीला प्रथम ललित यादव (3) आणि त्यानंतर पदार्पण करणाऱ्या कुमार कुशाग्रा (0) आणि जे रिचर्डसन (2) यांच्या रूपाने तीन झटके बसले. यासह जेराल्ड कोएत्झीनेही 3 विकेट्स आपल्या नावावर केल्या.

फक्त ८ धावा : जसप्रीत बुमराहने 17 व्या षटकात फक्त ८ धावा दिल्या, त्यामुळे एमआयचा विजय जवळपास निश्चित झाला. कारण दिल्लीला शेवटच्या 12 चेंडूत 55 धावा करायच्या होत्या. शेवटच्या दोन षटकांत मुंबईच्या गोलंदाजांनी सामन्यावर नियंत्रण ठेवले होते, त्यामुळे डीसीला 29 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. अखेरच्या षटकात जेराल्ड कोएत्झीने दिल्लीच्या 3 फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवून आपल्या संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.

शेफर्डला सामनावीराचा पुरस्कार : या सामन्यात दिल्लीकडून पृथ्वी शॉने 66 धावा, अभिषेक पोरेलने 41 धावा आणि ट्रिस्टन स्टब्सने नाबाद 71 धावा केल्या. मुंबईसाठी या सामन्यात जेराल्ड कोएत्झीने सर्वाधिक ३ बळी घेतले तर जसप्रीत बुमराहनेही २ बळी घेतले. मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्माने 49 धावा, इशान किशनने 42 धावा, हार्दिक पांड्याने 39 धावा, टीम डेव्हिडने नाबाद 45 आणि रोमॅरियो शेफर्डने 39 धावा केल्या. दिल्लीकडून अक्षर पटेल आणि ॲनरिक नॉर्टजे यांनी २-२ बळी घेतले. या सामन्यात रोमॅरियो शेफर्डला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. त्याने बॉल आणि बॅटने चमकदार कामगिरी केली.

दोन्ही संघांचं संभाव्य प्लेइंग 11 :

  • दिल्ली कॅपिटल्स : पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ऋषभ पंत (यष्टीरक्षक/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, रसिक दार सलाम, एनरिच नॉर्टजे, इशांत शर्मा, खलील अहमद.
  • मुंबई इंडियन्स : इशान किशन (यष्टीरक्षक), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, गिराल्ड कोएत्झी, शम्स मुलानी, पियुष चावला, जसप्रीत बुमराह, क्वेना माफाका.

हेही वाचा :

  1. गतविजेत्या चेन्नईचा सलग दुसरा पराभव; तर घरच्या मैदानावर हैदराबादच्या विजयाचा 'अभिषेक' - SRH vs CSK
  2. 'जॉस' द 'बॉस'! बलटरच्या शतकापुढं कोहलीचं 'संथ' शतक व्यर्थ; राजस्थानच्या विजयाचा 'चौकार' - RR vs RCB

Last Updated : Apr 7, 2024, 7:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.