ETV Bharat / sports

मुंबई इंडियन्सचा 18 धावांनी पराभव करत केकेआर ठरला प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ - KKR vs MI

IPL 2024 KKR vs MI : आयपीएलच्या 60 व्या सामन्यात केकेआरने त्यांच्या घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्सचा 18 धावांनी पराभव केला. या विजयानंतर केकेआरचे गुणतालिकेत अव्वल स्थान करत प्लेऑफमध्ये स्थान मिळविलं. तर मुंबईला 13 सामन्यांमध्ये नवव्यांदा पराभवाला सामोरे जावं लागलं आहे.

IPL 2024 KKR vs MI
IPL 2024 KKR vs MI (Desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 11, 2024, 9:41 PM IST

Updated : May 12, 2024, 7:32 AM IST

कोलकाता IPL 2024 KKR vs MI : कोलकाता नाईट रायडर्सच्या (केकेआर) फिरकीपटूंनी केलेल्या अप्रतिम गोलदांजीमुळे मुंबई इंडियन्सला 158 धावांचे आव्हान पूर्ण करता आले नाही. मुंबई इंडियन्सचा संघ 16 षटकांत 8 गडी गमावरून 139 वर गारद झाला. घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्सचा 18 धावांनी पराभव करून प्लेऑफमध्ये पोहोचणारा कोलकाता नाईट रायडर्स हा पहिला संघ ठरला आहे.

पावसामुळे क्रिकेट सामना 16 षटकांचा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाचादेखील मुंबई इंडियन्सला फटका बसला. 158 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर आलेल्या इशान किशनने आक्रमकपणे फलंदाजी केली. केकेआरकडून व्यंकटेश अय्यरन 42 धावा केल्या. मात्र, फिरकी गोलंदाजापुढे मुंबई इंडियन्सनच्या फलंदाजांना सपशेल शरणागती पत्करली. आंद्रे रसेलनं 24 आणि नितीश राणानं 33 धावा केल्या. पियुष चावलानं 2 विकेट घेतल्या.

एमआयकडून इशान किशननं सर्वाधिक 40 धावा केल्या. टिळक वर्मानं 32 धावा करून संघ जिंकण्यासाठी साथ दिली. वरुण चक्रवर्ती, आंद्रे रसेल आणि हर्षित राणा यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. वरुणला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं. व्यंकटेश अय्यरच्या तडाखेबंद फलंदाजीनं कोलकाता नाईट रायडर्सनं ईडन गार्डन्सवर इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 मध्ये मुंबई इंडियन्सला पराभूत केलं. मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर इरफान पठाणनं एक्स मीडियावर पोस्ट करत नाराजी व्यक्त केली. रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या यांचा फॉर्म चिंताजनक असून त्यांनी चांगलं खेळावं, अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली.

मुंबईची प्रथम गोलंदाजी : या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. केकेआरनं चालू आयपीएल हंगामात आतापर्यंत 11 पैकी 8 सामने जिंकले आहेत. तर दुसरीकडे, मुंबईनं 12 पैकी केवळ 4 सामने जिंकले असून ते प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर झाले आहेत. या सामन्यासाठी मुंबई इंडियन्सनं आपल्या संघात कोणताही बदल केलेला नाही. दुसरीकडं, उपकर्णधार नितीश राणा केकेआरच्या प्लेइंग-11 मध्ये परतलाय. त्यामुळं अंगकृष्ट रघुवंशीला बाहेर बसावं लागलं.

मुंबईचं पारडं जड : इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आतापर्यंत 33 सामने खेळले गेले आहेत. यात मुंबई इंडियन्सनं 23 सामने जिंकले. तर कोलकाता नाईट रायडर्सनं केवळ 10 सामने जिंकले. चालू मोसमात दोन्ही संघ दुसऱ्यांदा आमनेसामने आले आहेत. यापूर्वी 3 मे रोजी वानखेडे स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये सामना झाला होता, ज्यात कोलकाता नाईट रायडर्सनं 24 धावांनी विजय मिळवला होता.

  • मुंबई इंडियन्सची प्लेइंग 11 : इशान किशन (यष्टीरक्षक), नमन धीर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नेहल वढेरा, हार्दिक पंड्या (कर्णधार), टीम डेव्हिड, अंशुल कंबोज, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा.
  • कोलकाता नाइट रायडर्सची प्लेइंग 11 : फिल सॉल्ट (यष्टीरक्षक), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, नितीश राणा, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती

हेही वाचा :

  1. एका युगाचा अंत! इंग्लंडच्या महान वेगवान गोलंदाजाची रिटायरमेंट घोषणा; सचिनचा 'हा' विक्रम राहणार अबाधित - James Anderson
  2. दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का; कर्णधार ऋषभ पंत एका सामन्यासाठी निलंबित, काय आहे नेमकं प्रकरण? - Rishabh Pant

Last Updated : May 12, 2024, 7:32 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.