दिल्ली Mohit Sharma : इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात एका स्पेलमध्ये सर्वाधिक धावा देण्याचा लाजिरवाणा विक्रम गुजरात टायटन्सच्या मोहित शर्माच्या नावावर नोंदवला गेलाय. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर बुधवारी झालेल्या दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यात मोहित शर्मानं त्याच्या चार षटकांत 73 धावा दिल्या. ऋषभ पंत आणि ट्रिस्टन स्टब्सनं मोहितच्या शेवटच्या षटकात 31 धावा काढल्या आणि त्याच्या गोलंदाजीचा आकडा 4-0-73-0 वर नेला.
- यापूर्वी हा लाजिरवाणा विक्रम वेगवान गोलंदाज बासिल थम्पीच्या नावावर होता. त्यानं 2018 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरविरुद्ध सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना चार षटकांत 70 धावा दिल्या होत्या.
शेवटच्या षटकात चोपल्या 31 धावा : गुजरातविरुद्धच्या सामन्यात दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतनं या मोसमातील सर्वोत्तम खेळी खेळली. त्याची फलंदाजी इतकी आक्रमक होती की, त्यामुळं गुजरातचा वेगवान गोलंदाज मोहित शर्माच्या आयपीएल कारकिर्दीवरच मोठा डाग पडलाय. मोहित शर्मानं या डावातील शेवटचं षटक टाकलं. यावेळी ऋषभ पंत स्ट्राइकवर होता. मोहित शर्मानं या षटकात एकूण 31 धावा दिल्या. वाईड बॉलमधून 1 धाव आणि ऋषभ पंतच्या बॅटमधून 30 धावा आल्या. या षटकात ऋषभ पंतनं 1 चौकार आणि 4 षटकार ठोकले. पंत या डावात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्यानं 43 चेंडूत नाबाद 88 धावा केल्या. यात त्यानं 5 चौकार आणि 8 षटकार मारले.
आयपीएल इतिहासातील सर्वात महागडे स्पेल :
- 0/73 - मोहित शर्मा (GT) विरुद्ध DC, दिल्ली, 2024
- 0/70 - बेसिल थंपी (SRH) विरुद्ध RCB, बेंगळुरु, 2018
- 0/69 - यश दयाल (GT) विरुद्ध KKR, अहमदाबाद, 2023
- 1/68 - रीस टोपली (RCB) विरुद्ध SRH, बेंगळुरु, 2024
- 0/66 - क्वेना माफाका (MI) विरुद्ध SRH, हैदराबाद, 2024
आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा 50+ धावा देणारे गोलंदाज :
- 7 वेळा - मोहित शर्मा
- 6 वेळा - मोहम्मद शमी
- 6 वेळा - भुवनेश्वर कुमार
- 6 वेळा - ख्रिस जॉर्डन
- 6 वेळा - उमेश यादव
हेही वाचा :