चेन्नई IPL 2024 Final : इंडियन प्रीमियर लीग (IPL) हंगामाच्या अंतिम सामना कोलकाता नाइट रायडर्स (KKR) चा सामना सनरायझर्स हैदराबाद (SRH) सोबत होणार आहे. चेन्नईच्या एम ए चिदंबरम मैदानावर हा सामना खेळवण्यात येत आहे. केकेआर संघाची कमान श्रेयस अय्यरकडे आहे, तर पॅट कमिन्स हैदराबाद संघाचं नेतृत्व करत आहे. दोन्ही संघांमध्ये मागील सामना क्वालिफायर-1 मध्ये झाला. कोलकातानं हा सामना 38 चेंडू बाकी असताना 8 गडी राखून जिंकला होता.
केकेआरचा एकतर्फा विजय : या सामन्यात हैदराबाद संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 114 धावांचं सोपं लक्ष्य दिलं. प्रत्युत्तरात केकेआर संघानं 2 गडी गमावून अवघ्या 10.3 षटकांत सामना आणि विजेतेपद पटकावलं. संघाकडून व्यंकटेश अय्यरनं 26 चेंडूत 52 धावांची नाबाद खेळी केली. तर रहमानउल्ला गुरबाजनं 32 चेंडूत 39 धावा केल्या. हैदराबादकडून पॅट कमिन्स आणि शाहबाज अहमद यांनी 1-1 विकेट घेतली.
केकेआर तिसऱ्यांदा विजेता : केकेआरनं यापूर्वी 2012 आणि 2014 च्या आयपीएल हंगामात अंतिम फेरीत प्रवेश केला होता आणि गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली दोन्ही वेळा विजेतेपद पटकावलं होतं. यानंतर, 2021 च्या हंगामात, ते इऑन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली अंतिम फेरीत पोहोचले, मात्र त्यांना चेन्नई सुपर किंग्जकडून पराभवाचा सामना करावा लागला. केकेआर संघाचा हा चौथा अंतिम सामना होता, आणि कोलकातानं तिसरं विजेतेपद पटकावलंय.
अंतिम सामन्यात सामन्यात सर्वात कमी धावा : हैदराबादचा संघ आयपीएलच्या इतिहासातील कोणत्याही अंतिम सामन्यात सर्वात कमी धावा करणारा संघ ठरला आहे. त्यांनी चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) विक्रम मोडला आहे. याआधी चेन्नई संघानं 2013 च्या फायनलमध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध 9 विकेट्सवर 125 धावा केल्या होत्या. हा सामना ईडन गार्डन्सवर झाला होता.
स्टार्क-हर्षितसह रसेलच्या गोलंदाजीचा कहर : या सामन्यात हैदराबाद संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो चुकीचा ठरला. संघाची सुरुवात खूपच खराब झाली आणि 18.3 षटकांत 113 धावा केल्यानंतर त्यांचा डाव संपुष्टात आला. या सामन्यात केकेआर संघाचे गोलंदाज पूर्णपणे वरचढ दिसत होते. त्यांच्यासमोर हैदराबादसाठी कर्णधार पॅट कमिन्सनं 24 आणि एडन मार्करामनं सर्वाधिक 20 धावा केल्या. त्यांच्याशिवाय अन्य कोणत्याही फलंदाजाला 20 धावांचा आकडाही गाठता आला नाही. त्यांच्यानंतर हेनरिक क्लासेननं 16 धावा केल्या. तर केकेआर संघाकडून वेगवान गोलंदाज आंद्रे रसेलनं सर्वाधिक 3 बळी घेतले. तर मिचेल स्टार्क आणि हर्षित राणा यांनी 2-2 विकेट घेतल्या. वैभव अरोरा, सुनील नरेन आणि वरुण चक्रवर्ती यांनीही प्रत्येकी 1 बळी घेतला.
आयपीएलच्या अंतिम सामन्यात सर्वात कमी धावसंख्या :
- 113 SRH विरुद्ध KKR चेन्नई 2024 *
- 125/9 CSK विरुद्ध MI कोलकाता 2013
- 128/6 RPS विरुद्ध MI हैदराबाद 2017
- 129/8 MI विरुद्ध RPS हैदराबाद 2017
केकेआर तिनदा तर हैदराबाद एकदा विजयी : केकेआरनं यापूर्वी 2012 आणि 2014 च्या आयपीएल हंगामात अंतिम फेरीत प्रवेश केला होता आणि गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली दोन्ही वेळा विजेतेपद पटकावलं होतं. यानंतर, 2021 च्या हंगामात, ते इऑन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली अंतिम फेरीत पोहोचले, मात्र चेन्नई सुपर किंग्जकडून ते पराभूत झाले. केकेआरनं आता चौथ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. केकेआरनं हा अंतिम सामना जिंकत तिसरं विजेतेपद पटकावलंय. दुसरीकडं, सनरायझर्स हैदराबादनं आतापर्यंत फक्त एकदाच विजेतेपद पटकावलंय. डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली 2016 च्या हंगामात त्यांनी विजय मिळावला होता. तेव्हा त्यांनी अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगलुरुचा पराभव केला. तसंच 2009 मध्ये देखील हैदराबाद संघानं विजेतेपद पटकावलं होतं, परंतु तेव्हा त्याचं नाव डेक्कन चार्जर्स होतं आणि फ्रेंचायझीचे मालक (गायत्री रेड्डी) देखील वेगळे होते.
हैदराबादविरुद्ध केकेआरचं पारडं जड : हैदराबादविरुद्ध कोलकाता संघाचं पारडं नेहमीच जड राहिलंय. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 27 सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी 18 सामने केकेआरनं जिंकले आहेत. तर हैदराबादनं केवळ 9 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. गेल्या 5 सामन्यांतही (हा सामना वगळता) केकेआरचं वर्चस्व दिसून आलं असून त्यांनी 3 सामने जिंकले आहेत आणि 2 गमावले आहेत.
हैदराबाद विरुद्ध कोलकाता हेड-टू-हेड :
- एकूण सामने : 27
- कोलकाता विजयी : 18
- हैदराबाद जिंकले : 9
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन :
- कोलकाता नाइट रायडर्स : रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती
- इम्पॅक्ट खेळाडू : अनुकुल रॉय, मनीष पांडे, नितीश राणा, केएस भरत, शेरफेन रदरफोर्ड.
- सनरायझर्स हैदराबाद : ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, नितीश रेड्डी, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट आणि टी. नटराजन
- इम्पॅक्ट खेळाडू : उमरान मलिक, ग्लेन फिलिप्स, मयंक मार्कंडे, अब्दुल समद, वॉशिंग्टन सुंदर.
हेही वाचा :