ETV Bharat / sports

जसप्रीत बुमराह प्रतिस्पर्धी फलंदाजांसाठी ठरतोय 'कर्दनकाळ'; टी 20 विश्वचषकातील आकडेवारी एकदा पाहाच... - T20 World Cup 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 22, 2024, 7:15 PM IST

Jasprit Bumrah In T20 World Cup 2024 : वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या टी 20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गेलंदाज जसप्रीत बुमराह हा प्रतिस्पर्धी संघांच्या फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरतोय.

Jasprit Bumrah In T20 World Cup 2024
जसप्रीत बुमराह (Social Media)

हैदराबाद Jasprit Bumrah In T20 World Cup 2024 : अमेरिका-वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या टी 20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाची विजयी घौडदौड सुरुच आहे. साखळी टप्प्यातील सामन्यांमध्ये भारतीय संघानं पाकिस्तान, आयर्लंड आणि अमेरिकेचा पराभव केला. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं सुपर-8 फेरीचीही शानदार सुरुवात केली. सुपर-8 फेरीच्या पहिल्या सामन्यात भारतानं शेजारी अफगाणिस्तानचा एकहाती पराभव केला. संघाच्या विजयात भारतीय फलंदाजांव्यतिरिक्त गोलंदाजही आपलं काम चोख बजावत आहेत. पण या स्पर्धेतील वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या कामगिरीची आकडेवारी आश्चर्यचकीत करणारी आहे.

जसप्रीत बुमराहची आकडेवारी : या टी 20 विश्वचषकातील जसप्रीत बुमराहच्या कामगिरीची आकडेवारी जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. या स्पर्धेत आतापर्यंत जसप्रीत बुमराहनं 15 षटकं गोलंदाजी केली. बुमराहच्या गोलंदाजीवर विरोधी संघाचे फलंदाज केवळ 3 चौकार आणि 1 षटकार मारु शकले आहेत. तसंच जसप्रीत बुमराहनं विरोधी संघातील 8 फलंदाजांच्या विकेट घेतल्या आहेत. जसप्रीत बुमराह ज्या प्रकारे महत्त्वाच्या प्रसंगी भारतासाठी विकेट घेण्यासह धावा रोखण्याचंही काम करत आहेत, त्यावरुन तो या स्पर्धेत भारतासाठी हुकमी एक्का ठरत आहे, हे नक्की.

भारतासमोर बांगलादेशचं आव्हान : आज भारतीय संघ सुपर-8 फेरीतील आपला दुसरा सामना खेळणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघासमोर आज बांगलादेशचं आव्हान असेल. यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने येतील. 24 जून रोजी हे दोन्ही संघ भिडतील. मात्र, आजच्या सामन्यात बांगलादेशला हरवून उपांत्य फेरीतील आपला मार्ग सोपा करण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असणार आहे. सध्या ऑस्ट्रेलिया ग्रुप-1 मध्ये अव्वल स्थानावर आहे. तर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाचे समान 2-2 गुण असले तरी ऑस्ट्रेलियाचा रनरेट चांगला आहे. आज जर भारतीय संघ बांगलादेशला पराभूत करण्यात यशस्वी ठरला तर तो गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचेल.

हेही वाचा :

  1. टी 20 विश्वचषकातील भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यापूर्वी पंतप्रधान मोदींच्या दोन्ही संघांना शुभेच्छा, म्हणाले... - t20 world cup 2024
  2. बांगलादेशसमोर टीम इंडियाचा विजयी रथ रोखण्याचं आव्हान; कोणाचं पारडं जड? जाणून घ्या हेड टू हेड रेकॉर्ड - T20 World Cup 2024
  3. दक्षिण आफ्रिकेनं इंग्लंडच्या जबड्यातून हिसकावला विजयाचा 'घास'; हॅरी ब्रूकची झंझावाती खेळी व्यर्थ - T20 World Cup 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.