ETV Bharat / sports

'टाय' होऊनही 'सुपर ओव्हर' का नाही झाली? काय आहे नियम, आतापर्यंत किती सामने झाले 'टाय'? जाणून घ्या.... - IND vs SL 1st ODI Match Tie

author img

By ETV Bharat Sports Team

Published : Aug 3, 2024, 9:12 AM IST

Updated : Aug 3, 2024, 12:29 PM IST

IND vs SL 1st ODI Match Tie : भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला शुक्रवारी सुरुवात झाली. कोलंबो येथे झालेल्या मालिकेतील पहिला सामना टाय झाला.

IND vs SL 1st ODI Match Tie
भारत विरुद्ध श्रीलंका (File Photo)

कोलंबो IND vs SL 1st ODI Match Tie : भारत विरुद्ध श्रीलंका पहिल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेनं 8 गडी गमावून 230 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाला अंतिम टप्प्यात शिवम दुबे विजय मिळवून देईल, असं वाटत होतं, परंतु तो एलबीडब्ल्यू आऊट झाल्यानं भारतीय संघ 230 धावांवर गारद झाला. त्यामुळं हा सामना बरोबरीत सुटला. कर्णधार रोहित शर्मानं खेळलेली अर्धशतकी खेळी व्यर्थ ठरली.

सुपर ओव्हर का नाही? : भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेतील शेवटचा सामना टाय झाला तेव्हा सुपर ओव्हर खेळवण्यात आली होती. भारतानं पहिले दोन सामने जिंकून मालिका काबीज केली असली तरीही सुपर ओव्हरचं आयोजन करण्यात आलं होतं. पण अशी परिस्थिती वनडे सामन्याच्या पहिल्या सामन्यात पाहायला मिळाली आणि सुपर ओव्हर खेळवण्यात आली नाही. आयसीसीच्या नियमांनुसार, एकदिवसीय क्रिकेटमध्ये सुपर ओव्हर एकतर बाद फेरीत किंवा बहुराष्ट्रीय स्पर्धेत खेळवली जाते. भारत आणि श्रीलंका यांच्यात द्विपक्षीय मालिका खेळवली जात आहे. त्यामुळंच सामना टाय झाल्यानंतरही सुपर ओव्हरचे आयोजन करण्यात आलं नाही.

एक धाव दूर : भारत आणि श्रीलंका क्रिकेट संघादरम्यान तीन एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी आर प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो येथे खेळला गेला.‌ मात्र, हा सामना बरोबरीत सुटला. श्रीलंकेनं प्रथम फलंदाजी करत 50 षटके खेळत 8 गडी गमावून 230 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघानं सुरुवात चांगली केली. पण रोहित शर्मा बाद झाला. यानंतर सामना फिरला. भारतीय संघाच्या ठराविक अंतराने विकेट पडत गेल्या आणि भारतीय संघ सामना जिंकण्यापासून एक धाव दूर राहिला. भारतीय संघ 47.5 षटकांत 230 धावांवर सर्वबाद झाला. या सामन्यात सुपर ओव्हर खेळवली गेली नाही, परिणामी तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना टाय म्हणून घोषित करण्यात आला. श्रीलंकेच्या ड्युनिथ वेललागेला त्याच्या चमकदार कामगिरीसाठी सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

44 सामने टाय : एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहास भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय सामना होईपर्यंत 4572 एकदिवसीय सामने झाले. यापैकी फक्त 44 सामने टाय झाले आहेत.

हेही वाचा -

  1. मनू भाकर 'मेडल हॅटट्रिक'च्‍या लक्ष्‍यभेदासाठी सज्‍ज; तिरंदाजीतही 'निशाणा' लागण्याची शक्यता - Paris Olympics 2024
  2. भारतीय तिरंदाजांचे 'तीर' भरकटले; चौथ्या कांस्यपदकाची थोडक्यात हुलकावणी - Paris Olympics 2024
  3. भारतीय हॉकी संघाचा ऑस्ट्रेलियावर विजय; ऑलिम्पिकमध्ये 52 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाला धोबीपछाड - Paris Olympics 2024
Last Updated : Aug 3, 2024, 12:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.