अहमदाबाद INDW vs NZW Live Streaming : भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध न्यूझीलंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक वनडे सामना आज 29 ऑक्टोबर (मंगळवार) रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल. ही मालिका सध्या 1-1 नं बरोबरीत असून हा सामना जिंकत मालिका जिंकण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल.
The final battle for the ODI series win! Watch LIVE in NZ on @skysportnz 📺 #INDvNZ #CricketNation pic.twitter.com/Yw0uHjP1qb
— WHITE FERNS (@WHITE_FERNS) October 29, 2024
दुसऱ्या वनडेत कीवींचा विजय : दुसऱ्या वनडे सामन्यात न्यूझीलंडच्या महिलांनी प्रथम फलंदाजी करताना 76 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात न्यूझीलंडनं 9 गड्यांच्या मोबदल्यात 259दुस धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. त्यांच्या सलामीवीर सुझी बेट्स आणि जॉर्जिया प्लिमर यांनी चांगली खेळी केली, तर कर्णधार सोफी डिव्हाईननं फलंदाजी आणि गोलंदाजीत चमकदार कामगिरी करत 79 धावा केल्या आणि तीन गडी बाद केले. मॅडी ग्रीननंही 41 चेंडूत 42 धावांची जलद खेळी खेळली. प्रत्युत्तरात लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय महिला संघ 183 धावांत सर्वबाद झाला. भारताकडून राधा यादवनं सर्वाधिक 48 धावा केल्या, तर सायमा ठाकूरनं 29 धावा जोडल्या आणि 4 विकेट घेतल्या.
दोन्ही संघाचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : वनडे सामन्यांमध्ये भारतीय महिला आणि न्यूझीलंडच्या महिला संघ आतापर्यंत 56 वेळा आमनेसामने आले आहेत, त्यापैकी 21 वेळा भारतानं विजय मिळवला आहे, तर न्यूझीलंडनं 34 सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांमध्ये चुरशीचा सामना अपेक्षित आहे.
Series levelled! Wickets shared across the bowlers with Sophie Devine (3-27) & Lea Tahuhu (3-42) the top wicket-takers. Scorecard | https://t.co/dytfzaMjB4 #INDvNz #CricketNation 📷 = BCCI pic.twitter.com/XBqt4DLv4M
— WHITE FERNS (@WHITE_FERNS) October 27, 2024
खेळपट्टी कशी असेल : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टी पहिल्या डावात वेगवान गोलंदाजांना सीमची हालचाल होणार नाही. त्यामुळं, फलंदाज मध्यभागी वेळ घालवतील आणि मैदानावरील निर्बंधांचा फायदा घेतील. तथापि, जसजसा खेळ पुढं जाईल, तसतसा चेंडू पिच केल्यानंतर थोडासा थांबू शकतो. त्यामुळं वेगवान गोलंदाज अधिक कटर आणि हळू चेंडू टाकतील, ज्यामुळं फिरकीपटूंना खेळपट्टीवरून भरपूर वळण मिळेल. उत्तरार्धात फलंदाजी करणं कठीण होईल, त्यामुळं नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करण्याची शक्यता आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तिसरा वनडे सामना कधी खेळला जाईल?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा वनडे सामना मंगळवार, 29 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी 1:30 वाजता खेळवला जाईल.
भारत आणि न्यूझीलंड तिसऱ्या वनडे सामन्याचं थेट प्रक्षेपण आणि लाईव्ह स्ट्रीमिंग कुठं पाहता येईल?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या वनडे सामन्याचं थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स 18 चॅनेलवर उपलब्ध असेल. तर जिओ सिनेमावर लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल. अशा परिस्थितीत चाहत्यांना सामन्याचा आनंद घेता येईल.
Frames from a great day out in Ahmedabad. Scorecard | https://t.co/dytfzaLLLw #INDvNZ #CricketNation 📷 = BCCI pic.twitter.com/gj30PXa498
— WHITE FERNS (@WHITE_FERNS) October 28, 2024
सामन्यासाठी दोन्ही संघ :
भारतीय महिला संघ : स्मृती मानधना, शफाली वर्मा, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, डेलन हेमलता, दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया (यष्टिरक्षक), श्रेयंका पाटील, राधा यादव, रेणुका ठाकूर सिंग, अरुंधती रेड्डी, तेजल हसबनीस, सायली सातघरे. सायमा ठाकोर, उमा छेत्री, प्रिया मिश्रा
न्यूझीलंड महिला संघ : सुझी बेट्स, जॉर्जिया प्लिमर, अमेलिया केर, सोफी डिव्हाईन (कर्णधार), ब्रुक हॅलिडे, मॅडी ग्रीन, इसाबेला गेज (यष्टिरक्षक), लॉरेन डाउन, पॉली इंग्लिस, फ्रॅन जोनास, ली ताहुहू, हन्ना रो, जेस केर, मॉली पेनफोल्ड, ईडन कार्सन.
हेही वाचा :