ETV Bharat / sports

'सर' रवींद्र जडेजा... मुंबईत न्यूझीलंडविरुद्ध रचला इतिहास, अव्वल 5 मध्ये मिळवलं स्थान - HIGHEST WICKET TAKER FOR INDIA

भारताचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजानं न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात अप्रतिम कामगिरी केली आहे. या सामन्याच्या पहिल्या डावात त्यानं 5 विकेट्स घेतल्या.

Ravindra Jadeja 5th Highest Wicket Taker
रवींद्र जडेजा (AP Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : Nov 1, 2024, 5:14 PM IST

मुंबई Ravindra Jadeja 5th Highest Wicket Taker : भारत आणि न्यूझीलंड क्रिकेट संघ यांच्यात कसोटी मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना खेळला जात आहे. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. आता तिसरा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियम आजपासून सुरु झाला आहे. यात न्यूझीलंडचा संघ प्रथम फलंदाजीला उतरला आणि 235 धावांवर ऑल आऊट झाला. यात भारताकडून रवींद्र जडेजानं सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. या डावात जडेजाची कामगिरी अप्रतिम होती. त्यानं 22 षटकांत 65 धावा देत 5 बळी घेतले. यासह तो एका खास यादीत अव्वल 5 मध्ये पोहोचला आहे.

रवींद्र जडेजाची अप्रतिम कामगिरी : भारतीय संघासाठी दीर्घकाळ कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या जडेजामुळं भारतानं अनेक वेळा सामने जिंकले आहेत. दरम्यान, एका यादीत तो खूप पुढे गेला आहे. भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत जडेजा आता पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. त्याच्या नावावर एकूण 314 विकेट्स झाल्या आहेत. हा सामना सुरु होण्यापूर्वी तो सातव्या स्थानावर होता. त्यानं इशांत शर्मा आणि झहीर खानला एकत्र मागे टाकलं आहे. या दोन्ही गोलंदाजांच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये 311 बळी आहेत. जडेजासाठी हा अभिमानाचा क्षण आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे टॉप 5 भारतीय गोलंदाज :

  • अनिल कुंबळे - 619 विकेट्स
  • आर अश्विन - 533* विकेट्स
  • कपिल देव - 434 विकेट
  • हरभजन सिंग - 417 विकेट्स
  • रवींद्र जडेजा - 314* विकेट्स

जडेजाची कारकीर्द कशी : जडेजाच्या कसोटी क्रिकेटमधील कारकिर्दीवर एक नजर टाकली तर त्यानं फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही बाबतीत अप्रतिम कामगिरी केली आहे. गोलंदाजीत त्यानं 76 सामन्यांच्या 144 डावात 23.96 च्या सरासरीनं 314 बळी घेतले आहेत. याशिवाय त्यांची इकॉनॉमी 2.50 आहे. फलंदाजीबद्दल बोलायचं झाले तर जडेजानं 76 सामन्यांच्या 111 डावात 35.72 च्या सरासरीनं 3215 धावा केल्या आहेत. यात त्याची सर्वोत्तम धावसंख्या 175 धावा आहे. एकूणच, जडेजा हा कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वात महत्त्वाचा खेळाडू आहे.

हेही वाचा :

  1. India vs Pakistan: दिवाळीच्या दिवशीच पाकिस्ताननं केला भारताचा पराभव, फक्त 30 चेंडूत जिंकला सामना
  2. IPL 2025 च्या मेगा लिलावापूर्वी KKR ला मोठा धक्का; 57 कोटी रुपयांत खेळाडूंना रिटेन केल्यावरही पर्समधून 12 कोटींची कपात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.