कोलंबो (श्रीलंका) IND vs SL 2nd Odi Live Streaming : भारतीय क्रिकेट संघ आणि श्रीलंका यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरु आहे. कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर आज उभय संघांमध्ये मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना होणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टी 20 मालिकेत 'क्लीन स्वीप' केल्यानंतर भारतीय संघाचं मनोबल उंचावलं आहे. त्यानंतर मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना टाय झाल्या नंतर आजचा सामना जिंकत मालिकेत आघाडी घेण्याचा दोन्ही संघाचा प्रयत्न असणार आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 2.30 वाजता सुरु होणार आहे. मात्र हा सामना आम्ही तुम्हाला हा सामना कधी, कुठं आणि कसा लाइव्ह पाहता येणार हे सांगणार आहोत. या सामन्याशी संबंधित काही खास माहितीवर एक नजर टाकूया.
A thrilling start to the #SLvIND ODI series.
— BCCI (@BCCI) August 2, 2024
The First ODI ends in a tie.
Scorecard ▶️ https://t.co/4fYsNEzggf#TeamIndia pic.twitter.com/ILQvB1FDyk
- भारत विरुद्ध श्रीलंका दुसरा एकदिवसीय सामना कधी होणार?
भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना आज, 4 ऑगस्ट रोजी दुपारी 2:30 वाजता सुरु होणार आहे.
- भारत विरुद्ध श्रीलंका दुसरा एकदिवसीय सामना कुठे होईल?
भारत विरुद्ध श्रीलंका दुसरा एकदिवसीय सामना आर प्रेमदासा स्टेडियम कोलंबो इथं होत आहे.
- तुम्ही भारत विरुद्ध श्रीलंका दुसरा एकदिवसीय सामना टीव्हीवर कुठे पाहू शकता?
भारत आणि श्रीलंका यांच्यात आज होणारा दुसरा एकदिवसीय सामना तुम्ही सोनी टीव्ही नेटवर्कवर टीव्हीवर पाहू शकता.
- भारत विरुद्ध श्रीलंका दुसऱ्या एकदिवसीय सामन्याचं ऑनलाइन लाईव्ह स्ट्रीमिंग कशावर?
भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या सामन्याचं ऑनलाइन लाईव्ह स्ट्रीमिंग हॉटस्टार किंवा जिओ सिनेमावर नाही तर सोनी लिव्ह ॲपवर केले जाईल.
भारत विरुद्ध श्रीलंका एकगिवसीय मालिकेचं वेळापत्रक :
- पहिला एकदिवसीय : 2 ऑगस्ट, आर प्रेमदासा स्टेडियम, सामना टाय
- दुसरा एकदिवसीय : 4 ऑगस्ट, आर प्रेमदासा स्टेडियम, दुपारी 2:30 वाजता
- तिसरा एकदिवसीय : 7 ऑगस्ट, आर प्रेमदासा स्टेडियम, दुपारी 2:30 वाजता
हेही वाचा :