कोलंबो SL vs IND 3rd ODI : श्रीलंकेने एकदिवसीय मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारताचा 110 धावांनी पराभव केला. भारताला हा सामना जिंकून मालिकेत बरोबरीत करण्याची संधी होती. पण भारताच्या फलंदाजांनी खराब कामगिरी केली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेनं 249 धावांचं लक्ष्य ठेवलं होते. यजमान संघाच्या फिरकीपटूंसमोर भारतीय संघ 26.1 षटकांत 138 धावांत गारद झाला. या विजयासह यजमान श्रीलंका संघाने एकदिवसीय मालिका 2-0 ने खिशात घातली.
🎉 HISTORY MADE! 🇱🇰 Sri Lanka defeats India by 110 runs, clinching the ODI series 2-0! This marks our first ODI series victory against India since 1997! 🦁 A phenomenal team effort. What a moment for Sri Lankan cricket! #SLvIND pic.twitter.com/UY842zKoTb
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) August 7, 2024
टीम इंडियाची फलंदाजी खराब झाली : श्रीलंकेविरुद्धच्या या मालिकेत भारताचे अनेक फलंदाज फ्लॉप ठरले. या सामन्यात रोहित शर्माने संघाला चांगली सुरुवात देण्याचा प्रयत्न केला. त्याने 20 चेंडूत 35 धावा केल्या. यादरम्यान त्याने 6 चौकार आणि 1 षटकार लगावला. शुभमन गिल 6 धावा करून बाद झाला. विराट कोहली 20 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने 18 चेंडूंचा सामना केला आणि 4 चौकार मारले. ऋषभ पंत 6 धावा, श्रेयस अय्यर 8 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. अक्षर पटेल 2 धावा तर रियान पराग 15 धावा करून बाद झाला.
Sri Lanka seal the ODI series 2-0! What a dominant performance from our Lions! 🇱🇰🏆 #SLvIND pic.twitter.com/py9hzveaYz
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) August 7, 2024
अविष्का फर्नांडो दमदार फलंदाजी : प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेनं 50 षटकांत 7 गडी गमावून 248 धावा केल्या. अविष्का फर्नांडोने शानदार फलंदाजी केली. त्यानं 102 चेंडूंचा सामना करत 9 चौकार आणि 2 षटकार ठोकत 96 धावा केल्या. पथुम निसांकानं 45 धावा, कुसल मेंडिस 59 धावा तर कामिंदू मेंडिसने नाबाद 23 धावा केल्या. समरविक्रमा शून्यावर बाद झाला.
Sri Lanka win the Third ODI and the series 2-0.
— BCCI (@BCCI) August 7, 2024
Scorecard ▶️ https://t.co/Lu9YkAmnek#TeamIndia | #SLvIND pic.twitter.com/ORqj6aWvRW
भारताकडून रियान परागने 3 विकेट घेतले : भारताकडून रियान परागने सर्वाधिक विकेट घेतले. त्याने 9 षटकात 54 धावा दिल्या आणि 3 विकेट घेतले. कुलदीप यादवने 10 षटकात 36 धावा देत 1 विकेट घेतला. वॉशिंग्टन सुंदर आणि मोहम्मद सिराज यांनाही 1-1 विकेट मिळाली. अक्षर पटेललाही यश मिळाले.
श्रीलंकेनं इतिहास रचला : श्रीलंकेनं 1997 नंतर प्रथमच भारताविरुद्ध एकदिवसीय सामन्यांची मालिका जिंकली आहे. याआधी ऑगस्ट 1997 मध्ये अर्जुन रणतुंगाच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेच्या संघानं सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा पराभव केला होता.
दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन :
- भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, रायन पराग, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.
- श्रीलंका : अविष्का फर्नांडो, पथुम निसांका, कुसल मेंडिस, सादिरा समरविक्रमा, चारिथ असालंका (कर्णधार), जेनिथ लियानागे, कामिंदू मेंडिस, दुनिथ वेलालागे, महिश तिखिना, जेफ्री वांडर्से, असिथा फर्नांडो.