ब्रिजटाऊन (बार्बाडेस) IND vs SA T20 World Cup Final : टी-20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून विजेतेपदावर कब्जा केला. बार्बाडोस इथं खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतानं आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषकावर नाव कोरत इतिहास रचला. यापूर्वी भारतीय संघानं 2007 मध्ये महेंद्रसिगं धोनीच्या नेतृत्वाखाली पहिलाच टी-20 विश्वचषक जिंकला होता.
The celebrations have begun in Barbados 🥳
— BCCI (@BCCI) June 29, 2024
A round of applause for the ICC Men's T20 World Cup 2024 winning side - Team INDIA 🇮🇳🙌#T20WorldCup | #TeamIndia | #SAvIND pic.twitter.com/OElawo7Xha
अंतिम सामन्यात भारतीय संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतानं आपल्या निर्धारित 20 षटकात 7 बाद 176 धावांची मजल मारली. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्याच षटकात पहिला धक्का बसला. जसप्रीत बुमराहनं रिझा हेंड्रिक्सला बोल्ड केलं. यानंतर अर्शदीपनं मार्करमला बाद करत आफ्रिकेला दुसरा धक्का दिला. मात्र यानंतर क्विंटन डी कॉक आणि ट्रिस्टन स्टब्स यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली. मात्र यानंतर अक्षर पटेलनं स्टब्सला बाद करत ही जोडी तोडली. यानंतर क्विंटन डी कॉकनं आक्रमक फटके मारायला सुरुवात केली. मात्र धोकादायक वाटणाऱ्या क्विंटन डी कॉकला अर्शदीपनं बाद केलं. यानंतर हेनरिक क्लासेननं आक्रमक अर्धशतक करत आपल्या संघाला विजयाच्या समीप नेलं. मात्र आफ्रिकेला विजय मिळवता आला नाही.
Pure Joy and Emotions 🥹 🥳#T20WorldCup | #TeamIndia | #SAvIND pic.twitter.com/WBrLOoEbd4
— BCCI (@BCCI) June 29, 2024
कोहलीचं शानदार अर्धशतक : अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघानं 7 गडी गमावून 176 धावा केल्या. एकवेळ भारतीय संघानं 34 धावांत 3 विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर विराट कोहलीनं सावध खेळ करत पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अक्षर पटेलसोबत 72 धावांची भागीदारी केली. यानंतर कोहलीनं 48 चेंडूत आपलं अर्धशतक केले. त्याचं या विश्वचषकातील हे पहिलंच अर्धशतक होतं. कोहलीनं 59 चेंडूत एकूण 76 धावा केल्या. तर अक्षर 31 चेंडूत 47 धावा करुन बाद झाला. शेवटी शिवम दुबेनं 16 चेंडूत 27 धावा केल्या. दुसरीकडे, आफ्रिकेकडून फिरकी गोलंदाज केशव महाराज आणि वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्सियानं प्रत्येकी 2 बळी घेतले. तर मार्को जॅनसेन आणि कागिसो रबाडा यांनी 1-1 विकेट घेतली. आतापर्यंत झालेल्या टी 20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील ही सर्वाधिक धावसंख्या आहे. यापुर्वी ऑस्ट्रेलियानं 2021 च्या टी 20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात न्युझीलंडविरुद्ध 173 धावा केल्या होत्या. हा विक्रम भारतीय संघानं मोडला आहे.
Just two modern-day legends posing with the ICC Men's T20 World Cup Trophy 😊🏆#T20WorldCup | #TeamIndia | #SAvIND | @ImRo45 | @imVkohli pic.twitter.com/AGmPsR7pAK
— BCCI (@BCCI) June 29, 2024
टी 20 विश्वचषक 2024 मध्ये भारतीय संघाचा प्रवास :
- सामना क्रमांक 1: भारतानं 46 चेंडू बाकी असताना आयर्लंडचा 8 गडी राखून पराभव केला.
- सामना क्रमांक 2: न्यूयॉर्कमध्ये भारतानं पाकिस्तानचा 6 धावांनी पराभव केला
- सामना क्रमांक 3: भारतानं अमेरिकेविरुद्धचा सामना 10 चेंडू शिल्लक असताना 7 विकेटनं जिंकला.
- सामना क्रमांक 4: फ्लोरिडामध्ये कॅनडासोबतचा भारताचा सामना पावसामुळं रद्द झाला
- सामना क्रमांक 5: भारतानं अफगाणिस्तानचा 47 धावांनी पराभव केला.
- सामना क्रमांक 6: भारतानं बांगलादेशचा 50 धावांनी पराभव केला.
- सामना क्रमांक 7: भारतानं ऑस्ट्रेलियाचा 24 धावांनी पराभव केला.
- सामना क्रमांक 8: भारतानं उपांत्य फेरीत इंग्लंडचा 68 धावांनी पराभव केला. (उपांत्य फेरी)
𝗖.𝗛.𝗔.𝗠.𝗣.𝗜.𝗢.𝗡.𝗦 🏆#TeamIndia 🇮🇳 HAVE DONE IT! 🔝👏
— BCCI (@BCCI) June 29, 2024
ICC Men's T20 World Cup 2024 Champions 😍#T20WorldCup | #SAvIND pic.twitter.com/WfLkzqvs6o
टी 20 विश्वचषक 2024 मध्ये दक्षिण आफ्रिका संघाचा प्रवास :
- सामना क्रमांक 1: न्यूयॉर्क इथं श्रीलंकेचा 6 गडी राखून पराभव केला
- सामना क्रमांक 2: न्यूयॉर्क इथं नेदरलॅंड्सचा 4 गडी राखून पराभव केला
- सामना क्रमांक 3: न्यूयॉर्क इथं बांगलादेशचा 4 धावांनी पराभव केला
- सामना क्रमांक 4: सेंट व्हिन्सेंट इथं नेपाळचा 1 धावानं पराभव केला
- सामना क्रमांक 5: अँटिग्वा इथं अमेरिकेचा 18 धावांनी पराभव केला
- सामना क्रमांक 6: सेंट लुसिया इथं इंग्लंडचा 7 धावांनी पराभव केला
- सामना क्रमांक 7: अँटिग्वा इथं वेस्ट इंडिजचा 3 गडी राखून पराभव केला (DLS)
- सामना क्रमांक 8: त्रिनिदाद इथं अफगाणिस्तानचा 9 गडी राखून पराभव केला (उपांत्य फेरी)
MS Dhoni has a special message for the #T20WorldCup-winning #TeamIndia! ☺️ 🏆#SAvIND | @msdhoni pic.twitter.com/SMpemCdF4Q
— BCCI (@BCCI) June 29, 2024
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्ड
- एकूण टी 20 सामने : 27
- भारतानं जिंकले : 15
- दक्षिण आफ्रिकेनं जिंकलं : 11
- अनिर्णित : 1
टी 20 विश्वचषकात दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड :
- एकूण सामने : 7
- भारतानं जिंकले : 5
- दक्षिण आफ्रिकेनं जिंकले : 2
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन :
- भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह.
- दक्षिण आफ्रिकेचा संघ : क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम (कर्णधार), डेव्हिड मिलर, हेनरिक क्लासेन, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, ॲनरिक नॉर्किया आणि तबरेझ शम्सी.
हेही वाचा :