गयाना India vs England T20 World Cup 2024 : इंग्लंडला हरवत भारतानं टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली. अक्षर पटेल आणि कुलदीप यादव या दोन्ही फिरकीपटूंनी भारताच्या विजयात मोठी भूमिका बजावली. तर रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्या भागीदारीमुळं भारतीय संघ एक चांगली धावसंख्या उभारू शकला.
That was one clinical show in the Semi-Final! 👌 👌
— BCCI (@BCCI) June 27, 2024
📸 📸 Summing up that win! #T20WorldCup | #TeamIndia | #INDvENG pic.twitter.com/kHdOIZ1Q9n
१० वर्षांनंतर टी-२० वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये प्रवेश : भारतानं इंग्लंडला धूळ चारत १० वर्षांनंतर टी-२० वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये प्रवेश केलाय. इंग्लंडवर भारतीय संघानं एकतर्फी विजय मिळवला आणि या विजयासह भारतानं १० वर्षांनंतर टी-२० वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये प्रवेश केला. यापूर्वी २०१४ च्या टी-२० विश्वचषकात भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला होता.
गेल्या विश्वचषकातील पराभवाचा घेतला बदला : 2022 मध्ये झालेल्या टी 20 विश्वचषकात उपांत्य फेरीत इंग्लंडनं भारताचा पराभव करुन बाहेर काढलं होतं. त्यामुळं गतविजेत्या इंग्लंडकडून पराभवाचा बदला घेण्याची सुवर्णसंधी रोहितकडं आली होते. त्याचं रोहितनं सोनं केलं आणि इंग्लंडला चांगलंच धुतलं. तसंच रोहित ब्रिगेडला दशकाहून अधिक काळ बाद फेरीत सुरु असलेली पराभवाची मालिका तोडण्याची संधी मिळाली होती आणि त्याचंही सोनं भारतीय संघानं केलं.
रोहित ब्रिगेड 'साहेबां'वर भारी : दोन्ही संघांमध्ये काटे की टक्कर : जेव्हा-जेव्हा भारत आणि इंग्लंडचे संघ टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आमनेसामने आले, तेव्हा दोघांमध्ये रोमांचक सामना झाला. या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 23 टी 20 सामने खेळले गेले, ज्यात भारतानं 12 तर इंग्लंडनं 11 सामने जिंकले. टी 20 विश्वचषकाच्या इतिहासातील दोन्ही संघांमधील सामन्यांची आकडेवारी पाहिली तर त्यातही भारत आणि इंग्लंड हे दोन्ही संघ बरोबरीचे दिसतात. टी 20 विश्वचषकात आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये एकूण 4 सामने खेळले गेले, ज्यात दोघांनी 2-2 सामने जिंकले. भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी 20 विश्वचषकातील ही पाचवी लढत होती.
भारत विरुद्ध इंग्लंड हेड-टू-हेड रेकॉर्ड :
- एकूण टी 20 सामने : 23
- भारतानं जिंकले : 12
- इंग्लंडनं जिंकले : 11
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन :
- भारत : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह.
- इंग्लंड : फिल सॉल्ट, जोस बटलर (कर्णधार आणि यष्टिरक्षक), जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि रीस टोपली.
हेही वाचा :
- मायकल वॉनसमोर मुंबईच्या टॅक्सी चालकाकडून 'फिक्सिंग'चा सिक्सर, पाहा व्हिडिओ - Michael Vaughan
- अफगाणिस्तानला हरवून दक्षिण आफ्रिकेने रचला इतिहास; पहिल्यांदाच अंतिम फेरीत मारली धडक - T20 World Cup 2024
- भारत-इंग्लंड उपांत्य फेरीचा सामना पावसात वाहून गेल्यास भारतीय संघ जाणार थेट अंतिम फेरीत, काय आहे नियम? - T20 World Cup 2024