हैदराबाद Ravindra Jadeja And Ravichandran Ashwin : भारताचे दोन स्टार फिरकीपटू रवींद्र जडेजा तसंच रविचंद्रन अश्विन यांनी भारतीय संघासाठी मोठी कामगिरी केली आहे. टीम इंडियाच्या दोन दिग्गजांना मागे टाकत या जोडीला भारताची नंबर वन जोडी बनण्याचा मान मिळाला आहे. या दोघांनी इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी इतिहास रचला आहे.
इंग्लंडचा संघ 246 धावांत गारद : भारत तसंच इंग्लंड यांच्यात हैदराबादमध्ये पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा संघ पहिल्याच दिवशी 246 धावांत गारद झाला. इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटीत भारतानं प्रथम गोलंदाजी केली. तर, इंग्लंडनं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, इंग्लंडचे फलंदाज पुन्हा एकदा भारतीय फिरकी गोलंदाजीपुढं हतबल झाल्याचं पाहायला मिळालं. भारतासाठी रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा या जोडीनं एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
अश्विन-जडेजानं रचला इतिहास : रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजानं या सामन्यात विकेट घेत हरभजन सिंग तसंच अनिल कुंबळे या भारतीय फिरकी जोडीला मागं टाकलं आहे. आता अश्विन-जडेजा ही फिरकी जोडी भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणारी फिरकी जोडी बनली आहे. हरभजन सिंग, अनिल कुंबळे या जोडीनं भारतासाठी 501 बळी घेतले आहेत. आता अश्विन, जडेजाच्या जोडीनं 503 विकेट्स घेऊन इतिहास रचला आहे. या जोडीमध्ये अश्विननं 276 तर, जडेजानं 227 विकेट्स घेतल्या आहेत.
भारतासाठी कसोटीत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या जोड्या :
रवींद्र जडेजा-रविचंद्रन अश्विन : 503 बळी (आतापर्यंत)
अनिल कुंबळे-हरभजन सिंग : 501 बळी
हरभजन सिंग-झहीर खान : 474 बळी
रविचंद्रन अश्विन-उमेश यादव : 431 बळी
अनिल कुंबळे-जवागल श्रीनाथ : 412 बळी
हे वाचलंत का :