ETV Bharat / sports

भारत vs इंग्लंड कसोटी : रविचंद्रन अश्विन ठरला 100 वा कसोटी क्रिकेट सामना खेळणारा तिसरा फिरकीपटू, राहुल द्रविडनं दिली विशेष कॅप - रविचंद्रन अश्विन

Ravichandran Ashwin 100th Test : धर्मशाला इथं भारत आणि इंग्लंड संघात आजपासून पाचव्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. रविचंद्रन अश्विन आणि जॉनी बेअरस्टो या दोघांचा हा 100 वा कसोटी सामना आहे. या सामन्यात अश्विनला विशेष कॅप देण्यात आली आहे.

Ravichandran Ashwin 100th Test
संपादित छायाचित्र
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 7, 2024, 2:22 PM IST

धर्मशाला Ravichandran Ashwin 100th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यात धर्मशाला इथं कसोटी क्रिकेट सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यात इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात भारताकडून खेळणाऱ्या रविचंद्रन अश्विन यानं नवीन विक्रम स्थापित केला आहे. रविचंद्रन अश्विन हा 100 कसोटी क्रिकेट खेळणारा तिसरा भारतीय फिरकीपटू ठरला आहे. भारत आणि इंग्लंड संघात मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना धर्मशाला इथं खेळवला जात आहे. या सामन्यात 100 कसोटी क्रिकेट सामने खेळणारा रविचंद्रन अश्विन हा 14वा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. तर अश्विनसह जॉनी बेअरस्टोचाही हा 100 वा कसोटी क्रिकेट सामना आहे.

अश्विनला देण्यात आली विशेष कॅप : शंभरावा कसोटी सामना खेळणाऱ्या फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याला आज विशेष कॅप देण्यात आली आहे. भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याच्या हस्ते अश्विनला हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर पत्नी पृथ्वी अश्विन आणि दोन मुलींच्या उपस्थितीत ही विशेष कॅप देण्यात आली. या कॅपवर 100 असं लिहिलेलं आहे. त्यामुळं रविचंद्रन अश्विनसाठी हा मोठा आनंदाचा क्षण आहे. ही विशेष कॅप स्वीकारताना अश्विन मोठा भावूक झाल्याचं दिसून आलं.

अश्विन दुसरा सगळ्यात वेगवान कसोटी बळी घेणारा फिरकीपटू : आतापर्यंत फिरकीपटू रविचंद्रन अश्विननं इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. अश्विननं श्रीलंकेचा फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन याच्यानंतर सर्वाधिक वेगानं 500 कसोटी बळी मिळवण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. अश्विन हा आता वेगवान बळी मिळवणारा दुसरा फिरकीपटू ठरला आहे. त्यानं 99 कसोटी सामन्यात 502 बळी मिळवले आहेत. सर्वाधिक वेळा पाच बळी घेणाऱ्या फिरकीपटू अनिल कुंबळेची अश्विननं आता बरोबरी केली आहे. इंग्लंडविरोधातील सामन्यात अश्विननं 30.41 च्या सरासरीनं आणि 46.1 च्या स्ट्राईक रेटनं 17 बळी घेतले आहेत.

हेही वाचा :

  1. भारत विरुद्ध इंग्लंड टेस्ट मॅच : इंग्लंडनं नाणेफेक जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय, पडिक्कलनं केला भारतीय संघाकडून 'डेब्यू'
  2. रणजी टॉफ्रीबरोबर मैदानही आपलंच! अंतिम सामन्याकरिता वानखेडे स्टेडियममध्ये प्रेक्षकांना मिळणार मोफत प्रवेश

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.