रांची IND vs ENG 4th Test 3rd Day : भारत विरुद्ध इंग्लंड 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना रांची येथे खेळला जात आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. सामन्याचे तीन डाव तीन दिवसांत संपले असून सामन्याचा शेवटचा डाव सुरू आहे. टीम इंडियाला विजयासाठी 192 धावांचं लक्ष्य मिळालं आहे. भारतानं एकही विकेट न गमावता 40 धावा केल्या आहेत. चौथ्या दिवशी भारताला विजयासाठी आणखी 152 धावा करायच्या आहेत. भारताच्या 10 विकेट्स शिल्लक आहेत.
तिसऱ्या दिवशी 307 धावांवर आटोपला : इंग्लंडच्या 353 धावांसमोर भारताचा पहिला डाव तिसऱ्या दिवशी 307 धावांवर आटोपला. यानंतर इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात फलंदाजीला आला तेव्हा त्यांनी 145 धावा केल्या. अशाप्रकारे भारताला विजयासाठी 192 धावांचं लक्ष्य मिळालं आहे, कारण इंग्लंडलाही पहिल्या डावाच्या आधारे 46 धावांची आघाडी मिळाली आहे. भारताची सुरुवात चांगली झाली आहे. रोहित शर्मा 24 धावा करून नाबाद परतला. यशस्वी जैस्वालनं 16 धावा केल्या.
जो रूटचं दमदार शतक : या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, नाणेफेक जिंकल्यानंतर इंग्लंड संघानं फलंदाजीला सुरुवात केली. पहिल्या डावात 353 धावा केल्या. जो रूटनं दमदार शतक झळकावलं होतं. भारताकडून रवींद्र जडेजानं 4, आकाश दीपने 3 आणि मोहम्मद सिराजने 2 विकेट्स घेतल्या. यानंतर भारतीय संघ पहिल्या डावात फलंदाजीसाठी उतरला तेव्हा 307 धावा करून सर्वबाद झाला. त्यामुळे इंग्लंडला 46 धावांची आघाडी मिळाली. भारताकडून ध्रुव जुरेल आणि यशस्वी जैस्वाल यांनी अर्धशतके झळकावली. इंग्लंडकडून शोएब बशीरने पाच विकेट घेतल्या. इंग्लंडचा दुसरा डाव 145 धावांत आटोपला. अश्विननं या डावात पाच विकेट घेतल्या.
भारताचा पहिला डाव : रांची कसोटीत भारतीय संघाचा पहिला डाव 307 धावांवर संपुष्टात आलाय. युवा यष्टिरक्षक फलंदाज ध्रुर जुरेलनं संघासाठी शानदार खेळी केली आणि 149 चेंडूत 6 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीनं 90 धावा केल्या. जुरेलच्या या खेळीनं भारताला 300 धावांचा टप्पा ओलांडण्यात महत्त्वाचं योगदान दिलं. मात्र, सध्या इंग्लंडकडे 46 धावांची आघाडी आहे. या दरम्यान इंग्लिश फिरकी गोलंदाज शोएब बशीरनं सर्वाधिक 5 बळी घेतले.
कुलदीप ध्रुवची महत्त्वपुर्ण भागीदारी : जुरेल आणि कुलदीपनं तिसऱ्या दिवसाची सुरुवात केली. या दोघांनी आठव्या विकेटसाठी 76 धावांची (202 चेंडू) भागीदारी केली, ज्याचा संघाला खूप फायदा झाला. मात्र बराच वेळ क्रीझवर राहून जुरेलला साथ देणारा कुलदीप 131 चेंडूंत 2 चौकारांच्या मदतीनं 28 धावा करुन बाद झाला. त्यानंतर भारतीय संघाला नववा धक्का आकाश दीपच्या रुपानं बसला, तो पदार्पणाचा सामना खेळत होता. आकाशनं 1 षटकार मारत 09 धावा केल्या. त्यानंतर अखेर भारतानं 90 धावा करणाऱ्या ध्रुव जुरेलच्या रुपानं 10वी विकेट गमावली.
आतापर्यंत सामन्यावर साहेबांचं वर्चस्व : भारतीय संघानं दुसऱ्या दिवसअखेर पहिल्या डावात फलंदाजी करताना 7 बाद 219 धावा केल्या आहेत. सध्या या सामन्यात यजमान भारतीय संघ 134 धावांनी पिछाडीवर असून ध्रुव जुरेल आणि कुलदीप यादव फलंदाजी करत आहे. भारताकडून यशस्वी जैस्वालनं पुन्हा एकदा अर्धशतचकी खेळी केली. मात्र त्याला या खेळीचं मोठ्या खेळीत रुपांतर करता आलं नाही. तर उर्वरित फलंदाजांनी मात्र निराशा केली. इंग्लिश गोलंदाजांनी भारतीय संघाला झटपट तंबूत पाठवलंय. आतापर्यंत 20 वर्षीय फिरकी गोलंदाज शोएब बशीरनं 4 आणि तर टॉम हार्टलीनं 2 विकेट घेतल्या आहेत, तर जेम्स अँडरसनला एक विकेट मिळालीय. इंग्लंडकडं अद्याप 134 धावांची आघाडी आहे. तर भारतात्या अद्याप तीन विकेट शिल्लक आहेत, अशात सामन्याचा आजचा दिवस निर्णायक ठरु शकतो.
जो रुटचं शानदार शतक : तत्पुर्वी इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर जो रुटच्या शानदार शतकाच्या बळावर इंग्लंडनं पहिल्या डावात 353 धावा केल्या. त्यानं 122 धावांची शानदार खेळी केली. तसंच भारतात पहिला सामना खेळणाऱ्या ओली रॉबीन्सननंही अर्धशतक झळकावलंय. तर भारताकडून रवींद्र जडेजानं 4 बळी घेतले.
हेही वाचा :