कानपूर IND vs BAN 2nd Test Day 1 : भारत आणि बांगलादेश क्रिकेट संघ यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मानं गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्माच्या या निर्णयानं पुन्हा एकदा सर्व भारतीय चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. रोहित शर्मानं कर्णधार म्हणून अनेक वेळा आश्चर्यकारक निर्णय घेतले आहेत. हा निर्णयही त्यापैकीच एक आहे. ज्यानं 9 वर्ष जुना ट्रेंड तोडण्याचं काम केलं आहे. त्यामुळं भारतीय संघाची मानसिकता बदलण्याचं काम रोहित शर्मानं केल्याचं अधोरेखीत झालं आहे.
Lunch on the opening day of the Kanpur Test 🍱
— BCCI (@BCCI) September 27, 2024
Bangladesh move to 74/2 after 26 overs.
Stay tuned for the afternoon session ⏳
Scorecard - https://t.co/JBVX2gyyPf#TeamIndia | #INDvBAN | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/Jocxs8Ld9p
9 वर्षांनंतर एखाद्या कर्णधारानं केलं असं : जेव्हा रोहित शर्मानं बांगलादेशविरुद्ध नाणेफेक जिंकली तेव्हा या सामन्यात भारतीय संघ प्रथम फलंदाजी करेल अशी सर्वांना अपेक्षा होती, पण रोहित शर्मानं उलट निर्णय घेत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय सर्वत्र चर्चेचा विषय ठरला. असं असलं तरी, 9 वर्षांनंतर एका भारतीय कर्णधारानं घरच्या मैदानावर नाणेफेक जिंकून कसोटी क्रिकेटमध्ये गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुर्वी 14 नोव्हेंबर 2015 रोजी बेंगळुरु इथं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात भारतीय संघानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी केली होती. या सामन्यात विराट कोहली भारतीय संघाचा कर्णधार होता.
😮 When the giant screen showed three Reds ⭕⭕⭕
— BCCI (@BCCI) September 27, 2024
Akash Deep gets his second courtesy of a successful DRS!
Live - https://t.co/JBVX2gyyPf#TeamIndia | #INDvBAN | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/ZyGJfgBdjW
प्लेइंग 11 मध्ये कोणताही बदल नाही : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मानं या सामन्यासाठी प्लेइंग 11 मध्ये एकही बदल केलेला नाही. या सामन्यात रोहित शर्मा तीन फिरकी गोलंदाजांना संधी देऊ शकतो, असं मानलं जात होतं. त्यामुळं या सामन्यात कुलदीप ॲक्शनमध्ये दिसणार असल्याचं दिसत होतं. तथापि, रोहित शर्मानं तसं केलं नाही आणि चेन्नई कसोटीत निवडलेल्या 11 खेळाडूंसोबत खेळण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघानं बांगलादेश विरुद्ध चेन्नई इथं खेळवण्यात आलेला पहिला कसोटी सामना 280 धावांनी जिंकला. अशा स्थितीत भारतीय संघानं या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
Opening breakthrough in Kanpur! 🙌
— BCCI (@BCCI) September 27, 2024
Yashasvi Jaiswal with an excellent catch at slip and Akash Deep with the wicket 👌👌
Live - https://t.co/JBVX2gyyPf#TeamIndia | #INDvBAN | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/9dtKt9f5mR
आकाशदीपनं घेतल्या दोन विकेट : या सामन्यात बांगलादेशनं फलंदाजीचं आमंत्रण मिळाल्यावर डावाची चांगली सुरुवात केली. पण या सामन्यात गोलंदाजी करायला आलेल्या आकाश दीपनं बांगलादेशचा सलामीवीर झाकीर हसनला स्लिपमध्ये यशस्वी जैस्वालकडे झेलबाद केले. त्यावेळी बांगलादेश संघाची धावसंख्या 26 होती. त्यानंतर धावफलकावर केवळ 29 धावा असताना आकाश दीपनं शदमान इस्लाम (24) यालाही पायचीत करत दुसरी विकेट घेतली. यानंतर कर्णधार नझमुल हुसेन शांतो आणि मोमिनुल हक यांनी डाव सावरला. उपाहारापर्यंत बांगलादेशी संघाची धावसंख्या 2 बाद 74 धावा झाल्या आहेत.
हेही वाचा :