मेलबर्न How to Buy Match Tickets : ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना 4 नोव्हेंबर (सोमवार) रोजी मेलबर्न येथील मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळवला जाईल. दोन्ही संघांसाठी ही मालिका खूप महत्त्वाची आहे. गेल्या वर्षी भारतामध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकल्यानंतर, गतविजेता ऑस्ट्रेलिया पाकिस्तानच्या नवीन राष्ट्रीय क्रिकेट संघाविरुद्ध घरच्या मैदानावर उत्कृष्ट कामगिरी करण्याचा विचार करेल, पाकिस्तान संघाचा मोहम्मद रिझवान हा नवीन पूर्णवेळ कर्णधार असेल. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं (PCB) काही दिवसांपूर्वी या यष्टिरक्षक-फलंदाजला बाबर आझमचा उत्तराधिकारी म्हणून अधिकृतपणे घोषित केलं होतं. त्याचं पहिलं काम खूप आव्हानात्मक आहे. त्याच्या नेतृत्त्वाखाली संघाला बलाढ्य ऑस्ट्रे्लियाच्या आव्हानाला सामोरं जायचं आहे. या सामन्याची तिकिटं कशी खेरदी करायची याबाबत आपण जाणून घेणार आहोत.
Left-arm pace royalty at the MCG 🤝✨#AUSvPAK pic.twitter.com/41pn1cKjon
— Pakistan Cricket (@TheRealPCB) November 2, 2024
कुठं होणार मालिकेतील सामने : ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान वनडे मालिका प्रतिष्ठित मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर सुरु होईल. जिथं पहिला सामना आयोजित केला जाईल आणि त्यानंतर ॲडलेड इथं दुसरा आणि पर्थ इथं तिसरा सामना खेळवला जाईल. या वनडे मालिकेत पॅट कमिन्स पुन्हा एकदा ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक म्हणून आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करेल तर मोहम्मद रिझवान आपल्या नेतृत्त्वात मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल.
One practice at a time as we look to take on Australia in the ODI series! 🌟🏏#AUSvPAK pic.twitter.com/xGgOvOGebg
— Pakistan Cricket (@TheRealPCB) November 2, 2024
हेड-टू-हेड रेकॉर्ड : ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत एकूण 108 वनडे सामने झाले आहेत. ऑस्ट्रेलियानं या हेड-टू-हेड रेकॉर्डमध्ये चांगली कामगिरी केली आहे, ज्यामध्ये त्यांनी 70 सामने जिंकले आहेत, तर पाकिस्तानला 34 सामन्यांमध्ये यश मिळालं आहे. याशिवाय ३ सामन्यांचा निकाल लागला नाही, तर एक सामना बरोबरीत संपला. ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर पाकिस्तानची कामगिरी आतापर्यंत निराशाजनक राहिली आहे. पाकिस्ताननं इथं खेळल्या गेलेल्या 56 एकदिवसीय सामन्यांपैकी केवळ 17 सामने जिंकले आहेत. अशा स्थितीत मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघाला काहीतरी लक्षणीय कामगिरी करावी लागणार आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान वनडे सामन्याची तिकिटं ऑनलाइन कशी खरेदी करावी?
क्रिकेट ऑस्ट्रेलियानं ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील वनडे मालिकेसाठी तिकिटं उपलब्ध करुन दिली आहेत. क्रिकेट चाहते अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान ऑनलाइन तिकिटं खरेदी करु शकतात, जी आता थेट आणि वेगानं विकली जात आहे. तिकिटांच्या किंमती 30 ऑस्ट्रेलियन डॉलर म्हणजेच जवळपास 1654 भारतीय रुपये ते 120 ऑस्ट्रेलियन डॉलर्स म्हणजेच जवळपास 6118 भारतीय रुपयांपर्यंत आहेत. मेलबर्न (MCG), ॲडलेड (ॲडलेड ओव्हल) आणि पर्थ (पर्थ स्टेडियम) इथं होणाऱ्या तिन्ही वनडे सामन्यांची तिकिटं खरेदीसाठी उपलब्ध आहेत.
Team 🇵🇰 getting ready for the ODI showdown 🏏#AUSvPAK pic.twitter.com/vYwZd8Xads
— Pakistan Cricket (@TheRealPCB) November 2, 2024
वनडे क्रमवारीत भारत अव्वल स्थानी : पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आधी, दोन्ही संघ सराव म्हणून या वनडे मालिकेचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील. ICC वनडे संघ क्रमवारीत ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत, तर भारत अव्वल स्थानावर आहे.
हेही वाचा :