मँचेस्टर Harry Singh : इंग्लंड क्रिकेट संघ सध्या मँचेस्टरमध्ये श्रीलंकेविरुद्ध कसोटी पहिला सामना खेळत आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडनं एका युवा खेळाडूला मैदानात उतरवलं, ज्याची भारतात बरीच चर्चा होत आहे. हॅरी सिंग असं या खेळाडूचं नाव असून तो लँकेशायरकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळतो. या खेळाडूचं वय अवघं 20 वर्षे आहे. हॅरी सिंगचे वडील भारतीय संघाकडून खेळल्यामुळं या खेळाडूची भारतात चर्चा होत आहे. होय, आश्चर्यचकित होऊ नका, हॅरी सिंगच्या वडिलांचं नाव रुद्र प्रताप सिंग आहे, ज्यानं भारतासाठी 2 एकदिवसीय सामने खेळले आहेत.
Meet Harry Singh, son of RP Singh, who fielded for England in the first Test against Sri Lanka https://t.co/uw9XUEr2oQ
— All Things Cricket (@Cricket_Things) August 22, 2024
कोण आहेत हॅरी सिंगचे वडील : हॅरी सिंगचे वडील रुद्र प्रताप सिंग हा डावखुरा वेगवान गोलंदाज होता. ज्यानं 24 सप्टेंबर 1986 रोजी भारतीय संघासाठी पदार्पण केलं. ते आपल्या कारकिर्दीत फक्त दोनच एकदिवसीय सामने खेळू शकला होता आणि दोन्ही सामने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळले गेले होते. 24 सप्टेंबर 1986 रोजी पदार्पण केल्यानंतर, त्यानं त्याचा पुढील सामना 7 ऑक्टोबर 1986 रोजी खेळला, जो त्याचा शेवटचा सामना होता. रुद्रनं स्थानिक क्रिकेटमध्ये उत्तर प्रदेशासाठी 59 सामन्यांमध्ये 150 विकेट घेतल्या होत्या.
Proud day for @lancscricket with Charlie Barnard, Kesh Fonseka and Harry Singh on 12th man duties for England. 🦁
— Lancashire Cricket (@lancscricket) August 21, 2024
Enjoy the experience, lads! 💪
🌹 #RedRoseTogether | #ENGvSL pic.twitter.com/T9SabVmgIN
रुद्र प्रताप सिंग इंग्लंडला गेला : जेव्हा भारतीय संघाकडून त्याची कारकीर्द संपुष्टात आली. तेव्हा रुद्र प्रताप सिंग इंग्लंडमध्ये स्थायिक झाला आणि आता त्याचा मुलगा लँकेशायरमध्ये क्रिकेट कारकीर्द घडवत आहे. हॅरी सिंगचा जन्म 16 जून 2004 रोजी झाला असून या खेळाडूनं लँकेशायरसाठी आतापर्यंत 7 लिस्ट ए सामने खेळले आहेत. बुधवारी इंग्लंड संघानं हॅरीला पर्यायी क्षेत्ररक्षक म्हणून मैदानात उतरवलं. हॅरी सिंगचं करिअर नुकतंच सुरु झालं आहे. जर त्यानं चांगली कामगिरी केली तर एक दिवस तुम्हाला हा खेळाडू इंग्लंड संघातही दिसण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :