ETV Bharat / sports

हार्दिक आणि नताशामध्ये का झाला घटस्फोट? समोर आलं मोठं कारण... - Hardik Natasha Divorce - HARDIK NATASHA DIVORCE

Hardik Natasha Divorce : भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्याने काही दिवसांपूर्वी पत्नी नताशापासून घटस्फोट घेतला आहे. आता त्यांच्या घटस्फोटाचे कारण उघडपणे समोर येत आहे.

Hardik Natasha Divorce
हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविच (ETV Bharat File Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : Aug 25, 2024, 5:02 PM IST

नवी दिल्ली Hardik Natasha Divorce : भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यानं त्याची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री नताशा स्टॅनकोविचपासून काही दिवसांपूर्वी घटस्फोट घेतला आहे. खुद्द हार्दिकनं सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली होती. आता त्या घटस्फोटाचं कारण उघड झालं आहे. टाईम्स नाऊच्या वृत्तानुसार, नताशाच्या जवळच्या सूत्रानं त्यांच्या विभक्त होण्याच्या कारणाविषयी माहिती दिली आहे.

काय आहे कारण : रिपोर्टनुसार, दोघांचा घटस्फोट वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वांमुळं झाला. नताशाच्या जवळच्या एका सूत्रानं सांगितलं की, हार्दिक पांड्या तिच्यासाठी खूप दिखाऊ आणि गर्विष्ठ होता. नताशाला हे सहन होत नव्हतं. ती पुढे म्हणाली, हार्दिकला बदलण्यासाठी नताशाचे सर्वोतोपरी प्रयत्न असूनही, त्यांच्यात मतभेद राहिले आणि जसजशी वेळ पुढं जात राहिली तसतसं ते अधिक स्पष्ट झालं. सुरुवातीला नताशानं त्याचं व्यक्तिमत्त्व अंगीकारण्याचा आणि आव्हानांचा सामना करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिनं पांड्याला रिप्लेस करण्याचा प्रयत्न केला. नंतर नताशाला वाटलं की दोघांचं व्यक्तिमत्त्व इतकं वेगळं आहे की नातं पुढं चालू ठेवणं कठीण आहे. यानंतर नताशानं वेगळं होणं हा सर्वोत्तम उपाय मानला. रिपोर्टनुसार, तिच्या जवळच्या व्यक्तीनं सांगितलं की हा निर्णय नताशासाठी कठीण होता. परंतु तिच्या आणि तिचा मुलगा अगस्त्यच्या आरोग्यासाठी आवश्यक होता.

कुठे आहे नताशा : नताशा तिच्या मुलासह सर्बियाला परत गेली आहे. टी 20 विश्वचषकातील चमकदार कामगिरीनंतर हार्दिक पांड्या सध्या ब्रेकवर आहे. विश्वचषकानंतर त्यानं श्रीलंकेविरुद्ध 3 सामन्यांची टी 20 मालिका खेळली. मात्र, यादरम्यान बीसीसीआयनं आश्चर्यकारक निर्णय घेत रोहित शर्माच्या टी 20 मधून निवृत्ती घेतल्यानंतर संघाची कमान हार्दिक पांड्याएवजी सूर्यकुमार यादवच्या खांद्यावर सोपवली.

होही वाचा :

  1. हार्दिक पांड्यापासून विभक्त झाल्यानंतर नताशा स्टॅनकोविचची पहिली सोशल मीडिया पोस्ट - Natasa Stankovic post
  2. हार्दिक पांड्याबरोबर घटस्फोट केल्यानंतर नताशानं मुलाबरोबर 'असा' वाढदिवस केला साजरा - Natasa Stankovic share pics
  3. नताशा स्टॅनकोविकपासून विभक्त झाल्यानंतर हार्दिक पांड्या कोणाला करत आहे डेट? वाचा सविस्तर - HARDIK PANDYA

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.