ETV Bharat / sports

हार्दिकच नाही तर 'या' क्रिकेटपटूंचाही झालाय घटस्फोट; खेळाडूंची नावं वाचून बसेल धक्का! - Hardik Natasa Divorce

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 19, 2024, 8:31 AM IST

Indian Cricketers Divorce : हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री नताशा स्टॅनकोव्हिक यांनी लग्नानंतर 4 वर्षांनी घटस्फोट घेतला आहे. हार्दिक व्यतिरिक्त आणखी भारतीय क्रिकेटपटूंनी पत्नीपासून घटस्फोट घेतला आहे. ही यादी पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटू शकते.

Indian Cricketers Divorce
Indian Cricketers Divorce (Source - Etv Bharat)

Indian Cricketers Divorce : भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी अभिनेत्री, मॉडेल असलेली पत्नी नताशा यांचा अखेर घटस्फोट झाला. गेल्या अनेक दिवसांपासून दोघांच्या घटस्फोटाबाबत चर्चा सुरू होत्या. अखेर हार्दिक आणि नताशा दोघांनीही इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करुन घटस्फोटाची घोषणा केली.

गेल्या अनेक दिवसांपासून हार्दिक आणि नताशा एकमेकांसोबत दिसले नव्हते. आयपीएलमध्येही नताशा दिसली नव्हती. त्यानंतर नताशानं इन्स्टाग्रामवरुन पांड्याचे आडनावदेखील हटवलं होतं. तिनं मुलासोबतचे फोटो सोडून इतर सर्व हार्दिकचे इन्स्टाग्रामवरुन फोटो डिलीट केले होते. आता घटस्फोट झाल्याचं दोघांनी जाहीर केलं आहे.

'या' क्रिकेटपटूंचाही झालाय घटस्फोट

  • शिखर धवन : एकेकाळी रोहित शर्माचा ओपनिंग पार्टनर असलेल्या शिखर धवनलाही घटस्फोटाचं दुःख सहन करावं लागलं आहे. 2009 मध्ये मेलबर्नमध्ये आयशा मुखर्जीसोबत त्याची एंगेजमेंट झाली. त्यानंतर 2012 मध्ये त्यांनी लग्न केलं. दोघांना एक मुलगाही आहे. दोघांचे लग्न 11 वर्षे टिकलं. मात्र, नंतर दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. मानसिक छळाच्या कारणावरून 2023 मध्ये धवननं आयशाला घटस्फोट दिला. आयशा आणि तिचा मुलगा जोरावर हे ऑस्ट्रेलियाचे नागरिक असून तिथेच राहतात. आयशानं शिखरला मुलापासून दूर ठेवून मानसिक त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला होता.
  • दिनेश कार्तिक : दिनेश कार्तिकनं त्याची बालपणीची मैत्रिण निकिता बंजारासोबत 2007 मध्ये वयाच्या 21 व्या वर्षी लग्न केलं. त्यांच्या कुटुंबांमध्ये बराच काळ घरगुती संबंध होते. परंतु त्यांचं लग्न केवळ 5 वर्षे टिकू शकलं. 2012 मध्ये कार्तिकची पत्नी विवाहित असताना त्याचा सहकारी क्रिकेटर मुरली विजयसोबत रिलेशनशिपमध्ये आली. यानंतर त्यांनी घटस्फोट घेतला. कार्तिकला घटस्फोट देत निकितानं मुरली विजयशी लग्न केलं. तर कार्तिकनं 2015 मध्ये स्क्वॅशपटू दीपिका पल्लीकलशी लग्न केलं.
  • मोहम्मद शमी : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीनं 2014 मध्ये हसीन जहाँशी लग्न केलं. दोघांची पहिली भेट आयपीएलदरम्यान झाली होती. हसीन जहाँ त्यावेळी कोलकाता नाईट रायडर्सची चीअर लीडर होती. लग्नाला 4 वर्षे पूर्ण झाल्यानंतर हसीन जहाँन 2018 मध्ये शमीवर इतर मुलींसोबत अफेअर आणि घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. तेव्हापासून दोघंही वेगळे राहतात. मात्र, दोघांचंही प्रकरण न्यायालयात अडकलं आहे. शमीला एक मुलगीही आहे. ती हसीन जहाँसोबत राहते.
  • विनोद कांबळी : विनोद कांबळीचं पहिलं लग्न हे त्याची बालपणीची मैत्रीण नोएला लुईसबरोबर झाले होते. लुईस ही ब्ल्यू डायमंड हॉटेलमध्ये कामाला होती. विनोद आणि लुईस यांनी 1998 साली पुण्यात लग्न केलं होतं. विवाहित असतानाच तो अँड्रिया हेविट नावाच्या महिलेच्या प्रेमात पडला. त्यानंतर त्यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला. घटस्फोटानंतर विनोदने अँड्रियासोबत दुसरं लग्न केलं.
  • जवागल श्रीनाथ : जवागल श्रीनाथ हा भारताचा वेगवान गोलंदाज होता. श्रीनाथनं 1999मध्ये ज्योस्नाशी पहिलं लग्न केलं. पण 2007 मध्ये 8 वर्षांनी घटस्फोट झाला. त्यानंतर 2007मध्ये श्रीनाथ पत्रकार माधवी पत्रावलींबरोबर विवाहबंधनात अडकला.

मोहम्मद अझरुद्दीन : भारतीय संघाचा कर्णधार राहिलेल्या मोहम्मद अझरुद्दीननं एकदा नव्हे तर दोनदा घटस्फोट घेतला. त्यानं पहिले लग्न नौरीनशी केलं. नौरीन आणि अझहरचा विवाह 1987 मध्ये झाला होता. पण हे नाते फार काळ टिकलं नाही. ते दोघं 1996 मध्ये वेगळे झाले. त्यावेळी अझरुद्दीनला घटस्फोटाची भरपाई म्हणून नौरीनला सुमारे एक कोटी रुपये द्यावे लागले. त्यानंतर अझरुद्दीनने संगीता बिजलानीशी लग्न केले. पण हे नातेही तुटलं. 14 वर्षांच्या लग्नानंतर अझरुद्दीनने संगीताला घटस्फोट दिला.

हेही वाचा

  1. अखेर हार्दिक-नताशाचं नातं तुटलं; दोनदा लग्न करुनही चार वर्षांत मोडला 'संसार' - Hardik Natasa Divorce
  2. श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा; टी 20 संघात कर्णधाराचा 'सुर्यो'दय - Team India
  3. इंग्लंडनं रचला इतिहास...! 26 चेंडूत केलं असं काही, जे 147 वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात घडलं नाही - Fastest Team Fifty in Test

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.