ETV Bharat / sports

IPL-2024 मध्ये गुजरातचा दुसरा विजय, मिलरनं षटकार ठोकून केला हैदराबादचा 7 विकेटनं पराभव - IPL 2024

GT vs SRH live score IPL 2024 : गुजरात टायटन्स (GT) नं इंडियन प्रीमियर लीग-2024 मध्ये दुसरा विजय मिळवला आहे. संघानं चालू हंगामातील 12 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद (SRH) चा 7 गडी राखून पराभव केला. या विजयासह गुजरातचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आला आहे, तर हैदराबाद पाचव्या स्थानावर आहे.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 31, 2024, 3:25 PM IST

Updated : Mar 31, 2024, 7:37 PM IST

GT vs SRH live score IPL 2024
GT vs SRH live score IPL 2024

अहमदाबाद GT vs SRH live score IPL 2024 : IPL 2024 चा 12 वा सामना रविवारी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादनं गुजरात टायटन्सला 163 धावांचं लक्ष्य दिलं. प्रत्यूत्तरात गुजरात टायटन्सनं 7 विकेट राखून विजय मिळवला.

गुजरातचा विजय : अहमदाबाद येथे रविवारी झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. गुजरातच्या फलंदाजांनी 19.1 षटकांत 3 गडी गमावून 20 षटकांत 7 गडी गमावून 163 धावांचं लक्ष्य पूर्ण केलं. साई सुदर्शननं 36 चेंडूत 45 धावांची खेळी केली, तर डेव्हिड मिलरनं 27 चेंडूत नाबाद 44 धावा केल्या. कर्णधार शुभमन गिलनं 36 ऋद्धिमन साहानं 25 धावांचं योगदान दिलं. एसआरएचसाठी अभिषेक शर्मा आणि अब्दुल समद यांनी 29-29 धावा केल्या. हेन्रिक क्लासेननं 24 धावांचं योगदान दिलं. मोहित शर्मानं तीन विकेट घेतल्या.

हैदराबादनं 20 षटकांत केल्या 162 धावा : केल्या आज IPL 2024 च्या 12 व्या सामन्यात गुजरात टायटन्स (GT) विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना झाला. या सामन्यानं हैद्राबादनं प्रथम फलंदाजी करताना गुजरातला 163 धावांचं दिलं. हैदराबादनं 20 षटकांत 8 गडी गमावून 162 धावा केल्या. अब्दुल समद आणि अभिषेक शर्मा यांनी प्रत्येकी 29 धावांची खेळी केली. समद धावबाद झाला. हैदराबादची चांगली सुरुवात झाली, पण मयंक अग्रवाल पुन्हा एकदा अपयशी ठरला. त्याला केवळ 16 धावा करता आल्या. पॉवरप्लेमध्ये SRH ने 1 गडी गमावून 55 धावा केल्या. मात्र, लवकरच ट्रॅव्हिस हेड (19) बोल्ड झाला. एडन मार्करामनं 17 आणि हेनरिक क्लासेननं 24 धावांचं योगदान दिलं. शाहबाज अहमदनं 22 धावाची खेळी केली. वॉशिंग्टन सुंदर खातं उघडताच बाद झाला. कर्णधार पॅट कमिन्स 2 धावा करून नाबाद राहिला. मोहित शर्मानं तीन तर नूर अहमद, रशीद खान, उमेश यादव तसंच अजमतुल्ला उमरझाई यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

गुजरात टायटन्स प्लेइंग -11: रिद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुभमन गिल (कर्णधार), अजमतुल्ला उमरझाई, डेव्हिड मिलर, विजय शंकर, राहुल तेवतिया, रशीद खान, नूर अहमद, दर्शन नळकांडे, उमेश यादव, मोहित शर्मा.

सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग -11 : मयंक अग्रवाल, ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, जयदेव उनाडकट.

IPL सामन्यांचं वेळापत्रक :

गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, 31 मार्च, अहमदाबाद, 3.30 PM

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, 31 मार्च, विझाग, संध्याकाळी 7.30 वाजता

मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, 1 एप्रिल, मुंबई, संध्याकाळी 7.30 वा.

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, 2 एप्रिल, बंगळुरू, संध्याकाळी 7.30

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, 3 एप्रिल, विझाग, संध्याकाळी 7.30

गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्ज, 4 एप्रिल, अहमदाबाद, संध्याकाळी 7.30

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, 5 एप्रिल, हैदराबाद, संध्याकाळी 7.30

राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, 6 एप्रिल, जयपूर, संध्याकाळी 7.30

मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, 7 एप्रिल, मुंबई, दुपारी 3.30 वाजता

लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स, 7 एप्रिल, लखनऊ, संध्याकाळी 7.30

Last Updated : Mar 31, 2024, 7:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.