ETV Bharat / sports

पंजाबच्या 'किंग्ज'नं गुजरातच्या जबड्यातून हिसकावला विजय; शशांक सिंगच ठरला जायंट किलर - GT vs PBKS - GT VS PBKS

IPL 2024 GT vs PBKS : आयपीएल 2024 च्या रोमहर्षक सामन्यात गुजरात टायटन्सचा पंजाब किंग्जकडून तीन गडी राखून पराभव झाला. शशांक सिंग आणि आशुतोष शर्मा हे पंजाबच्या विजयाचे हिरो ठरले. त्यांनी गुजरातच्या जबड्यातून सामना हिसकावला.

पंजाबच्या 'किंग्ज'नं गुजरातच्या जबड्यातून हिसकावला विजय; शशांक सिंग ठरला 'जायंट किलर'

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 4, 2024, 6:41 PM IST

Updated : Apr 5, 2024, 6:52 AM IST

अहमदाबाद IPL 2024 GT vs PBKS : इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 17 व्या हंगामातील 17व्या सामन्यात गुजरात टायटन्स (GT) चा सामना पंजाब किंग्ज (PBKS) सोबत झाला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पंजाब किंग्जनं तीन गडी राखून विजय मिळवला. पंजाबनं शेवटच्या षटकात 200 धावांचं लक्ष्य गाठलं. शशांक सिंग आणि आशुतोष शर्मा पंजाब किंग्जच्या विजयाचे नायक ठरले. त्यांनी गुजरातच्या जबड्यातून सामना हिसकावून घेतला. शशांक सिंगनं 29 चेंडूत 61 धावा केल्या तर आशुतोष शर्मानं 17 चेंडूत 31 धावांची खेळी केली.

गुजरातच्या जबड्यातून पंजाबनं हिसकावला सामना : लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्जची सुरुवात खराब झाली. अवघ्या 13 धावांत त्यांनी कर्णधार शिखर धवनची विकेट गमावली. धवनला उमेश यादवनं बाद केलं. दुसरा सलामीवीर जॉनी बेअरस्टोनं काही चांगले फटके खेळले. पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. नूर अहमदनं त्याला बाद केलं. पाठोपाठ प्रभसिमरन सिंगही पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर पंजाब किंग्जनं सॅम कुरन, सिकंदर रझा आणि जितेश शर्मा यांच्या विकेट्स लागोपाठ गमावल्या. एकवेळ पंजाब किंग्जच्या 150 धावांवर 6 विकेट पडल्या होत्या. तिथून त्यांचा विजय अवघड वाटत होता. मात्र शशांक सिंग आणि आशुतोष शर्मा या जोडीनं खेळ बदलला. 'इम्पॅक्ट प्लेअर' म्हणून आलेल्या आशुतोषनं आपल्या खेळीत तीन चौकार आणि एक षटकार लगावला.

शेवटच्या षटकाचा थरार : शेवटच्या षटकात पंजाबला सात धावांची गरज होती. दर्शन नळकांडेच्या त्या षटकात आशुतोष शर्मा पहिल्याच चेंडूवर बाद झाला. यानंतर दर्शननं वाईड बॉल टाकला. म्हणजे आता पाच चेंडूत सहा धावा करायच्या होत्या. षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर हरप्रीत बरारला एकही धाव करता आली नाही. त्यानंतर पुढच्या चेंडूवर एक धाव घेत त्यानं शशांक सिंगला स्ट्राईक दिली. शशांक सिंगनं ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर चौकार मारला. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर शशांकनं लेग बायच्या रुपात धाव घेत आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

शुभमन गिलची कप्तानी खेळी : तत्पूर्वी नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सनं चार गडी गमावून 199 धावा केल्या. गुजरात टायटन्ससाठी कर्णधार शुभमन गिलनं 48 चेंडूत 6 चौकार आणि चार षटकारांसह सर्वाधिक 89 धावा केल्या. तर साई सुदर्शननं 19 चेंडूत 33 धावांची खेळी केली. केन विल्यमसन (26) आणि राहुल तेवतिया (नाबाद 23) यांनीही गुजरातसाठी उपयुक्त योगदान दिलं. पंजाब किंग्जकडून कागिसो रबाडानं सर्वाधिक दोन बळी घेतले. तर हर्षल पटेल आणि हरप्रित बरार यांनाही 1-1 बळी मिळाला.

आयपीएल 2024 मधील वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या :

  • 89* - शुभमन गिल विरुद्ध पंजाब किंग्ज, अहमदाबाद
  • 85 - सुनील नरेन विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, विशाखापट्टणम
  • 84* - रियान पराग विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, जयपूर
  • 83* - विराट कोहली विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, बेंगळुरु
  • 82 - संजू सॅमसन विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, जयपूर

हेही वाचा :

  1. दिल्ली कॅपीटल्ससाठी दुष्काळात तेरावा महिना; केकेआर विरुद्धच्या सामन्यानंतर पंतला बीसीसीआयनं ठोठावला 24 लाखांचा दंड; कारण काय? - Rishabh Pant
  2. कोलकाताच्या 'नरेन'अस्त्रासमोर 'दिल्ली' राजधानी एक्सप्रेस 'फेल'; आठ दिवसांत दोनदा मोडला आरसीबीचा 'हा' विक्रम - DC vs KKR Live Score IPL 2024

Last Updated : Apr 5, 2024, 6:52 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.