ETV Bharat / sports

पहिल्या कसोटीत 'झिरो'... नंतर एकाच कसोटीत सर्वाधिक धावांचा 'विश्वविक्रम' - Most Runs in Test Match

Most Runs in Test Match: इंग्लंडच्या एका फलंदाजानं एकाच कसोटीत केलेल्या सर्वाधिक धावांचा विक्रम 34 वर्षांपासून आजपर्यंत कोणीही मोडू शकलेला नाही.

Graham Gooch
ग्रॅहम गूच (AFP Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : Oct 4, 2024, 6:40 PM IST

मुंबई Most Runs in Test Match : सध्या क्रिकेटविश्वात भारतीय गोलंदाजांचं वर्चस्व आहे. जगभरातील फलंदाजांमध्ये भारतीय संघाच्या गोलंदाजांची भीती आहे. पण एक काळ असा होता की भारतीय गोलंदाज फलंदाजासमोर हाताश झालेले दिसत होते. इंग्लंडच्या एका फलंदाजानं एकाच कसोटीत तब्बल 456 धावा केल्या होत्या. कसोटी क्रिकेटमध्ये आपण अनेक खेळी पाहिल्या आहेत, काहींनी द्विशतकं तर काहींनी तिहेरी शतकंही झळकावली आहेत, या क्रिकेटपटूचा 34 वर्षांपासून एक विक्रम आजपर्यंत कोणीही मोडू शकलेला नाही. तो म्हणजे एका कसोटीत सर्वाधिक वयक्तिक धावा.

पहिल्या कसोटीत शुन्यावर बाद : क्रिकेट जगतात असे अनेक दिग्गज झाले आहेत ज्यांची कारकिर्दीची सुरुवात खराब झाली असेल पण नंतर त्यांनी आपल्या कामगिरीनं त्यांनी जागतिक क्रिकेटवर राज्य केलं. असाच एक महान क्रिकेटर म्हणजे इंग्लंडचा ग्रॅहम गूच. गूचनं इंग्लंड क्रिकेट संघाकडून खेळण्यापूर्वी एसेक्ससाठी क्रिकेट खेळलं आहे. 1975 मध्ये, ग्रॅहम गूच इंग्लंडच्या कसोटी संघात सामील झाला आणि 1975 मध्ये बर्मिंगहॅम इथं ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला. पहिल्या कसोटीत गूचचं नशीब चांगलं नव्हतं आणि तो दोन्ही डावात एकही धाव न काढता बाद झाला. या इंग्लिश फलंदाजाला अशा पद्धतीनं बाद केल्यानंतर हाच क्रिकेटपटू इंग्लिश क्रिकेटला कलाटणी देईल, असं कुणालाही वाटलं नसेल. एकीकडे गूच पदार्पणाच्या कसोटीत एकही धाव न काढता बाद झाला, तर दुसरीकडे लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर त्रिशतक झळकावण्यातही तो यशस्वी ठरला. लॉर्ड्सवर कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणारा गूच हा जगातील पहिला क्रिकेटपटू आहे.

Graham Gooch
ग्रॅहम गूच (Getty Images)

लॉर्ड्सवर खेळली ऐतिहासिक खेळी : ग्रॅहम गूचनं 1990 मध्ये भारताविरुद्ध लॉर्ड्स कसोटीत 333 धावांची शानदार इनिंग खेळली होती. जी आजही लक्षात आहे. गूचनं खेळलेली ही खेळी कोणत्याही फलंदाजानं लॉर्ड्सवर खेळलेली सर्वात मोठी खेळी आहे. आपल्या संस्मरणीय खेळीत गूचनं 485 चेंडूंचा सामना केला आणि 43 चौकार लगावले. याशिवाय इंग्लंडच्या या दिग्गज खेळाडूनं 3 षटकारही ठोकले होते. याच कसोटीच्या दुसऱ्या डावातही गूचनं शतक झळकावलं आणि 123 धावा करुन तो बाद झाला. म्हणजेच एका कसोटी सामन्यात गूचनं एकूण 456 धावा करुन सर्वांना आश्चर्यचकित केलं. जो आजही एका कसोटीत सर्वाधिक वयक्तिक धावांचा विक्रम असून तो आजही कायम आहे.

ग्रॅहम गूचनं केलं इंग्लंडचं नेतृत्व : ग्रॅहम गूचनं 34 सामन्यांत इंग्लंड संघाचं नेतृत्व केलं आहे. त्याच्या नेतृत्वाखाली गूचनं 10 कसोटी सामन्यांमध्ये इंग्लंडला विजय मिळवून दिला. गूच हा लॉर्ड्सवर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. गूचनं लॉर्ड्सवर 21 कसोटी सामने खेळले असून यात तो 2015 धावा करण्यात यशस्वी ठरला होता. लॉर्ड्सवर गूचच्या नावावर 6 शतकं आणि 5 अर्धशतकं आहेत.

3 कसोटी सामन्यांच्या मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम : 1990 मध्ये भारताविरुद्धच्या 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेत गूचनं एकूण 752 धावा केल्या होत्या. ज्या 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेत एखाद्या फलंदाजानं केलेली सर्वोच्च धावसंख्या आहे. भारताच्या इंग्लंड दौऱ्यात गूचनं हे आश्चर्यकारक काम केले. 1990 मध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यांच्या मालिकेत, गूचनं 3 शतकं आणि 2 अर्धशतकं झळकावली, ज्यात त्रिशतकांचाही समावेश होता.

इंग्लंडकडून सर्वाधिक धावा करणारा ग्रॅहम गूच हा दुसरा फलंदाज : ग्रॅहम गूच हा इंग्लंडसाठी कसोटीत सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू आहे, गूचनं कसोटीत 8900 धावा केल्या आहेत. गूचचा विक्रम ॲलिस्टर कुकनं मोडला. सध्या कुक हा इंग्लंडसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.

गूचनं क्रिकेट कारकिर्दीत झळकावली 200 शतकं : जर आपण ग्रॅहम गूचच्या संपूर्ण क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोललो तर त्यानं आंतरराष्ट्रीय, प्रथम श्रेणी आणि लिस्ट ए सामन्यांमध्ये तब्बल 200 शतकं झळकावली आहेत. गूचनं कसोटीत 20 शतकं, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 8 शतकं, प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 128 शतकं आणि लिस्ट ए क्रिकेटमध्ये 44 शतकं झळकावली आहेत. अशाप्रकारे गूचने आपल्या संपूर्ण कारकिर्दीत 200 शतकं पूर्ण केली आहेत.

हेही वाचा :

  1. भारत-बांगलादेश पहिला T20 रद्द होणार? ग्वाल्हेर जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय - IND vs BAN 1st T20I
  2. विराट कोहलीच्या नावावर गोलंदाजीत अनोखा विक्रम... आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 0व्या चेंडूवर विकेट - Virat Kohli Bowling

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.