ETV Bharat / sports

727/2... गोव्याच्या फलंदाजांनी उभारला धावांचा हिमालय; भारतीय क्रिकेटच्या इतिहासात 'असं' घडलंच नव्हतं - HIGHEST EVER PARTNERSHIP IN RANJI

रणजी ट्रॉफीच्या इतिहासात गोव्याच्या संघानं असं काही केलं आहे जे क्रिकेटमध्ये क्वचितच पाहायला मिळतं. एकाच सामन्यात दोन फलंदाजांनी त्रिशतक झळकावून नवा विक्रम रचला.

Highest Ever Partnership In Ranji Trophy
प्रतिकात्मक फोटो (Getty Images)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : Nov 14, 2024, 4:04 PM IST

पोर्वोरिम Highest Ever Partnership In Ranji Trophy : क्रिकेट सामन्यात त्रिशतक झळकावणं कोणत्याही फलंदाजासाठी खूप अवघड असतं, पण भारतीय भूमीवर असा सामना खेळला जात आहे, ज्यात एक नव्हे तर दोन फलंदाजांनी त्रिशतक झळकावण्याचा मोठा विक्रम रचला आहे. हा अनोखा विक्रम भारताच्या प्रतिष्ठेच्या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत रणजी ट्रॉफीमध्ये पाहायला मिळाला आहे. गोवा संघानं स्पर्धेतील प्लेट गट सामन्यात अरुणाचल प्रदेशविरुद्ध खेळताना हा ऐतिहासिक विक्रम केला.

700 हून अधिक धावा : या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी गोव्याचे फलंदाज कश्यप बाकले आणि स्नेहल कौठणकर यांनी शानदार तिहेरी शतकं झळकावून क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली. पोर्वोरिम इथं खेळल्या जात असलेल्या या सामन्यात पहिल्या दिवशी गोवा संघानं अरुणाचल प्रदेशचा पहिल्या डावात अवघ्या 84 धावांत संपुष्टात आणला. प्रत्युत्तरात गोव्यानं कश्यप बाकले आणि स्नेहल कौठणकर यांच्या त्रिशतकांच्या जोरावर धावफलकावर 700 हून अधिक धावा केल्या.

गोव्याच्या फलंदाजांनी रचला नवा इतिहास : गोव्यानं पहिला डाव 727/2 धावांवर घोषित केला. यादरम्यान कश्यप बाकले 300 धावा करुन नाबाद माघारी परतला तर स्नेहल कौठणकर 314 धावा करुन नाबाद माघारी परतला. अशा प्रकारे दोन्ही फलंदाजांनी रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वात मोठ्या भागीदारीचा विक्रमही केला. यापूर्वी रणजीमधील सर्वात मोठ्या भागीदारीचा विक्रम महाराष्ट्राच्या स्वप्नील गुगळे आणि अंकित बावणे यांच्या नावावर होता. या दोघांनी 2016 मध्ये दिल्लीविरुद्धच्या सामन्यात तिसऱ्या विकेटसाठी 594 धावांची भागीदारी केली होती. कश्यप बकले आणि स्नेहल कौठणकर यांनी अरुणाचल प्रदेशविरुद्धच्या प्लेट ग्रुप सामन्यात तिसऱ्या विकेटसाठी नाबाद 606 धावांची भागीदारी केली. अशा प्रकारे, रणजी करंडक स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मोठी भागीदारी म्हणून रेकॉर्ड बुकमध्ये नोंद झाली.

एकाच सामन्यात 2 त्रिशतकं : स्नेहल कौठणकरनं अवघ्या 205 चेंडूत त्रिशतक झळकावलं, जे प्रथम श्रेणी क्रिकेटच्या इतिहासातील भारतीयाचं दुसरं सर्वात जलद त्रिशतक आहे. त्याचवेळी कश्यप बकाले हा प्रथम श्रेणी इतिहासात भारताकडून तिसरा जलद त्रिशतक करणारा फलंदाज ठरला. स्नेहलनं 215 चेंडूंत 45 चौकार व 4 षटकारांच्या मदतीनं नाबाद 314 धावा केल्या, तर कश्यप बकलेनं 269 चेंडूंत 39 चौकार व 2 षटकारांच्या मदतीनं नाबाद 300 धावा केल्या. याशिवाय प्रभुदेसाईनंही 73 धावांचं योगदान दिलं.

हेही वाचा :

  1. 'गब्बर' इज बॅक... शिखर धवन 'या' देशातील संघाकडून खेळणार क्रिकेट, निवृत्तीनंतर घेतला मोठा निर्णय
  2. एकाच महिन्यात दोनदा भिडणार भारत-पाकिस्तान... कोणत्या दिवशी होणार ब्लॉकबस्टर क्रिकेट सामने, वाचा सविस्तर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.