मुंबई Vinod Kambli : भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडिओत विनोद कांबळीला चालताना त्रास होत असल्याचं स्पष्ट दिसत होतं. चालण्यासाठी दोन व्यक्ती त्याच्या हाताला धरून मदत करत होते. आपल्या दमदार फलंदाजीनं गोलंदाजांना घाम फोडणाऱ्या विनोदची अशी अवस्था पाहून क्रिकेट चाहत्यांकडून हळहळ व्यक्त केली जात होती. या व्हायरल व्हिडिओनंतर विनोद कांबळीचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय. त्यामध्ये त्यानं त्याच्या प्रकृतीबाबत स्पष्टीकरण दिलय.
After facing some health issues, former Indian cricketer, #Vinodkambli is fit and fine, and doing well. His school mate, Ricky Couto and First Class Umpire, Marcus Couto spent 5 hrs with him yesterday during which he was in good spirits and spoke to several other friends as well. pic.twitter.com/e79LpBKRoc
— Rameshwar Singh (@RSingh6969a) August 9, 2024
मी एकदम फिट : विनोद कांबळीचे मित्र रीकी कोटो तसंच प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पंच मार्कस कोटो यांनी नुकतीच विनोद कांबळीची त्याच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी विनोद कांबळीशी संवाद साधला. यावेळी विनोद कांबळी म्हणला की, "मी एकदम फिट आहे. मी आजही तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंग करु शकतो. फिरकीपटूंचे चेंडू आजही मैदानाबाहेर पाठवू शकतो." विनोदने आपल्या अनेक मित्रांशी संपर्क साधून गप्पा मारल्या, असं रीकी कोटो यांनी सांगितलं. विनोद कांबळीच्या या प्रतिक्रियेमुळे आता त्याच्याबाबतच्या तर्क-वितर्कांना आणि विवादांना पूर्णविराम मिळाला आहे.
Sad look at Vinod Kambli’s condition He was once among best batters/fielders in 🇮🇳 cricket team Bad luck/lifestyle is the apparent cause of his present state of health His pal 'Bharat Ratna' Sachin Tendulkar & BCCI shd help in his best possible rehabilitation fast ✅☝️ pic.twitter.com/ZVSC2fpeTl
— G M A PRABHU (@GMAPRAPRABHU1) August 5, 2024
विनोदी कांबळीच्या व्हायरल व्हिडिओमध्ये काय : विनोद कांबळीचा मुंबईतील व्हायरल व्हिडिओ समोर आला होता. या व्हिडिओत विनोद एका बाईकला धरून उभं राहण्याचा प्रयत्न करत होता. त्याला नीट उभं राहता येत नव्हतं. त्यावेळी तेथील एक व्यक्ती त्याच्या मदतीला येतो. पण या एका व्यक्तीला विनोदला सांभाळता येत नव्हतं. त्यावेळी विनोद अजून एका व्यक्तीला मदत करण्याची विनंती करतो. त्यांनतर दोन्ही व्यक्तींच्या व्यक्तीने विनोदला रस्त्याच्या फुटपाथवर नेण्यात आलं.
Disclaimer- व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या सत्यतेबाबत ईटीव्ही भारत कोणतीही पुष्टी करत नाही.
हेही वाचा
- विनेश फोगटच्या अपिलावर सुनावणी पूर्ण, रौप्यपदकाची आशा कायम; कधी येणार मोठा निर्णय? - Vinesh Phogat Plea Result
- पाकिस्तानचं एक पदक भारताच्या सहा पदकांवर पडलं भारी; 40 वर्षांनंतर भारतावर आली 'ही' नामुष्की - PARIS OLYMPIC 2024
- विनेश फोगटप्रमाणेच अमन सेहरावतचंही वाढलं होतं वजन, 10 तासांत 4.6 किलो वजन कमी करत रचला इतिहास; कसा घडला 'चमत्कार'? - Paris Olympics 2024