रावळपिंडी Fast Bowler Not Bowl A Single Ball : इंग्लंड आणि पाकिस्तान क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात पाकिस्ताननं 9 गडी राखून दणदणीत विजय नोंदवला. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी (26 ऑक्टोबर) पाकिस्तानला विजयासाठी 36 धावांचं माफक लक्ष्य देण्यात आलं होतं, जे त्यांनी सहज गाठले. धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानची एकमेव विकेट सॅम अयुबच्या रुपानं पडली. या विजयासह पाकिस्ताननं तीन सामन्यांची कसोटी 2-1 नं जिंकली.
Noman Ali, Sajid Khan share 19 wickets between them in the third Test to power Pakistan to an unforgettable series win against England 🌟#WTC25 | #PAKvENG https://t.co/esU1zkorg9
— ICC (@ICC) October 26, 2024
इतिहासात पहिल्यांदाचं घडलं : पाकिस्तान क्रिकेट संघानं आपल्या कसोटी इतिहासातील पहिला सामना 1952 मध्ये भारताविरुद्ध खेळला होता. तेव्हापासून पाकिस्ताननं 461 कसोटी सामने खेळले आहेत. आतापर्यंत, पाकिस्तानच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात असं कधीही घडलं नव्हतं, जेव्हा वेगवान गोलंदाजांनी एकही चेंडू टाकला नाही आणि पाकिस्ताननं कसोटी जिंकली. 72 वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं आहे. रावळपिंडी इथं खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्ताननं 9 गडी राखून विजय मिळवला. मात्र या कसोटी सामन्यात एकाही वेगवान गोलंदाजानं पाकिस्तानसाठी गोलंदाजी केली नाही आणि तरीही पाकिस्तान संघ सामना जिंकण्यात यशस्वी ठरला.
Pakistan achieve their first Test series victory under the leadership of Shan Masood 👏#WTC25 | #PAKvENG 📝: https://t.co/87QqjAVXzJ pic.twitter.com/h5beApSmrK
— ICC (@ICC) October 26, 2024
मालिकेत फिरकीपटूंचं वर्चस्व : या मालिकेत दोन्ही संघांच्या फिरकीपटूंनी मिळून एकूण 73 विकेट घेतल्या, हा देखील एक विक्रम आहे. याआधी पाकिस्तानमध्ये एकाही कसोटी मालिकेत फिरकीपटूंनी इतक्या विकेट्स घेतल्या नाहीत. यापूर्वी 1969/70 मध्ये पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या कसोटी मालिकेत फिरकीपटूंनी एकूण 71 बळी घेतले होते. पाकिस्तानचे फिरकी गोलंदाज साजिद खान आणि नोमान अली हे इंग्लंडविरुद्धच्या विजयाचे सर्वात मोठे हिरो ठरले. हे दोन्ही गोलंदाज मालिकेच्या पहिल्या सामन्यात प्लेइंग 11 चा भाग नव्हते, तरीही या दोन गोलंदाजांच्या नावावर या मालिकेतील सर्वाधिक विकेट्स आहेत.
🚨 PAKISTAN WON A TEST SERIES AT HOME AFTER 3 LONG YEARS 🚨
— Johns. (@CricCrazyJohns) October 26, 2024
- Pakistan chase down 36 runs in just 3.1 overs. pic.twitter.com/PXszVXam9b
- नोमान अलीनं या मालिकेत 2 सामने खेळले आणि 20 विकेट घेतल्या, तो सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. त्याचबरोबर साजिद खाननंही 2 सामन्यांच्या 4 डावात एकूण 19 फलंदाजांना आपला बळी बनवलं. या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर राहिला. तर इंग्लंडचा जॅक लीच 16 बळी घेऊन इंग्लंडचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला.
पाकिस्तानमध्ये एका मालिकेत फिरकीपटूंनी घेतलेले सर्वाधिक बळी :
- 73 - पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड, 2024/25
- 71 - पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, 1969/70
- 68 - पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड, 2022/23
- 60 - पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड, 1987/88
- Lost 1st Test an innings.
— Tanuj Singh (@ImTanujSingh) October 26, 2024
- Conceded 800+ in 1st Test.
- Comeback in 2nd Test Match.
- Won 2nd Test.
- Won 3rd Test.
- Won the series by 2-1.
Pakistan have done it, Won the Test series at Home after 3 Years - What a Remarkable Comeback by Pakistan. 👏 pic.twitter.com/EwqfBloood
1995 नंतर दुसऱ्यांदा असं घडलं : पहिली कसोटी गमावल्यानंतर पाकिस्ताननं 3 सामन्यांची कसोटी मालिका जिंकण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी 1995 मध्ये झिम्बाब्वेविरुद्धची पहिली कसोटी हरल्यानंतर पाकिस्तान संघानं 3 सामन्यांची कसोटी मालिका जिंकण्यात यश मिळविलं होतं.
साजिद-नोमाननं केला कहर : या सामन्यात पाकिस्ताननं इंग्लंडला दुसऱ्या डावात केवळ 112 धावांवर रोखलं. इंग्लंडकडून दुसऱ्या डावात जो रुटनं सर्वाधिक 33 आणि हॅरी ब्रूकनं 26 धावा केल्या. पाकिस्तानकडून डावखुरा फिरकी गोलंदाज नोमान अलीनं सहा बळी घेतले. तर ऑफस्पिनर साजिद खाननं चार बळी मिळवले. या सामन्यात साजिद खाननं 10 आणि नोमान अलीनं 9 विकेट घेतल्या.
All smiles 🤩
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 26, 2024
Winners of the Bank Alfalah presents Kingdom Valley Pakistan vs England Test Series 2024 🏆#PAKvENG | #TestAtHome pic.twitter.com/jzuHHVC3hF
साजिद खान मालिकावीर : या सामन्यात इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 267 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्ताननं पहिल्या डावात सौद शकीलच्या शतकाच्या जोरावर 344 धावा केल्या. पहिल्या डावाच्या आधारे पाकिस्तानकडं 77 धावांची आघाडी होती. शकीलनं 223 चेंडूत 134 धावांची खेळी खेळली, ज्यात पाच चौकारांचा समावेश होता. शकीलची 'प्लेअर ऑफ द मॅच' म्हणून निवड करण्यात आली. तर साजिद खानला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला.
सामन्याची संक्षिप्त धावसंख्या :
- इंग्लंड : पहिला डाव 267 धावा, दुसरा डाव 112 धावा
- लक्ष्य : 36 धावा
- पाकिस्तान : पहिला डाव 344 धावा, दुसरा डाव 37/1
हेही वाचा :