ETV Bharat / sports

T20 क्रिकेटमध्ये घडला इतिहास... 'या' संघाच्या सर्व 11 खेळाडूंनी केली गोलंदाजी - ALL 11 PLAYERS BOWLING IN MATCH

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी सामन्यात दिल्ली संघानं अनोखा विश्वविक्रम केला आहे.

11 Players Bowled
प्रतिकात्मक छायाचित्र (ANI Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : Nov 29, 2024, 3:29 PM IST

मुंबई 11 Players Bowled : T20 क्रिकेटमध्ये तुम्ही अनेकदा फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात विश्वविक्रम बनवताना पाहिलं असेल, पण सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये दिल्लीच्या संघानं 11 खेळाडूंना गोलंदाजी करुन विश्वविक्रम केला. मणिपूरविरुद्धच्या या सामन्यात दिल्लीच्या संघानं सर्व 11 खेळाडूंना गोलंदाजी करायला दिली. T20 क्रिकेटच्या इतिहासात हे पहिल्यांदाच पाहायला मिळालं आहे. यापूर्वी, टी-20 च्या एका डावात सर्वाधिक 9 गोलंदाजांचा वापर केला जात होता. परंतु आता दिल्लीनं काहीतरी आश्चर्यकारक केलं आहे.

सर्व 11 खेळाडूंनी केली गोलंदाजी : या सामन्यात मणिपूरनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवात खराब झाली आणि सलामीवीर कंगबम प्रियोजीत सिंग 0 धावांवर बाद झाला. यानंतर दिल्लीचा कर्णधार आयुष बधोनीनं अशी रणनीती अवलंबली जी खरोखरच आश्चर्यकारक होती. त्यानं आपल्या संघातील सर्व खेळाडूंना गोलंदाजी केली. आयुष सिंगशिवाय अखिल चौधरी, हर्ष त्यागी, दिग्वेश राठी, मयंक रावत यांनी गोलंदाजी केली. यानंतर आयुष बधोनी विकेटकीपिंग सोडून स्वत: गोलंदाजीला आला. याशिवाय आर्यन राणा, हिम्मत सिंग, प्रियांश आर्य, यश धुल आणि अनुज रावत यांनीही गोलंदाजी केली.

मणिपूर 120 धावांत मर्यादित : दिल्ली संघाच्या सर्व 11 खेळाडूंनी गोलंदाजी केली पण असं असतानाही मणिपूर संघ केवळ 120 धावा करु शकला. दिल्लीकडून सर्वोत्तम गोलंदाजी दिग्वेश राठीनं केली, ज्यानं 8 धावांत 2 बळी घेतले. हर्ष त्यागीनं 2 आणि कर्णधार आयुष बधोनीलाही एक विकेट मिळाली. एकवेळ मणिपूरनं 41 धावांवर 6 विकेट गमावल्या होत्या पण शेवटी रेक्स सिंगनं 23 धावा केल्या आणि अहमद शाहनं 32 धावा केल्या आणि कसंतरी संघाला 120 धावांपर्यंत पोहोचवलं.

दिल्लीनं जिंकला सामना : दिल्लीच्या संघानं हा सामना जिंकला पण मणिपूरनं आपली अवस्था बिकट केली. दिल्ली फक्त 9 चेंडूंपूर्वी जिंकली होती आणि 6 विकेट्स पडल्या होत्या. दिल्लीकडून केवळ यश धुलनं नाबाद 59 धावा केल्या. दिल्लीचे बाकीचे फलंदाज संघर्ष करताना दिसले.

हेही वाचा :

  1. Live क्रिकेट सामन्यात चौकार मारताच फलंदाजाचा मृत्यू, क्रिकेट विश्वावर शोककळा
  2. अव्वल फलंदाजाचा लाजिरवाणा विक्रम; कसोटी क्रिकेटच्या इतिहासात फक्त तिसऱ्यांदाच घडलं
  3. करेबियन संघाविरुद्ध मालिकेत मिळालं नव्हतं संघात स्थान; आता 'कीवीं'विरुद्ध झळकावलं ऐतिहासिक विक्रमी शतक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.