दांबुला SL Beat WI For First Time in T20I Series : श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरु असलेल्या तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात वेस्ट इंडिजचा 9 गडी राखून पराभव केला आणि मालिका 2-1 अशा फरकानं जिंकली. वेस्ट इंडिजविरुद्ध श्रीलंकेचा हा पहिलाच T20 मालिका विजय आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या वेस्ट इंडिज संघानं 20 षटकांत 8 विकेट गमावत 162 धावा केल्या. यानंतर श्रीलंकेनं विजयासाठी 163 धावांचं लक्ष्य 18 षटकांत 1 गडी गमावून पूर्ण केले. श्रीलंककडून पथुम निसांकानं 39 धावा, कुसल मेंडिसनं नाबाद 68(50) आणि कुसल परेरानं नाबाद 55(36) धावा करत संघाला विजयापर्यंत नेलं. गुणकेश मोटीनं पथुम निसांकाच्या रुपानं वेस्ट इंडिजला एकमेव विकेट मिळवून दिले. 39 केल्यानंतर निसांका मोटीच्या चेंडूवर बोल्ड झाला. कुसल मेंडिसला सामनावीर आणि पथुम निशांकला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आलं.
Not enough to get us the win today.
— Windies Cricket (@windiescricket) October 17, 2024
Well played to @OfficialSLC and the series win.👏🏿#SLvWI | #MenInMaroon pic.twitter.com/HX2NXiRfVj
वेस्ट इंडिजची खराब फलंदाजी : या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या वेस्ट इंडिज संघानं 20 षटकांत 8 गडी गमावून 162 धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून कर्णधार रोव्हमन पॉवेलनं सर्वाधिक 37 धावांची शानदार खेळी केली. रोव्हमन पॉवेलशिवाय गुडाकेश मोटीनं 32 धावा केल्या. श्रीलंकेकडून महीश तिक्षाना आणि वानिंदू हसरंगा यांनी प्रत्येकी सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. नुवान तुषारा, कामिंदू मेंडिस, कर्णधार चारिथ असलंका आणि मथिशा पाथिराना यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
श्रीलंकेचा दणदणीत विजय : हा सामना जिंकण्यासाठी श्रीलंकेच्या संघाला 20 षटकांत 163 धावा करायच्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या श्रीलंकेच्या संघाची सुरुवात चांगली झाली आणि पहिल्या विकेटसाठी सलामीच्या दोन्ही फलंदाजांनी शानदार फलंदाजी करत अवघ्या 32 चेंडूत 60 धावा फलकावर लावल्या. श्रीलंकेच्या संघानं अवघ्या 18 षटकांत एक विकेट गमावून लक्ष्य गाठलं. श्रीलंकेसाठी कुसल मेंडिसनं सर्वाधिक नाबाद 68 धावांची खेळी खेळली. कुसल मेंडिसशिवाय कुसल परेरानं नाबाद 55 धावा केल्या. गुडाकेश मोटीनं वेस्ट इंडिज संघाला पहिलं मोठं यश मिळवून दिलं. वेस्ट इंडिजकडून गुडाकेश मोटीनं एकमेव विकेट घेतली. गुडाकेश मोटी व्यतिरिक्त कोणत्याही गोलंदाजाला यश मिळालं नाही. या T20 मालिकेनंतर 20 ऑक्टोबरपासून दोन्ही संघांमध्ये एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे.
हेही वाचा :