बार्बाडोस ENG vs WI T20I Series : इंग्लंड क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. तिथं दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जात आहे. यानंतर पाच सामन्यांची T20 मालिका खेळवली जाणार आहे. वनडे मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांनंतर दोन्ही संघ 1-1 नं बरोबरीत आहेत. तर T20 मालिकेतील पहिला सामना 10 नोव्हेंबरपासून खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी इंग्लंड संघ आणि त्यांच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी आली आहे. इंग्लंडचा एक स्टार खेळाडू पूर्णपणे तंदुरुस्त झाला असून T20 विश्वचषकानंतर तो इंग्लंडच्या संघात पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. हा खेळाडू दुसरा कोणी नसून इंग्लंडचा व्हाईट बॉल फॉरमॅटचा कर्णधार जॉस बटलर आहे.
Phil Salt 5️⃣ 9️⃣
— England Cricket (@englandcricket) November 3, 2024
Jacob Bethell 5️⃣ 5️⃣
Sam Curran 5️⃣ 2️⃣
Liam Livingstone 1️⃣ 2️⃣ 4️⃣ *
Vital contributions with the bat 👏
🌴 #WIvENG 🏴 | #EnglandCricket pic.twitter.com/R210q1BbRi
बटलरला दुखापत कशी झाली होती? : इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलर पाच सामन्यांच्या T20 मालिकेसाठी वेस्ट इंडिजला पोहोचला आहे. तिथं पोहोचताच त्यानं सरावाला सुरुवातही केली. T20 विश्वचषक 2024 पासून बटलरची त्याच्या संघाला खूप आठवण येत होती. मात्र दुखापतीमुळं बटलर गेल्या चार महिन्यांपासून आपल्या संघासाठी एकही सामना खेळू शकला नाही. वर्ल्ड कप दरम्यानच बटलरला दुखापत झाली होती. तरी त्यानं विश्वचषकातील सर्व सामने आपल्या संघासाठी खेळले आणि त्यानंतरच तो विश्रांतीला गेला.
Look who's arrived in Barbados 👀 ✈️
— England Cricket (@englandcricket) November 4, 2024
Great to have you here, @josbuttler 🙌
🌴 #WIvENG 🏴 | #EnglandCricket pic.twitter.com/5LwSNyO2He
बटलर दिसणार नव्या भूमिकेत : बटलरचं इंग्लंड संघात पुनरागमन झालं तरी फिल सॉल्ट विकेटकिपींग करणार आहे. संपूर्ण T20 मालिकेत बटलर फलंदाज म्हणून खेळणार आहे. अलीकडंच मी इंग्लंडसाठी फारसं काही केलं नाही, असं सॉल्टनं सांगितलं. पण मला विकेटकीपिंग आवडते. या क्षेत्रात मी संघासाठी सर्वाधिक योगदान देऊ शकतो, असं सॉल्ट म्हणाला. त्याच वेळी, बटलरनं सप्टेंबरमध्ये असंही म्हटलं होतं की जर त्याच्या यष्टीरक्षणाचा संघाला फायदा झाला तर तो त्यासाठीही तयार आहे. मी विकेटकीपिंग सोडण्यास तयार असून मिडऑफमध्ये खेळू शकतो, असं तो म्हणाला होता. मला ते कसे वाटते ते पहायचे आहे. माझ्या कर्णधारपदामुळं मदत झाली तर मी त्यासाठी तयार आहे.
A record-breaking chase! 📈
— England Cricket (@englandcricket) November 2, 2024
What a performance to level the series! 🙌
🌴 #WIvENG 🏴 | #EnglandCricket pic.twitter.com/obyvrDp12E
मालिका 1-1 नं बरोबरीत : या मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंड संघाला 8 विकेटनं पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. मात्र त्यांनी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दमदार पुनरागमन केलं आणि इंग्लंडनं हा सामना 5 विकेटनं जिंकला. या सामन्यात संघाचा कर्णधार लियाम लिव्हिंग्स्टननं शानदार शतक झळकावलं. त्याच्या शतकामुळं त्याच्या संघानं 15 चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला. या सामन्यातील विजयासह त्याच्या संघानं तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. या मालिकेतील शेवटचा सामना 06 नोव्हेंबर रोजी होणार आहे. हा सामना जिंकणारा संघ मालिका जिंकेल.
हेही वाचा :