साउथॅम्प्टन England vs Australia 1st T20I Live Streaming : इंग्लंड क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची टी 20 मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आज 11 सप्टेंबर रोजी होणार आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघ पूर्ण तयारीत आहेत. भारताविरुद्ध टी 20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील पराभवानंतर इंग्लंड संघाचा हा पहिलाच टी 20 सामना असणार आहे. ऑस्ट्रेलियन संघाचं आव्हान इंग्लंडसाठी सोपं नसेल. अलीकडेच ऑस्ट्रेलियानं स्कॉटलंडविरुद्ध टी 20 मालिका 3-0 नं जिंकली आणि या मालिकेपूर्वी ते जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहेत.
We've named our XI to kick off our IT20 series with Australia 📝
— England Cricket (@englandcricket) September 10, 2024
Three debutants 🫡#ENGvAUS | #EnglandCricket
नवीन खेळाडूंसह इंग्लंडचा संघ मैदानात : इंग्लंडसाठी, श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिका संपल्यानंतर लगेचच टी 20 मालिका सुरु होत आहे. त्यामुळं अनेक खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. परिणामी यजमान संघ नवीन खेळाडूंसह टी 20 मालिकेला सुरुवात करेल, ज्यांना त्यांचा कट्टर प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाविरुद्ध धमाका करायचा आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीला होणाऱ्या ICC चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तयारीसाठी दोन्ही संघ 3 टी 20 आणि 5 वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहेत. भारतातील अनेक चाहत्यांना ही मालिका पहायची इच्छा आहे, म्हणून ही मालिका भारतात कधी, कुठे आणि कशी पाहता येईल ते जाणून द्या.
इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेशी संबंधित संपूर्ण माहिती :
- इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला टी 20 सामना कधी होणार?
उभय संघांमधील पहिला टी 20 सामना 11 सप्टेंबर रोजी होणार असून हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजता सुरु होईल.
- इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला टी 20 सामना कुठं खेळला जाईल?
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी 20 सामना साउथॅम्प्टनच्या रोझ बाउल स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
- इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिल्या टी 20 सामन्याचं भारतात कोणते टीव्ही चॅनेल प्रसारण करतील?
भारतीय चाहत्यांना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या टी 20 सामन्याचं प्रसारण पाहता येणार आहे.
- इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला टी 20 सामना कसा लाइव्ह स्ट्रीम कशावर?
भारतीय चाहते सोनी लीव्ह ॲप आणि वेबसाइटवर इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला टी 20 सामना ऑनलाइन लाइव्ह पाहू शकतात.
इंग्लंडचा टी 20 संघ : फिल सॉल्ट (कर्णधार/यष्टीरक्षक), जोफ्रा आर्चर, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, जॉर्डन कॉक्स (यष्टीरक्षक), सॅम करन, जोश हल, विल जॅक, लियाम लिव्हिंगस्टोन, साकिब महमूद, डॅन मौसली, जेमी ओव्हरटन, आदिल राशिद, रीस टोपली, जॉन टर्नर
ऑस्ट्रेलिया टी 20 संघ : मिचेल मार्श (कर्णधार), सेवियर बार्टलेट, कूपर कोनोली, टिम डेव्हिड, नॅथन एलिस, जेक फ्रेझर-मॅकगर्क, कॅमेरॉन ग्रीन, ॲरॉन हार्डी, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), स्पेन्सर जॉन्सन, मार्कस स्टॉयनिस, ॲडम झम्पा
हेही वाचा :