ETV Bharat / sports

रांची कसोटीसाठी साहेबांच्या 'प्लेइंग इलेव्हन'ची घोषणा; 'या' दिग्गज गोलंदाजाचं संघात पुनरागमन

England Playing 11 for 4th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यात शुक्रवारपासून रांची इथं चौथा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. या कसोटीसाठी इंग्लंडनं आपली प्लेइंग इलेव्हन जाहीर केलीय.

England Playing 11 for 4th Test
England Playing 11 for 4th Test
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 22, 2024, 2:32 PM IST

रांची England Playing 11 for 4th Test : रांची इथं शुक्रवारपासून खेळल्या जाणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडनं आपल्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केलीय. ऑफस्पिनर शोएब बशीरचं इंग्लंड संघात पुनरागमन झालंय. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज ऑली रॉबिन्सनलाही संधी मिळाली आहे. तर लेगस्पिनर रिहान अहमद आणि वेगवान गोलंदाज मार्क वुड यांना संघातून वगळण्यात आलंय.

जॉनी बेअरस्टोला आणखी एक संधी : भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना उद्या (शुक्रवार) रांचीच्या जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या महत्त्वाच्या कसोटीसाठी शोएब बशीर इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये परतलाय. अशा परिस्थितीत सर्वांच्या नजरा त्याच्या कामगिरीवर असणार आहेत. तो आपल्या घरेलू कामगिरीची पुनरावृत्ती करुन इंग्लंडला मालिकेत बरोबरी मिळळवून देऊ शकेल का? याचं उत्तर रांचीच्या मैदानावर मिळेल. खराब फॉर्मशी झुंजत असलेल्या जॉनी बेअरस्टोला इंग्लंडनं आणखी एक संधी दिलीय. रांची कसोटीतही तो प्लेइंग इलेव्हनचा भाग असणार आहे. तसंच रांची कसोटीत वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन देखील प्लेइंग इलेव्हनमध्ये असणार आहे. तर लेगस्पिनर रिहान अहमदला संघातून वगळण्यात आलंय.

अँडरसनला इतिहास रचण्याची संधी : इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसननं आतापर्यंत 185 कसोटी सामन्यांत 696 बळी घेतले आहेत. तो 700 बळी घेण्याच्या अगदी जवळ आहे. जेम्स अँडरसनचा हा सातवा भारत दौरा आहे. अँडरसननं भारताविरुद्धच्या 37 कसोटी सामन्यांमध्ये 25.35 च्या सरासरीनं 145 बळी घेतले आहेत. यात अँडरसननं सहा वेळा एका डावात पाच किंवा त्याहून अधिक बळी घेतले आहेत. 2012 मध्ये झालेल्या मालिकेत अँडरसननं खूप महत्त्वाची भूमिका बजावली होती. तेव्हा इंग्लंडनं एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा 2-1 नं पराभव केला होता. अँडरसननं त्या मालिकेत 12 बळी घेतले होते.

चौथ्या कसोटीसाठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन : झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रुट, बेन स्टोक्स (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (यष्टिरक्षक), टॉम हार्टली, शोएब बशीर, ऑली रॉबिन्सन आणि जेम्स अँडरसन

हेही वाचा :

  1. लोकसभेच्या रणधुमाळीत रंगणार आयपीएल, 'या' तारखेपासून होणार सुरु; 17 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच होणार 'ही' गोष्ट
  2. 'संघासह इंग्लंडला परत जा नाहीतर...'; रांचीतील चौथा कसोटी सामना रद्द करण्याची खलिस्तानी 'पन्नू'ची धमकी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.