वेलिंग्टन England Wins Series in New Zealand : वेलिंग्टन इथं सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंड क्रिकेट संघानं दणदणीत विजय नोंदवला आहे. त्यांनी यजमान कीवी संघाचा 323 धावांच्या मोठ्या फरकानं पराभव केला. या विजयासह इंग्लंडने मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतलीय.
England take an unassailable 2-0 lead in the series with a big win in Wellington 💥#WTC25 | #NZvENG 📝: https://t.co/7v7q9gnPSA pic.twitter.com/ivZSW5x5wy
— ICC (@ICC) December 8, 2024
16 वर्षांनी इंग्लंडचा मालिका विजय : बेन स्टोक्सच्या संघानं दुसऱ्या डावात 427 धावा केल्या होत्या आणि पहिल्या डावात 155 धावांच्या आघाडीच्या जोरावर 583 धावांचं महाकाय लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ 259 धावांवर गडगडला. या विजयासह इंग्लंडनं मालिका 2-0 अशी घातली असून 16 वर्षांनंतर न्यूझीलंडमध्ये कसोटी मालिका जिंकली आहे. मात्र, अजून एक सामना बाकी असला तरी त्यात पराभूत होऊनही ही मालिका इंग्लंडच्या नावावर राहणार आहे.
Test victory. Series victory. pic.twitter.com/kEtytT6sMM
— England Cricket (@englandcricket) December 8, 2024
हॅरी ब्रूक आणि रुट ठरले विजयाचे हिरो : इंग्लंडकडून हॅरी ब्रूक, जो रुट आणि गस ऍटकिन्सन यांनी इंग्लंडच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. पहिल्या डावात अवघ्या 43 धावांत 4 विकेट गमावल्यानंतर ब्रूकनं ऑली पोपसोबत 174 धावांची भागीदारी केली. त्यानं 115 चेंडूत 123 धावांची स्फोटक खेळी करत इंग्लंडला 280 धावांपर्यंत मजल मारली. दुसऱ्या डावातही त्यानं अर्धशतक झळकावलं. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला सामनावीर म्हणूनही निवडण्यात आले. दुसऱ्या डावात जो रुटनं 106 धावांची खेळी केली आणि 583 धावांचं मोठं लक्ष्य ठेवण्यात मदत केली.
Two wickets for Ben Stokes 💪
— England Cricket (@englandcricket) December 8, 2024
First, Matt Henry tries to smash it over cow corner and is caught in the deep by Jacob Bethell.
Then, Nathan Smith attempts to pull a short ball but can only glove it down the leg side and is caught behind.
One to get.
🇳🇿 2️⃣5️⃣4️⃣-9️⃣ pic.twitter.com/xewYi6z8Ed
गोलंदाजांनीही दाखवली ताकद : फलंदाजांनंतर इंग्लंडच्या गोलंदाजीनं मिळून न्यूझीलंडच्या फलंदाजांची शिकार केली. पहिल्या डावात, गस ऍटकिन्सन आणि ब्रेडन कार्स यांनी 4-4 बळी घेत टॉम लॅथमच्या संघाला केवळ 125 धावांत गुंडाळलं आणि 155 धावांची भक्कम आघाडी घेण्यास मदत केली. दुस-या डावात कर्णधार बेन स्टोक्सनं 3, कार्स, ख्रिस वोक्स आणि शोएब बशीरनं प्रत्येकी 2 आणि ऍटकिन्सननं 1 बळी घेतला. अशाप्रकारे इंग्लंडनं दुसऱ्या डावात न्यूझीलंडला अवघ्या 259 धावांत ऑलआउट केलं.
And we've declared 🤝
— England Cricket (@englandcricket) December 7, 2024
Joe Root nicks off and Ben Stokes says enough's enough. We lead by 5️⃣8️⃣2️⃣ runs in Wellington.
🏴 4️⃣2️⃣7️⃣-6️⃣ (dec) pic.twitter.com/5obxXK8sZR
WTC पॉइंट टेबलची अवस्था काय : वेलिंग्टन कसोटी सामन्यात इंग्लंडनं न्यूझीलंडविरुद्धच्या विजयानंतर जागतिक कसोटी चॅम्पियनशिप 2023-25 च्या गुणतालिकेवर नजर टाकली तर इंग्लंड आता 45.25 पीसीटीसह पाचव्या स्थानावर आहे. तर न्यूझीलंड संघ 44.23 पीसीटीसह सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. मात्र, दोन्ही संघ आधीच अंतिम फेरी गाठण्याच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत.
हेही वाचा :