ETV Bharat / sports

हैदराबादच्या फलंदाजांनी मोडले आयपीएलमधील धावांचे सर्व रेकॉर्ड; घरच्या मैदानावर 'राजधानी एक्सप्रेस' 'फेल' - DC vs SRH - DC VS SRH

IPL 2024 DC vs SRH : आयपीएलच्या 35व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादनं दिल्ली कॅपिटल्सचा 67 धावांनी दारुण पराभव केला. या विजयानंतर हैदराबादचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर विराजमान झालाय.

IPL 2024 DC vs SRH
हैदराबादच्या फलंदाजीनं मोडले आयपीएलमधील धावांचे सर्व रेकॉर्ड; घरच्या मैदानावर दिल्ली राजधानी एक्सप्रेस 'फेल'
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 20, 2024, 7:32 PM IST

Updated : Apr 21, 2024, 6:52 AM IST

दिल्ली IPL 2024 DC vs SRH : आयपीएल 2024 च्या सामन्या 35व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद (SRH) नं दिल्ली कॅपिटल्स (DC) चा 67 धावांनी पराभव केला. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर शनिवारी झालेल्या या सामन्यात हैदराबादनं यजमान संघाला विजयासाठी 267 धावांचं लक्ष्य दिलं होतं. ज्याचा पाठलाग करताना त्यांचा डाव 199 धावांवर आटोपला. सनरायझर्स हैदराबादचा हा सलग चौथा विजय ठरलाय. हैदराबादचा संघ आता सात सामन्यात पाच विजय मिळवत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचलाय. तर दिल्ली कॅपिटल्स आठ सामन्यात तीन विजयांसह सातव्या स्थानावर आहे.

हैदराबादची जोरदार गोलंदाजी : या सामन्यात जेक फ्रेझर-मॅकगर्कनं दिल्ली कॅपिटल्ससाठी सर्वाधिक 65 धावा केल्या, पण त्या अपुऱ्या ठरल्या. जेकनं अवघ्या 18 चेंडूच्या खेळीत 5 चौकार आणि 7 षटकार मारले. कर्णधार ऋषभ पंतनंही 35 चेंडूत 44 धावांची संथ खेळी केली. याशिवाय अभिषेक पोरेलनं 42 धावांचे योगदान दिलं. परंतु ही फलंदाजी सामना जिंकण्यासाठी पुरेशी नव्हती. हैदराबादकडून टी नटराजननं सर्वाधिक 4 विकेट घेतल्या, तर अष्टपैलू नितीश रेड्डी यानंही दोन बळी मिळवले.

हेड आणि अभिषेकचं वादळ : तत्पूर्वी नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या सनरायझर्स हैदराबादची सुरुवात तुफानी झाली. त्यांनी अवघ्या 5 षटकात 100 हून अधिक धावा केल्या. आयपीएलच्या इतिहासातील षटकांच्या बाबतीत हे कोणत्याही संघाचं सर्वात जलद शतक ठरलं. सलामीला हेड आणि अभिषेक शर्मा यांच्यात अवघ्या 6.2 षटकात 131 धावांची भागीदारी झाली. शर्मानं अवघ्या 12 चेंडूत 2 चौकार आणि 6 षटकारांचा 'अभिषेक' करत 46 धावा केल्या. अभिषेक शर्माला कुलदीप यादवनं बाद केलं. यानंतर कुलदीपनं त्याच षटकात एडन मार्करामलाही स्वस्तात बाद केलं. आक्रमक खेळणाऱ्या ट्रॅव्हिस हेडलाही कुलदीपनं बाद केलं. हेडनं आपल्या झंझावाती खेळीत 11 चौकार आणि 6 षटकार मारले.

300 धावा होता होता राहिल्या : हैदराबादचा संघ एकवेळ 300 हून अधिक धावा उभारणार असल्याचं चित्र होतं. मात्र ट्रॅव्हिस हेड बाद झाल्यानंतर धावगती घसरली, पण तरीही सनरायझर्स संघ 267 धावांचा डोंगर उभारण्यात यशस्वी ठरला. हेड आणि अभिषेक बाद झाल्यानंतर नितीश रेड्डी आणि शाहबाज अहमद यांनी उपयुक्त खेळी खेळली. शाहबाज अहमदनं 29 चेंडूत 2 चौकार आणि 5 षटकारांसह नाबाद 59 धावा केल्या. तर नितीश रेड्डीनं 27 चेंडूत 37 धावांची खेळी केली. नितीशनं आपल्या खेळीत 2 चौकार आणि 2 षटकार मारले. दिल्लीकडून कुलदीप यादवनं सर्वाधिक चार विकेट घेतल्या.

आयपीएलमधील सर्वात वेगवान सांघिक शतक (षटकांनुसार) :

  • 5 षटके - SRH विरुद्ध DC, दिल्ली, 2024
  • 6 षटके - CSK विरुद्ध PBKS, मुंबई, 2014
  • 6 षटके - KKR विरुद्ध RCB, बेंगळुरु, 2017
  • 6.5 षटके - CSK विरुद्ध MI, मुंबई, 2015
  • 7 षटके - SRH vs MI, हैदराबाद, 2024

आयपीएलमधील सर्वोच्च पॉवरप्ले स्कोअर :

  • 125/0 - SRH विरुद्ध DC, 2024*
  • 105/0 - KKR विरुद्ध RCB, 2017
  • 100/2 - CSK विरुद्ध PBKS, 2014
  • 90/0 - CSK विरुद्ध MI, 2015
  • 88/1 - KKR विरुद्ध DC, 2024*

आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या :

  • 287/3 - SRH विरुद्ध RCB, बेंगळुरु 2024
  • 277/3 - SRH विरुद्ध MI, हैदराबाद 2024
  • 272/7 - KKR विरुद्ध DC, विशाखापट्टणम 2024
  • 266/7 - SRH विरुद्ध DC, दिल्ली 2024
  • 263/5 - RCB विरुद्ध PWI, बेंगळुरु 2013

आयपीएलमध्ये पहिल्या 10 षटकांनंतर सर्वोच्च धावसंख्या :

  • 158/4 - SRH विरुद्ध DC, दिल्ली, 2024
  • 148/2 - SRH विरुद्ध MI, हैदराबाद, 2024
  • 141/2 - MI विरुद्ध SRH, हैदराबाद, 2024
  • 135/1 - KKR विरुद्ध DC, विशाखापट्टणम, 2024

आयपीएलच्या एका डावात सर्वाधिक षटकार :

  • 22 - SRH विरुद्ध RCB, बेंगळुरु, 2024
  • 22 - SRH विरुद्ध DC, दिल्ली, 2024
  • 21 - RCB विरुद्ध PWI, बेंगळुरु, 2013
  • 20 - RCB विरुद्ध GL, बेंगळुरु, 2016
  • 20 - DC विरुद्ध GL, दिल्ली, 2017
  • 20 - MI विरुद्ध SRH, हैदराबाद, 2024

हेही वाचा :

  1. IPL आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी टीम डेव्हिड आणि किरॉन पोलार्डला दंड - IPL 2024
  2. लखनऊच्या 'नवाबां'समोर चैन्नईचे 'किंग्स' फेल; लखनऊनं घरच्या मैदानावर चेन्नईचा 8 विकेटनं उडवला धुव्वा - LSG vs CSK

Last Updated : Apr 21, 2024, 6:52 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.