ETV Bharat / sports

स्टॉइनिसच्या ऐतिहासिक शतकानं चेन्नईच्या 'किंग्ज'विरुद्ध लखनौ ठरली 'सुपर जायंट्स'; गायकवाडची शतकी खेळी व्यर्थ - CSK vs LSG - CSK VS LSG

IPL 2024 CSK vs LSG : आयपीएलमधील 39व्या सामन्यात लखनौच्या संघानं चेन्नईवर 6 गडी राखून दणदणीत विजय मिळवलाय. या लखनौच्या मार्कस स्टॉइनिसनं शतक झळकावत संघाला शानदार विजय मिळवून दिलाय.

IPL 2024 CSK vs LSG
स्टॉइनिसच्या ऐतिहासिक शतकानं चेन्नईच्या 'किंग्ज'विरुद्ध लखनऊ ठरली 'सुपर जायंट्स'; गायकवाडची शतकी खेळी व्यर्थ
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 23, 2024, 7:33 PM IST

Updated : Apr 24, 2024, 7:38 AM IST

चेन्नई IPL 2024 CSK vs LSG : केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनौ सुपर जायंट्सनं (LSG) इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 मधील 5 वा सामना जिंकलाय. मंगळवारी झालेल्या सामन्यात त्यांनी ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) 6 गडी राखून पराभव केला. चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर हा सामना खेळण्यात आला.

स्टॉइनिसच्या शतकानं एकहाती विजय : या सामन्यात चेन्नई संघानं नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करत 211 धावांचं लक्ष्य ठेवलं. हे लक्ष्य गाठताना लखनौ संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली. संघानं 33 धावांत 2 विकेट गमावल्या होत्या. यानंतर मार्कस स्टॉइनिसनं डाव सावरला. देवदत्त पडिक्कल (13) सोबत 55 धावांची भागीदारी केली. त्यानंतर स्टॉइनिसनं निकोलस पूरन (34) सोबत 34 चेंडूत 70 धावांची भागीदारी केली. त्यानंतर स्टॉइनिसनं 56 चेंडूत आयपीएलमधील त्याचं पहिलं शतक पूर्ण केलं. स्टॉइनिसनं 63 चेंडूत नाबाद 124 धावा करत शतक झळकावलं. या खेळीत त्यानं 6 षटकार आणि 13 चौकार लगावले. तर चेन्नई संघाचा एकही गोलंदाज सामना जिंकून देण्याकरता प्रभावी कामगिरी करू शकला नाही. मथिशा पाथिरानानं सर्वाधिक 2 बळी घेतले. तर मुस्तफिजुर रहमान आणि दीपक चहर यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.

गायकवाडचं दमदार शतक : तत्पूर्वी चेन्नई संघानं नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना 4 गडी गमावून 210 धावा केल्या. संघाकडून कर्णधार ऋतुराज गायकवाडनं 56 चेंडूत शतक झळकावलं. त्यानं 60 चेंडूत 108 धावांची नाबाद खेळी खेळली. यादरम्यान त्यानं 3 षटकार आणि 12 चौकार लगावले. तर शिवम दुबेनं अवघ्या 27 चेंडूत 66 धावा केल्या. त्यानं 7 षटकार आणि 3 चौकार मारले. दुसरीकडे लखनौ संघासाठी कोणताही गोलंदाज चांगली कामगिरी करु शकला नाही. मॅट हेन्री, मोहसीन खान आणि यश ठाकूर यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दुसऱ्यांदा चेन्नई पराभूत : या हंगामातील चेन्नई आणि लखनौ यांच्यातील हा दुसरा सामना होता. तसंच दोन्ही संघांनी शुक्रवारी 19 एप्रिल रोजी एकमेकांविरुद्ध शेवटचा सामना खेळला होता. लखनौमध्ये खेळण्यात आलेल्या या सामन्यात केएल राहुलच्या नेतृत्वाखालील एलएसजी संघानं 8 गडी राखून विजय मिळवला होता. अशाप्रकारे लखनौ संघानं सलग दुसरा सामना जिंकलाय.

स्टॉइनिसनं रचला इतिहास : मार्कस स्टॉइनिसनं धावांचा पाठलाग करताना या सामन्यात नाबाद 124 धावा केल्या. यासह त्यानं धावांचं लक्ष्य गाठताना आयपीएलच्या इतिहासात सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम केलाय. त्यानं पॉल वाल्थाटीचा 13 वर्षांपुर्वीचा विक्रम मोडीत काढलाय.

आयपीएलमध्ये धावांचा पाठलाग करताना सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या :

  • मार्कस स्टॉइनिस (LSG) - 124* धावा, विरुद्ध CSK, चेन्नई 2024
  • पॉल वाल्थाटी (PBKS) - 120* धावा, विरुद्ध CSK, मोहाली 2011
  • वीरेंद्र सेहवाग (DC) - 119 धावा, विरुद्ध डेक्कन चार्जर्स, हैदराबाद 2011
  • संजू सॅमसन (RR) - 119 धावा, विरुद्ध PBKS, मुंबई 2021
  • शेन वॉटसन (CSK) - 117* धावा, विरुद्ध (SRH), मुंबई 2018

हेही वाचा :

  1. RR VS MI IPL 2024 : राजस्थानची 'यशस्वी' खेळी : जैस्वालच्या धडाकेबाज शतकानं मुंबईला पराभवाचा तडाखा, शर्माचे 5 बळी - RR VS MI IPL 2024 38th match
  2. गुलाबी शहरात कोण उधळणार 'विजयाचा गुलाल'? मागील पराभवाचा बदला घेण्यासाठी मैदानात उतरणार मुंबई - RR vs MI Preview

Last Updated : Apr 24, 2024, 7:38 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.