सेंट लुसिया CPL 2024 : कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये 3 सप्टेंबर रोजी दोन संघांमध्ये सामना झाला. हा सामना सेंट लुसिया किंग्ज विरुद्ध अँटिग्वा आणि बारबुडा फाल्कन्स यांच्यात होता. या दोन संघांमधील स्पर्धेमध्ये फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वाखाली सेंट लुसिया किंग्जनं विजय मिळवला. ख्रिस ग्रीनच्या नेतृत्वाखाली अँटिग्वा आणि बारबुडा फाल्कन्सला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला. दोन्ही संघांमधील विजय आणि पराभवाचा फरक एक खेळाडू होता, ज्यानं त्याच्या 4 षटकांच्या स्पेलमध्ये कहर केला होता. सेंट लुसियाचा विजय निश्चित करणाऱ्या खेळाडूचं नाव नूर अहमद आहे.
What a spell by #NoorAhmad for St. Lucia Kings! 🙌
— Star Sports (@StarSportsIndia) September 4, 2024
The Afghan bowler tore through Antigua & Barbuda Falcons, grabbing 3 wickets for just 18 runs in 4 overs! 🔥
Catch him next in #CPLOnStar vs #ImranTahir's Guyana Amazon Warriors | SUN, 8th SEP, 4 AM | Star Sports Network pic.twitter.com/ZjUgisCaJu
24 पैकी 14 चेंडूत एकही धाव दिली नाही : अफगाणिस्तानचा नूर अहमद, CPL 2024 मध्ये सेंट लुसियाकडून खेळत आहे. त्यानं अँटिग्वा आणि बारबुडा फाल्कन्स संघाला त्याच्या चेंडूंवर नाचायला लावलं. त्यानं आपल्या 4 षटकांतील 24 चेंडूंपैकी 14 चेंडू निर्धाव टाकले. म्हणजे यात एकही धाव दिली गेली नाही.
एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही : 19 वर्षीय नूर अहमदच्या नेतृत्वाखालील सेंट लुसियाच्या धारदार गोलंदाजीसमोर अँटिग्वा आणि बारबुडा फाल्कन्स संघाला 20 षटकांत 7 गडी गमावून केवळ 142 धावा करता आल्या. त्यांच्या संघातील एकाही फलंदाजानं मोठी खेळी केली नाही. 26 चेंडूत 36 धावा करणारा सलामीवीर जस्टिन ग्रीव्हस संघाचा सर्वात यशस्वी फलंदाज ठरला. याशिवाय दोन फलंदाजांना 20 धावांचा आकडा ओलांडता आला, त्यापैकी एक होता इमाद वसीम जो 29 धावा केल्यानंतर नाबाद राहिला.
What a spell by #NoorAhmad for St. Lucia Kings! 🙌
— Star Sports (@StarSportsIndia) September 4, 2024
The Afghan bowler tore through Antigua & Barbuda Falcons, grabbing 3 wickets for just 18 runs in 4 overs! 🔥
Catch him next in #CPLOnStar vs #ImranTahir's Guyana Amazon Warriors | SUN, 8th SEP, 4 AM | Star Sports Network pic.twitter.com/ZjUgisCaJu
नूर अहमदनं 4 षटकांत घेतले 3 बळी : अँटिग्वा आणि बार्बुडा फाल्कन्सची फलंदाजी काही खास नव्हती. कारण नूर अहमदनं आपल्या 4 षटकांत त्यांना बांधून ठेवलं. त्यानं 4 षटकांच्या स्पेलमध्ये 18 धावांत 3 बळी घेतले. 4.50 ची इकॉनॉमी असलेल्या नूरनं 2 चेंडूंवर 2 चौकार लगावले. म्हणजेच त्यानं 22 चेंडू टाकले ज्यावर एकही बाऊंड्री दिली नाही. त्यानं अँटिग्वा आणि बारबुडा फाल्कन्सच्या डावातील 14व्या षटकात पहिली विकेट घेतली. तर उर्वरित 2 विकेट 17व्या षटकाच्या 4व्या आणि 5व्या चेंडूवर घेतल्या.
सेंट लुसियानं 7 गडी राखून जिंकला सामना : 19 वर्षीय नूर अहमदच्या चमत्कारानंतर आता सेंट लुसिया किंग्जच्या फलंदाजांवर विजयाची मदार होती. त्यांना विजयासाठी 143 धावांचं लक्ष्य होतं. फाफ डू प्लेसिसच्या संघानं 18 चेंडूत 3 गडी गमावून हे लक्ष्य गाठलं. म्हणजेच त्यांनी अवघ्या 17 षटकांत लक्ष्याचा पाठलाग केला आणि सामना 7 गडी राखून जिंकला. CPL 2024 मध्ये सेंट लुसिया किंग्सचा हा सलग दुसरा विजय आहे. तर अँटिग्वा आणि बारबुडा फाल्कन्सचा सलग दुसरा पराभव.
हेही वाचा :