ETV Bharat / sports

टी 20 क्रिकेट विश्वचषक विजेतेपदाचा दावेदार कोण? रोहित शर्माचे कोच दिनेश लाड म्हणाले... - Dinesh Lad Exclusive

Coach Dinesh Lad Exclusive : रोहित शर्मा, शार्दूल ठाकूर यांना घडवणारे द्रोणाचार्य पुरस्कार विजेते क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांच्यांशी ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीनं संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं.

प्रशिक्षक दिनेश लाड
प्रशिक्षक दिनेश लाड (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 13, 2024, 10:41 PM IST

मुंबई Coach Dinesh Lad Exclusive : वेस्टइंडीज आणि अमेरिका इथं सध्या टी 20 क्रिकेट विश्वचषकाचा थरार रंगत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर सुपर-8 मध्ये एन्ट्री मिळाली आहे. टी-20 क्रिकेट म्हटलं तर सामन्यात फलंदाजांची हुकूमत चालत असते. मात्र, वेस्टइंडीज आणि अमेरिकेतील टी 20 क्रिकेट विश्वचषकात फलंदाजांन इतकं गोलंदाजांनाही महत्व प्राप्त झाल्याचं रोहित शर्मा, शार्दूल ठाकूर यांना घडवणारे द्रोणाचार्य पुरस्कार विजेते क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांनी म्हटलं आहे. त्याच्यांशी ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीनं संवाद साधला.

दिनेश लाड यांच्यांशी ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीची बातचित (ETV Bharat Reporter)

हरमीत सिंग म्हणजे बिशणसिंग बेदी : यावेळी बोलताना दिनेश लाड म्हणाले, वेस्टइंडीज आणि अमेरिका इथं टी 20 क्रिकेट विश्वचषकाच सध्या सुरु आहे. यात माझे दोन मुलं (खेळाडू)आज टी 20 क्रिकेट स्पर्धेत खेळत आहे. सर्वात पाहिले भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि युएसए संघाचा हरमीत सिंग दोघं खेळताय हे माझ्यासाठी अभिमानाची आनंदाची गोष्ट आहे. बहुतेक असं पहिल्यांदा होत असावं की बालपणी क्रिकेटचे धडे दिलेले दोन खेळाडू टी 20 क्रिकेट खेळत असावे. हरमीत सिंगनं गोराई शाळेत शिक्षण घेतलं, त्याची दहावी झाल्यानंतर देखील तो अधूनमधून येऊन मार्गदर्शन घेत होता. 12 वर्ष ते 21 वर्षापर्यंत तो येऊन सरावा करायचा. पहिल्यांदा ज्यावेळेस हरमीतला बघितलं तर बिषणसिंग बेदी सारखा दिसतोय असं माझ्या तोंडातून निघून गेलं होतं. हेच कमेंट ए एन चॅपल यांनी देखील त्याच्या बाबत केलं होतं. ज्यावेळी तो अँडर 19 खेळला आणि तो विश्वचषक जिंकलो होतो. मुंबई जिमखाण्यावर एकदा दिलीप सरदेसाई आले, त्यांनी याला बिषणसिंग बेदी यांचा दुसरा अवतार म्हटलं होतं. याचं बिषणसिंग बेदी यांच्या प्रमाणं त्याची बॉलिंग करण्याची शैली चांगली आणि सुदंर आहे.

भारतीय गोलंदाजांची चांगली कामगिरी : टी 20 क्रिकेट विश्वचषकात निश्चितच भारतीय गोलंदाज चांगली कामगिरी करत आहे. तितक्या पटीनं क्षेत्ररक्षण देखील चांगलं आहे. सर्व संघापेक्षा आपली गोलंदाजी सरस आहे, जसप्रीत बूमरहाला फेस करणं सर्वांसाठी अवघड आहे. टी 20 क्रिकेट सामने म्हटलं की मैदानावर फलंदाजांकडून षटकार आणि चौकारांचा वर्षाव दिसत असतो, आणि अशा वेळी गोलंदाज नेहमीच गोलंदाजी करताना तणावात असतो. मग भला मोठा धावांचा डोंगर उभा पाहायला मिळत असतो, मात्र सध्या सुरु असलेल्या टी 20 क्रिकेट विश्वचषकात तसं दिसत नाही, याचा मला आनंद आहे. टी 20 क्रिकेट बॅट्समन ओरिएंटेड गेम मानला जात होता. फ्लॅट विकेटवर फलंदाजी करायचे मात्र आता फलंदाज एक्सपोज होत आहेत. अशा विकेटवर फलंदाज करणं अवघड आहे. मात्र भारतीय खेळाडू चांगलं प्रदर्शन करत आहे. आता सामना पाहताना आनंद होतोय आता गोलंदाजांना तितकंच महत्व आलंय. आयपीएलमध्ये 200 ते 300 पर्यंत धावा दिसल्या. आता 120 आणि 130 धावांचा पाठलाग करणं कठीण जात आहे. त्यामुळं गोलंदाजाला वेटेज आल्यानं बर वाटत आहे.

भारतीय संघ विजेतेपदाचा दावेदार : टी 20 क्रिकेट विश्वचषकात दावेदार कोण असेल हे सांगणे कठीण आहे. परंतु, भारताची कामगिरी पाहता आपला देश दावेदार असल्याचं दिनेश लाड यांनी म्हटलंय. तसंच त्यासोबत ऑस्ट्रेलिया, वेस्टइंडीज, साऊथ आफ्रिका देखील चांगली कामगिरी करत आहे. तरी देखील भारत टी 20 क्रिकेट विश्वचषक जिकूंन विश्वचषक रोहित शर्माच्या हातात पाहणं हा सर्वात मोठा आनंद आपल्याला होणार असल्याचं लाड यांनी सांगीतलं. खेळाडू घडला जातो घडवला जात नाही मी तर फक्त मार्गदर्शन करतो. रोहित आणि हरमीतनं स्वतःला सिद्ध करुन यापदावर पोहचले आहेत. क्रिकेट खेळात यायचं असेल तर टॅलेंट असणं गरजेचं आहे. नाहीतर वेस्ट ऑफ टाईम टॅलेंट असेल तर क्रिकेटसाठी वेळ दिला पाहिजे. त्यासोबत तुम्ही अभ्यासकडं देखील लक्ष दिलं पाहिजे. भविष्यात क्रिकेटर नाही झालो तर अभ्यासाच्या माध्यमातून दुसरं काही कारिअर करु शकतो. मी नेहमीच बोलत असतो 16 ते 21 वर्षाच्या मुलांनी मोबाईल पासून दूर राहिलं पाहिजे तेंव्हाच तुम्ही जीवनात ध्येय गाठणार.

हेही वाचा :

  1. टी 20 विश्वचषक: भारतीय क्रिकेट संघाचा अमेरिकेवर धडाकेबाज विजय, अर्शदीप सिंगनं रचला इतिहास - IND vs USA
  2. ''घाणेरडं तोंड उघडण्यापूर्वी...''; अकमलच्या वादग्रस्त विधानावर हरभजन सिंगनं दिलं जोरदार प्रत्युत्तर - T20 World Cup 2024
  3. भारत-पाकिस्तान सामना ठरला अखेरचा; 'एमसीए' अध्यक्ष अमोल काळेंचं अमेरिकेत निधन - Amol Kale Passed Away

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.