ETV Bharat / sports

T20 विश्वचषकानंतर नेपाळ कॅनडाविरुद्ध खेळणार पहिलाच सामना; 'इथं' पाहू शकता लाईव्ह मॅच - CAN VS NEP 1st T20I LIVE IN INDIA - CAN VS NEP 1ST T20I LIVE IN INDIA

CAN vs NEP 1st T20I Live Streaming : कॅनडा, नेपाळ आणि ओमान क्रिकेट संघ यांच्यात T20 सामन्यांची तिरंगी मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेला आज म्हणजेच 28 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. (CAN vs NEP 1st T20I Live in India)

CAN vs NEP 1st T20I Live
CAN vs NEP 1st T20I Live (Getty Images)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : Sep 28, 2024, 3:10 PM IST

Updated : Sep 28, 2024, 5:32 PM IST

किंग सिटी CAN vs NEP 1st T20I Live Streaming : कॅनडा राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध नेपाळ राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात T20I तिरंगी मालिका 2024 मधील पहिला सामना 28 सप्टेंबर (शनिवार) रोजी मॅपल लीफ नॉर्थ-वेस्ट ग्राउंड, किंग सिटी इथं भारतीय वेळेनुसार रात्री 9:30 वाजता खेळला जाईल. T20I मध्ये अलीकडचा फॉर्म लक्षात घेता दोन्ही संघांसाठी हा महत्त्वाचा सामना असेल. (CAN vs NEP 1st T20I preview)

विजयी सुरुवात करण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न : कॅनडानं शेवटच्या पाच सामन्यांमध्ये एक सामना जिंकला आहे, ज्यातील दोन सामने झाले नाहीत आणि दोन पराभव झाले आहेत. गेल्या पाच सामन्यांमध्ये, त्यांनी गेल्या महिन्यात नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात 8 धावांच्या फरकानं आपला एकमेव विजय नोंदवला. (CAN vs NEP 1st T20I Live Stream) अलीकडेच त्यांचा अमेरिकेविरुद्ध 20 धावांच्या फरकानं पराभव झाला. घरच्या तिरंगी मालिकेत विजयानं सुरुवात करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. दुसरीकडे नेपाळ संघाबाबात बोलायचं झालं तर त्यांनी पुरुषांच्या T20 विश्वचषक 2024 मध्ये शेवटचा T20I खेळला होता. गेल्या पाच सामन्यांमध्ये नेपाळनं चार सामने गमावले असून त्यातील एक सामना रद्द झाला आहे. ते कॅनडा T20I तिरंगी मालिका 2024 मध्ये त्यांच्या मोहिमेची विजयी सुरुवात करण्याचा प्रयत्न करतील.

कॅनडा विरुद्ध नेपाळ हेड-टू-हेड : नेपाळ आणि कॅनडा यांच्यातील मागील दोन T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये, दोन्ही संघांनी 1-1 वेळा विजय मिळवला आहे, अशा प्रकारे, दोन्ही संघांमधील सामना खूपच मनोरंजक होण्याची शक्यता आहे. (Where and When to Watch CAN VS NEP 1st T20I in India)

  • कॅनडा विरुद्ध नेपाळ यांच्यातील पहिला T20 सामना कधी खेळला जाईल?

कॅनडा विरुद्ध नेपाळ यांच्यातील पहिला T20 सामना शनिवार, 28 सप्टेंबर रोजी होणार आहे.

  • कॅनडा विरुद्ध नेपाळ यांच्यातील पहिला T20 सामना कुठं खेळवला जाईल?

कॅनडा विरुद्ध नेपाळ यांच्यातील पहिला T20 सामना मॅपल लीफ नॉर्थ-वेस्ट ग्राउंड, किंग सिटी इथं होणार आहे.

  • कॅनडा विरुद्ध नेपाळ यांच्यातील पहिला T20 सामना किती वाजता सुरु होईल? (CAN vs NEP 1st T20I Prediction)

कॅनडा विरुद्ध नेपाळ यांच्यातील पहिला T20 सामना भारतीय वेळेनुसार रात्री 9:30 वाजता सुरु होईल.

  • कॅनडा विरुद्ध नेपाळ यांच्यातील पहिला T20 सामना टीव्हीवर कुठं पाहायचा?

कॅनडा विरुद्ध नेपाळ यांच्यातील पहिला T20 सामना भारतात टीव्हीवर दिसणार नाही.

  • कॅनडा विरुद्ध नेपाळ यांच्यातील पहिल्या T20 सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग कुठं पहायचं?

कॅनडा विरुद्ध नेपाळ यांच्यातील पहिल्या T20 सामन्याचं लाइव्ह स्ट्रीमिंग कुठं असेल याबाबत स्पष्टता नाही.

नेपाळ विरुद्ध कॅनडा T20I तिरंगी मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी संभाव्य संघ :

कॅनडा संघ : कंवरपाल तथगुर, श्रेयस मोव्वा (यष्टिरक्षक), आरोन जॉन्सन, दिलप्रीत बाजवा, एन आर किर्तन (कर्णधार), डिलन हेलिगर, हर्ष ठकार, साद बिन जफर, अखिल कुमार, कलीम सना, पी कुमार.

नेपाळ संघ : आसिफ शेख (यष्टिरक्षक), अनिल शाह, रोहित कुमार पौडेल (कर्णधार), कुशल मल्ला, आरिफ शेख, दीपेंद्र सिंग ऐरे, के भुर्तेल, गुलशन कुमार झा, संदीप लामिछाने, सोमपाल कामी, करण के.सी.

हेही वाचा :

  1. कानपूर कसोटी: दुसऱ्या दिवशी बांगलादेशच्या फलंदाजांची नव्हे तर 'इंद्रदेवां'नी केली बॅटींग - IND vs BAN 2nd Test
  2. भारत दौऱ्यापूर्वी न्यूझीलंडच्या फलंदाजांचं लंकन गोलंदाजीसमोर 'त्राहिमाम'; अवघ्या 88 धावांत खुर्दा - SL vs NZ 2nd Test Live

Last Updated : Sep 28, 2024, 5:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.