किंग सिटी (कॅनडा) Canada vs Nepal 1st ODI Live Streaming : आज 16 सप्टेंबरपासून नेपाळ, कॅनडा आणि ओमान क्रिकेट संघ त्रिकोणी मालिकेत एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. ही मालिका ICC क्रिकेट विश्वचषक लीग दोन 2023-2027 चा भाग आहे, जो एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता मार्ग आहे. ICC क्रिकेट विश्वचषक लीग 2 मधील अव्वल चार संघ एकदिवसीय विश्वचषक पात्रता फेरीत स्थान मिळवतील आणि त्यांना ICC क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत सहभागी होण्याच्या अंतिम ध्येयाच्या एक पाऊल जवळ आणतील.
It's Match Day 1 and the Rhinos are ready to rumble! 🦏💥 Let's kick off with a bang as the action starts at 7:45 PM! 🎯🏏
— CAN (@CricketNep) September 16, 2024
Tune in and cheer loud! 🇳🇵#CWCL2 | #NepalCricket | #HappyDressingRoom | #OneBallBattles pic.twitter.com/kmkcD1aWAh
- कॅनडा विरुद्ध नेपाळ ICC क्रिकेट विश्वचषक लीग 2 पहिला ODI सामना कधी खेळला जाईल?
कॅनडा विरुद्ध नेपाळ ICC क्रिकेट विश्वचषक लीग 2 पहिला सामना सोमवार 16 सप्टेंबर रोजी होणार आहे.
- कॅनडा विरुद्ध नेपाळ ICC क्रिकेट विश्वचषक लीग 2 पहिला ODI सामना कुठं खेळला जाईल?
कॅनडा विरुद्ध नेपाळ ICC क्रिकेट विश्वचषक लीग 2 पहिला सामना मॅपल लीफ नॉर्थ-वेस्ट ग्राउंड, किंग सिटी, कॅनडा इथं खेळवला जाणार आहे.
- कॅनडा विरुद्ध नेपाळ ICC क्रिकेट विश्वचषक लीग 2 पहिला ODI सामना किती वाजता खेळला जाईल?
कॅनडा विरुद्ध नेपाळ ICC क्रिकेट विश्वचषक लीग 2 एकदिवसीय सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 8:30 वाजता (नेपाळ वेळेनुसार 8:45 PM) सुरु होईल.
- कॅनडा विरुद्ध नेपाळ ICC क्रिकेट विश्वचषक लीग 2 पहिल्या ODI सामन्याचं थेट प्रक्षेपण भारतात कसं पाहू शकता?
कॅनडा विरुद्ध नेपाळ ICC क्रिकेट विश्वचषक लीग 2 पहिल्या ODI सामन्याचं भारतात कोणतंही थेट प्रक्षेपण होणार नाही.
- कॅनडा विरुद्ध नेपाळ ICC क्रिकेट विश्वचषक लीग 2 पहिल्या ODI सामन्याचं भारतात लाईव्ह स्टीम कसं पाहू शकता?
भारतातील चाहते फॅनकोड ॲप आणि वेबसाइटवर कॅनडा विरुद्ध नेपाळ ICC क्रिकेट विश्वचषक लीग 2 पहिल्या ODI सामन्याचं थेट प्रवाह पाहू शकतात.
सामन्यासाठी दोन्ही संघ :
- नेपाळ : रोहित पौडेल (कर्णधार), कुशल भुर्तेल, आसिफ शेख, अनिल साह, भीम सरकी, आरिफ शेख, कुशल मल्ला, दीपेंद्र आयरी, अर्जुन सौद, सोमपाल कामी, करण केसी, गुलसन झा, रिजन ढकल, संदीप लामिछाने, ललित राजबंशी, देव खनाल, कमल आयरी, सूर्या तमांग, बसीर अहमद, आकाश चंद, सागर ढकल, संदीप जोरा
- कॅनडा : निकोलस किर्टन (कर्णधार), आरोन जॉन्सन, डिलन हेलिगर, दिलप्रीत बाजवा, हर्ष ठाकर, कलीम सना, कंवरपाल तथगुर, नवनीत धालीवाल, परगट सिंग, साद बिन जफर, श्रेयस मोव्वा (यष्टिरक्षक), अखिल कुमार, अंश पटेल, गुरबाज सिंग, परवीन कुमार
हेही वाचा :